पिंपरी-चिंचवड : ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिष्ट (AIOCD) यांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदला पिंपरी-चिंचवड शहरातून उत्स्फूर्त आणि शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व होलसेल तसेच रिटेल औषध विक्रेत्यांनी या बंदमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत संपूर्ण परिसरातील औषध दुकाने बंद ठेवून आंदोलनाला ठाम पाठिंबा दिला.हा बंद पूर्णपणे शांततेत, शिस्तबद्ध आणि लोकशाही मार्गाने पार पडला. कोणताही अनुचित प्रकार घडला नसून औषध व्यवसायाशी संबंधित गंभीर प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते.
आंदोलनाद्वारे औषध विक्रेत्यांनी खालील प्रमुख मागण्या मांडल्या
💮बेकायदेशीर व अनियंत्रित ऑनलाइन औषध विक्री तात्काळ बंद करण्यात यावी.
💮ई-फार्मसी आणि ऑनलाइन कंपन्यांकडून डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय होणाऱ्या नियमबाह्य औषध विक्रीवर कठोर कारवाई करण्यात यावी.
💮ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स अॅक्टचे काटेकोर पालन करून नियमभंग करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी.
💮औषध विक्रेत्यांवरील अन्यायकारक धोरणे मागे घेऊन लघु व मध्यम केमिस्ट व्यवसायांचे संरक्षण करण्यात यावे.
💮रुग्णांना सुरक्षित औषध वितरण, योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षित फार्मासिस्टची सेवा उपलब्ध राहावी यासाठी पारंपरिक औषध विक्री व्यवस्था अधिक सक्षम करण्यात यावी.
या बंदमध्ये पिंपरी-चिंचवडमधील सर्व केमिस्ट बांधवांनी एकजुटीने सहभाग नोंदवत संघटनेची ताकद दाखवून दिली. बंदला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल सर्व होलसेलर, रिटेलर आणि औषध विक्रेता बांधवांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
दरम्यान, फार्मासिस्ट म्हणून Ravi Landge यांनीही ऑनलाइन औषध विक्रीला ठाम विरोध दर्शवित AIOCD च्या २० मे २०२६ रोजीच्या देशव्यापी बंदला पाठिंबा दिला.
ऑनलाइन औषध विक्रीमुळे रुग्णांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण होत असून स्थानिक फार्मासिस्ट आणि जनऔषध सेवा धोक्यात येत असल्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली. “औषध हे केवळ उत्पादन नसून तज्ज्ञ फार्मासिस्टच्या मार्गदर्शनाखाली दिली जाणारी आरोग्य सेवा आहे,” असे मत
