पिंपरी-चिंचवड : निगडी पोलीस ठाणे हद्दीत खंडोबामाळ, आकुर्डी परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत ३४४ ग्रॅम गांजासह एका ५८ वर्षीय महिलेला अटक केली आहे. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २० मे २०२६ रोजी दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास सत्यम फॅब्रीकेशन शेजारील अंतर्गत गल्लीतील मोकळ्या जागेत ही कारवाई करण्यात आली. आरोपी महिला ही खंडोबामाळ येथील बड़ी मशिन झोपडपट्टी परिसरातील रहिवासी असून तिच्याकडून १७ हजार २०० रुपये किमतीचा ३४४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोलीस शिपाई मितेश मोहन यादव (अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९९/२०२६ नोंद करण्यात आला असून एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम ८(क), २०(ब)(ii) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.सदर आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास मसपोनि आजगेकर करीत आहेत.