पिंपरी : संत तुकारामनगर पोलिसांनी विठ्ठलनगर परिसरात सुरू असलेल्या तीन पत्याच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून आठ जणांविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन आणि जुगार साहित्य असा एकूण ८० हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२२/२०२६ दाखल करण्यात आला असून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम ४ आणि ५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. हा प्रकार दि. २३ मे २०२६ रोजी सायंकाळी ७.५० वाजण्याच्या सुमारास विठ्ठलनगर, पिंपरी येथील वि. नं. ०८, रूम नं. २१० येथे उघडकीस आला.
या प्रकरणी पोलीस हवालदार जावेद शहाबुद्दीन मुजावर (संत तुकारामनगर पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी प्रतिक बाळकृष्ण बगाटे, उमेश सटया सरवदे, किरण मारुती कांबळे, सलीम उर्फ खबुला मकबुल पटेल, इस्माईल गुलाब शेख, रोहित प्रभाकर शिंदे, सुरज विजय घोडके आणि आकाश युवराज रणखांबे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.
पोलिसांनी छाप्यात ३५ हजार ७५० रुपये रोख रक्कम, ४५ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल फोन तसेच पत्त्यांचा संच जप्त केला. आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी एकत्र जमून तीन पत्याचा जुगार खेळत असल्याचे तपासात समोर आले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास संत तुकारामनगर पोलीस करत आहेत.