चाकण ……चाकण शहरातील दुचाकी टोविंग कारवाईमुळे सामान्य नागरिक, कामगार, व्यापारी तसेच शेतकरी मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले होते. या पार्श्वभूमीवर ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समिती, विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी सातत्याने आंदोलन व पाठपुरावा केला होता. अखेर प्रशासनाने दुचाकी टोविंग कारवाईला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, जनतेच्या एकजुटीचा विजय झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. अन्यायकारक कारवाईविरोधात उभ्या राहिलेल्या नागरिकांच्या लढ्याला यश आल्याने चाकण परिसरात समाधानाचे वातावरण आहे.
दरम्यान, ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समितीने नागरिकांचे आभार मानत, “आपली साथच आमची ताकद आहे,” अशी भावना व्यक्त केली.
