Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

महाकर्जमुक्तीच्या पलीकडचा विचार

June 29, 2026

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाकडून १०० कोटींचा निधी

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»राजकारण»“दादा, तुमच्यासाठी आम्ही विलास लांडेना पाडलं”; मंगलाताई कदमांचा महेश लांडगेंना भररस्त्यात जाब
राजकारण

“दादा, तुमच्यासाठी आम्ही विलास लांडेना पाडलं”; मंगलाताई कदमांचा महेश लांडगेंना भररस्त्यात जाब

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comMay 17, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

भोसरी भाजपमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर; संभाजीनगरात कार्यकर्त्यांसमोर शाब्दिक राडा

पिंपरी चिंचवड, दि. १८ मे २०२६ : भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपमधील अंतर्गत नाराजी अखेर उघडपणे रस्त्यावर आली असून माजी महापौर मंगलाताई कदम यांनी आमदार महेशदादा लांडगे यांना भररस्त्यात थांबवत तीव्र शब्दांत जाब विचारल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. संभाजीनगर येथील साई गार्डन परिसरात हा संपूर्ण प्रकार घडला.

संभाजीनगर परिसरात असंघटित कामगार, हातगाडी, पथारी व भाजी विक्रेते यांच्या वतीने कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी कामगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात श्रम प्रतिष्ठा पुरस्कार, विविध सन्मान तसेच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरण करण्यात आले. कार्यक्रमासाठी आमदार महेश लांडगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रम संपल्यानंतर बाहेर पडत असताना माजी महापौर मंगलाताई कदम यांनी कार्यकर्त्यांसह आमदार लांडगे यांना रस्त्यात अडवले. प्रभाग क्रमांक ११ मधील कामांमध्ये स्थानिक नगरसेवक अडथळे निर्माण करीत असल्याचा आरोप करत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “दादा, तुमच्यासाठी आम्ही विलास लांडे यांना पाडलं आणि तुम्हाला निवडून दिलं,” असे म्हणत त्यांनी मोठ्या आवाजात भावना व्यक्त केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

दरम्यान, नगरसेवक निलेश नेवाळे आणि मंगलाताई कदम यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. दोन्ही बाजूंचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर जमा झाल्याने परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

यावेळी प्रभागातील चारही नगरसेवकांविरोधात तसेच भाजपविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आमदारांचे पत्र असूनही स्थानिक नगरसेवक संबंधित कामात ढवळाढवळ करीत असून कामे होऊ देत नसल्याचा थेट आरोपही मंगलाताई कदम यांनी केला.

घटनास्थळी उपस्थित काही माध्यम प्रतिनिधींनी या संपूर्ण प्रकाराचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, व्हिडिओ शूटिंग करण्यास मज्जाव करण्यात आल्याचा आरोप पत्रकारांकडून करण्यात आला. पत्रकारांच्या वार्तांकनाच्या कामात अडथळा आणल्याबद्दलही माध्यम प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली. माध्यमांचे कॅमेरे सुरू असल्याचे लक्षात येताच संबंधित लोकप्रतिनिधींनी तेथून निघून जाणे पसंत केल्याचे उपस्थितांनी सांगितले.

या घटनेमुळे भोसरी भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असून आगामी स्थानिक राजकारणात त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Post Views: 7
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Next Article प्रत्येकाला हरवलेला मार्ग दाखवणारी वारी – आयुक्त विजय सूर्यवंशी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यापूर्वी निगडी येथील वारकरी संप्रदायाच्या तैलचित्रांची तातडीने दुरुस्ती व सुशोभीकरण करावे – सचिन काळभोर यांची मागणी

June 29, 2026

आरक्षण उपवर्गीकरणाला परिषदेचा विरोध; समाजात फूट पडू देणार नाही – ॲड. जयदेव गायकवाड

June 29, 2026

सरकार सेतू पुलावरील २२ कोटींच्या कामाची चौकशी करण्याची भोईर यांची मागणी

June 29, 2026

‘संघर्ष’ हाच भाजपचा डीएनए; आमदार श्रीकांत भारतीय यांनी उलगडला आणीबाणीचा इतिहास

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

महाकर्जमुक्तीच्या पलीकडचा विचार

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

कर्जमुक्ती विशेष लेख – दिं.२९ जून २०२६              वृ. क्रं.…

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाकडून १०० कोटींचा निधी

June 29, 2026

जायकवाडी प्रकल्पासह सिंचनविषयक विविध प्रस्तावांचा जलसंपदा मंत्र्यांकडून आढावा

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?