Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»बनावट कुराश प्रमाणपत्रांद्वारे पोलीस भरतीचा प्रयत्न ?
पिंपरी चिंचवड

बनावट कुराश प्रमाणपत्रांद्वारे पोलीस भरतीचा प्रयत्न ?

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comMay 21, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

चौकशी करून कठोर कारवाईची मागणी

पिंपरी-चिंचवड : कथित बनावट कुराश क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे पोलीस भरती प्रक्रियेत खेळाडू कोट्यातून प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप करत संबंधित उमेदवारांवर सखोल चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मानवी हक्क संरक्षण आणि जागृती, पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने करण्यात आली आहे.

यासंदर्भात महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, बालेवाडी येथे क्रीडा आयुक्त दीपक सिंगला यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात संबंधित उमेदवारांची नियुक्ती चौकशी पूर्ण होईपर्यंत स्थगित ठेवण्याची मागणीही करण्यात आली आहे.

संस्थेचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सुरू असलेल्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेत काही उमेदवारांनी कुराश खेळाची कथित बनावट प्रमाणपत्रे सादर करून शासन सेवेत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. काही उमेदवार सेवेतही असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच संबंधित क्रीडा संघटनांनी आर्थिक व्यवहार करून खोटे रेकॉर्ड तयार केल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर म्हणाले की, उमेदवारांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रांची पडताळणी प्रक्रियाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या गैरप्रकारामुळे प्रामाणिक आणि पात्र खेळाडूंवर अन्याय होत असून शासनाच्या खेळाडू आरक्षण व्यवस्थेची विश्वासार्हता धोक्यात येत आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागवण्यात आली असून, बोगस प्रमाणपत्र प्रकरणात कारवाई न झाल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

डॉ. यामिनी अडबे यांनी सांगितले की, भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत फसवणूक, बनावट कागदपत्र तयार करणे आणि त्यांचा वापर करणे यासंदर्भातील कलमान्वये गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच संबंधित क्रीडा संघटनांची मान्यता रद्द करून संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

शौर्य संघटनेचे अध्यक्ष हनुमंत धायगुडे यांनी दावा केला की, महाराष्ट्रातील विविध भागांतून बोगस क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवलेल्या उमेदवारांची माहिती त्यांच्या संघटनेकडे आली असून, दोषींवर कारवाई झाल्याशिवाय शांत बसणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यापूर्वीही या प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांकडे निवेदन देण्यात आल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.

हे निवेदन संस्था अध्यक्ष विकास कुचेकर, डॉ. यामिनी अडबे, शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, उपाध्यक्ष काळुराम लांडगे, सचिव गजानन धाराशिवकर, कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी आणि प्रमोद पाटील यांच्या स्वाक्षरीने सादर करण्यात आले.

Post Views: 57
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleविधानपरिषद निवडणुक: माजी आमदार विलास लांडे यांच्या उमेदवारीसाठी जोरदार ‘लाॅबिंग’
Next Article बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक संपन्न
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?