Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाकडून १०० कोटींचा निधी

June 29, 2026

जायकवाडी प्रकल्पासह सिंचनविषयक विविध प्रस्तावांचा जलसंपदा मंत्र्यांकडून आढावा

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»उद्योग व्यापार»कृषी»कृषी नवसंकल्पनांमुळे शेतीला नवी दिशा; ‘पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा’ राज्यव्यापी होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कृषी

कृषी नवसंकल्पनांमुळे शेतीला नवी दिशा; ‘पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा’ राज्यव्यापी होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comMay 18, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पुणे, दि. १७ मे : शेती अधिक शाश्वत, तंत्रज्ञानाधारित आणि उत्पादनक्षम करण्यासाठी आधुनिक संशोधन व नवकल्पनांची जोड आवश्यक असल्याचे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केले. कृषी विभागाच्या वतीने आयोजित ‘पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा-२०२६’च्या समारोप कार्यक्रमात बोलताना त्यांनी पुढील वर्षापासून ही स्पर्धा राज्यव्यापी स्वरूपात घेण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच स्पर्धेतील प्रथम पुरस्कार दिवंगत अजित पवार यांच्या नावाने दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

पुण्यातील कृषी महाविद्यालय येथे झालेल्या या कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार योगेश टिळेकर,हेमंत रासने यांच्यासह विविध कृषी विद्यापीठांचे कुलगुरू आणि अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, यंदाच्या स्पर्धेसाठी तब्बल १,२९० अर्ज प्राप्त झाले असून अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्पांनी सर्वांचे लक्ष वेधले. गेल्या वर्षीच्या स्पर्धेतील चार संशोधन प्रकल्पांचे उत्पादन प्रत्यक्षात सुरू झाले असून आणखी १२ उत्पादने लवकरच बाजारात येणार आहेत. यंदाच्या स्पर्धेतील १८ निवडक नवकल्पनांना पुढील टप्प्यात विशेष मदत आणि मार्गदर्शन देण्यात येणार असून त्यापैकी किमान १२ प्रकल्प बाजारात आणण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

स्पर्धेतील विविध नवकल्पनांमध्ये उपग्रह नकाशांकनावर आधारित मृदा परीक्षण, शेतातील ओलावा लक्षात घेऊन स्वयंचलित पाणीपुरवठा करणारी यंत्रणा, तसेच तण आणि पीक ओळखून स्वतंत्र फवारणी करणारे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञान यांचा समावेश होता. पीक विमा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी ड्रोन आणि उपग्रह नकाशांकनाचा वापर उपयुक्त ठरणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कृषी क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरल्याचे त्यांनी नमूद केले.

कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी हवामान बदल, पाण्याची कमतरता, खतटंचाई आणि मजूर समस्यांसारख्या आव्हानांवर मात करण्यासाठी कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक असल्याचे सांगितल.

विविध विभागातील विजेते

💮मृदा आरोग्य व व्यवस्थापन : किसान साथी (विजेता), नॅनो वीटा (उपविजेता,)
💮स्मार्ट जल व्यवस्थापन व स्वयंचलन : आयओएच अभियंता समूह (विजेता), फार मोअर (उपविजेता)
💮कृषी यांत्रिकीकरण : एग्रीटेक नेक्सस (विजेता), टीम व्हीएनएमकेव्ही (उपविजेता)
💮कृषी प्रक्रिया व मूल्य साखळी : विन विन बाईट्स (विजेता), सिल्कस्कॅन इनोव्हेटर्स (उपविजेता)
💮अक्षय ऊर्जा व कृषी कचरा व्यवस्थापन : प्रोटो फीड्स (विजेता), इको एक्सट्रॅक्ट (उपविजेता)
💮पीक संरक्षण व कीड व्यवस्थापन : स्मार्ट बायो डिलिव्हरी (विजेता), कृषी नेत्र (उपविजेता)
💮हवामान अनुकूल व डिजिटल शेती : डीप अँग बॉट (विजेता), मॉडर्न व्हिलेज फ्यूचर इनोव्हेशन्स (उपविजेता)
💮भौगोलिक माहिती प्रणाली आधारित पीक सर्वेक्षण : क्रॉप जेन एआय (विजेता), ग्रीन माइंड्स (उपविजेता)
💮स्मार्ट कृषी प्रशासनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता : ई-पिक ऑडिट एआय (विजेता), कृषी प्रबंध (उपविजेता)

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुणे ॲग्री हॅकॅथॉन-२०२६ अंतर्गत उभारण्यात आलेल्या विविध स्टॉलना भेट देत संशोधक आणि युवा उद्योजकांशी संवाद साधला. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राज्यातील युवकांना नवसंशोधनासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

Post Views: 9
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleप्रत्येकाला हरवलेला मार्ग दाखवणारी वारी – आयुक्त विजय सूर्यवंशी
Next Article पुण्याला देशातील एक आधुनिकतम शहर म्हणून विकसित करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी-चिंचवडकरांना संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सुरक्षित व सुव्यवस्थित राखण्याचे विनम्र आवाहन… श्री.पवन शर्मा

June 29, 2026

कर्जमुक्ती प्रक्रियेला वेग : पात्र शेतकऱ्यांचा तपशील संकलनाची जबाबदारी बँकांवर निश्चित

June 28, 2026

फॉरेक्स ट्रेडिंगच्या आमिषाने उद्योजकाची ८८.१९ लाखांची ऑनलाइन फसवणूक; बावधन पोलिसांत गुन्हा दाखल

June 27, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत आळंदीत अत्याधुनिक PET-CT युनिटचे लोकार्पण

June 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

दि चिल्ड्रेन एड सोसायटी नियामक मंडळाची बैठक मुंबई, प्रतिनिधी: दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या मुंबई शहरात…

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाकडून १०० कोटींचा निधी

June 29, 2026

जायकवाडी प्रकल्पासह सिंचनविषयक विविध प्रस्तावांचा जलसंपदा मंत्र्यांकडून आढावा

June 29, 2026

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यापूर्वी निगडी येथील वारकरी संप्रदायाच्या तैलचित्रांची तातडीने दुरुस्ती व सुशोभीकरण करावे – सचिन काळभोर यांची मागणी

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?