Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाकडून १०० कोटींचा निधी

June 29, 2026

जायकवाडी प्रकल्पासह सिंचनविषयक विविध प्रस्तावांचा जलसंपदा मंत्र्यांकडून आढावा

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»उद्योग व्यापार»कला»प्रत्येकाला हरवलेला मार्ग दाखवणारी वारी – आयुक्त विजय सूर्यवंशी
कला

प्रत्येकाला हरवलेला मार्ग दाखवणारी वारी – आयुक्त विजय सूर्यवंशी

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comMay 17, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

ज्ञान, ध्यान आणि समाधान म्हणजे “अंतर्नाद” ची वारी – भावार्थ देखणे

पिंपरी, पुणे (दि.१७ मे २०२६) आजच्या युगात प्रत्येक माणूस हरवलेला आहे. “स्व” मधला विठ्ठल शोधण्यासाठी “अंतर्नाद” पहावा. साक्षात विठ्ठल दर्शनाची अनुभूती मिळते. भक्तीरसाने ओथंबलेल्या यातील प्रत्येक कलाकार आपल्याला वारीला न जाताही वारी अनुभवायची संधी देतात. अंतर्नाद या संगीत नाटकातील एकही गीत कॉपी केलेले नाही केवळ या प्रयोगासाठी लिहिले आहेत हे नाविन्यपूर्ण आहे. शुभारंभाचा हा प्रयोग संस्मरणीय झाला आहे असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी केले.

‘अंतर्नाद’ या संगीत नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग शनिवारी, (दि.१६) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पार पडला. यावेळी आयुक्त बोलत होते.यावेळी तुडुंब भरलेल्या प्रेक्षागृहात आळंदी ज्ञानेश्वर संस्थान कमिटी अध्यक्ष भावार्थ देखणे, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष व मोरया थिएटरचे संस्थापक, “अंतर्नाद” चे निर्माते भाऊसाहेब भोईर आदी उपस्थित होते.

ज्ञानेश्वर संस्थान कमिटी अध्यक्ष भावार्थ देखणे यांनी सांगितले की, अंतर्नाद पाहून नाट्यगृहातील प्रत्येक व्यक्ती भारावलेला आहे. भगवंताच्या प्रति आपण फक्त आणि फक्त नतमस्तक होतो. माझे वडील डॉ. रामचंद्र देखणे नेहमी सांगायचे की, ज्ञान, ध्यान आणि समाधान म्हणजे पंढरपूरची वारी होय. ज्ञानी माणसांना पंढरपूरची उपासना आहे. ध्यानी माणसांना ध्यानाची उपासना आहे. सामान्य माणसांना समाधानाची उपासना आहे. खऱ्या अर्थाने हा प्रयोग पाहिल्यानंतर अडीच तासात नंतर जे समाधान प्राप्त होते ते कशानेही प्राप्त होत नाही. एकदा का माझ्यातल्या मी पणाचा अंत झाला की मी या जगामध्ये किती लहान आहे. खऱ्या अर्थाने या पांडुरंगाला भेटण्यासाठी, परब्रम्हाला आनंद देण्यासाठी प्रत्येक कलाकाराने प्रत्यक्ष भगवंत होऊन आम्हालाही नाचायला लावले हे अंतर्नादचे वैशिष्ट्य आहे. या वारीत मला माझ्या वडिलांचे दर्शन झाले असेही भावार्थ देखणे म्हणाले.

भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले की, अंतर्नाद ची निर्मिती करून मला माझी आई परत सापडली असे वाटते. ५१ कलाकारांच्या या टीमने पहिलाच प्रयोग अगदी २५ वा असल्यासारखा अभिनय व काम केले आहे.या भव्य संगीत नाटकाचा दुसरा प्रयोग हडपसर येथील विठ्ठलराव तुपे नाट्यगृहात शुक्रवारी (दि.२२ मे), सायंकाळी सात वाजता होणार आहे. रसिक प्रेक्षकांसाठी या नाटकाची तिकिटे ‘बुक माय शो’ आणि ‘तिकीट खिडकी’ या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. तसेच चिंचवड येथील नाट्यगृहाच्या तिकीट खिडकीवरही विक्री सुरू आहे. अंतर्नाद चे कलाकार प्रणव सपकाळे, मनोज डाळिंबकर, निरंजन पेडगावकर, अंकिता शिवतरे, राजू बंग आदींसह सर्वांनी उत्तम कामगिरी करत पहिलाच प्रयोग यशस्वी केला आहे अशी माहिती दिग्दर्शक मनोज डाळिंबकर यांनी दिली.

पोवाडा, पिंगळा, वासुदेव, लावणी, जात्यावरील गाणी, भूपाळी आणि रॅप साँगचा समावेश करण्यात आलेल्या या नाटकाचे लेखन विनोद रत्ना, संकल्पना व दिग्दर्शन मनोज डाळींबकर, संगीत निरंजन पेडगावकर आणि गीते मुराद तांबोळी यांनी शब्दबद्ध केली आहेत. नृत्यदिग्दर्शन अंकिता शिवतरे व सौगंध कापसे यांनी केले आहे. तांत्रिक बाजू अभिप्राय कामठे (प्रकाश योजना), कमलेश बिचे (रंगभूषा) आणि वेदिका काळे (वेशभूषा) यांनी सांभाळली आहे. सहाय्यक दिग्दर्शन आकाश थिटे यांनी केले आहे.

————————————————

Post Views: 7
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article“दादा, तुमच्यासाठी आम्ही विलास लांडेना पाडलं”; मंगलाताई कदमांचा महेश लांडगेंना भररस्त्यात जाब
Next Article कृषी नवसंकल्पनांमुळे शेतीला नवी दिशा; ‘पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा’ राज्यव्यापी होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यापूर्वी निगडी येथील वारकरी संप्रदायाच्या तैलचित्रांची तातडीने दुरुस्ती व सुशोभीकरण करावे – सचिन काळभोर यांची मागणी

June 29, 2026

आरक्षण उपवर्गीकरणाला परिषदेचा विरोध; समाजात फूट पडू देणार नाही – ॲड. जयदेव गायकवाड

June 29, 2026

सरकार सेतू पुलावरील २२ कोटींच्या कामाची चौकशी करण्याची भोईर यांची मागणी

June 29, 2026

‘संघर्ष’ हाच भाजपचा डीएनए; आमदार श्रीकांत भारतीय यांनी उलगडला आणीबाणीचा इतिहास

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

दि चिल्ड्रेन एड सोसायटी नियामक मंडळाची बैठक मुंबई, प्रतिनिधी: दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या मुंबई शहरात…

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाकडून १०० कोटींचा निधी

June 29, 2026

जायकवाडी प्रकल्पासह सिंचनविषयक विविध प्रस्तावांचा जलसंपदा मंत्र्यांकडून आढावा

June 29, 2026

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यापूर्वी निगडी येथील वारकरी संप्रदायाच्या तैलचित्रांची तातडीने दुरुस्ती व सुशोभीकरण करावे – सचिन काळभोर यांची मागणी

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?