Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»विधी समिती सभेत पावसाळा कालावधीत आपदा मित्र स्वयंसेवकांची प्रायोगिक तत्वावर नेमणूक करण्यास मंजुरी
पिंपरी चिंचवड

विधी समिती सभेत पावसाळा कालावधीत आपदा मित्र स्वयंसेवकांची प्रायोगिक तत्वावर नेमणूक करण्यास मंजुरी

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comMay 14, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी, दि. १४ मे २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका विधी समिती सभापती सुजाता बोराटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विधी समिती सभेत पावसाळा कालावधीसाठी प्रशिक्षित आणि अनुभवी “आपदा मित्र” स्वयंसेवकांची प्रायोगिक तत्वावर नियुक्ती करण्याच्या विषयास आज मंजुरी देण्यात आली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृह येथे पार पडलेल्या या बैठकीस विधी समिती सदस्य ज्ञानेश्वर जगताप, विनायक गायकवाड, कुंदा भिसे, श्रुती डोळस, कुशाग्र कदम, शेखर चिंचवडे, वर्षा जगताप, तुषार सहाणे यांच्यासह नगरसचिव मुकेश कोळप, उप आयुक्त संदीप खोत, राजेश आगळे, सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, कार्यकारी अभियंता शिरीष पोरेड्डी, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल आदी उपस्थित होते.

महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कामकाज अधिक परिणामकारक, गतिमान आणि सक्षम होण्यासाठी ही नियुक्ती करण्यात येणार असून, मान्सूनपूर्व तयारी २०२६ अंतर्गत पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य आपत्कालीन परिस्थिती, पूरस्थिती, पाणी साचणे, झाडे पडणे, दुर्घटना तसेच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही यंत्रणा महत्त्वाची ठरणार आहे.

याअंतर्गत शासनमान्य संस्थांकडून आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलेले “आपदा मित्र”, राज्य अग्निशमन दल तसेच नागरी संरक्षण दलातील प्रशिक्षित स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून पुढील पाच महिन्यांच्या कालावधीसाठी किमान ५० अनुभवी आपदा मित्र स्वयंसेवकांची मानधन तत्वावर नियुक्ती करण्यात येणार असून, या स्वयंसेवकांना कामगार कल्याण विभागाकडील कंत्राटी कामगारांच्या किमान वेतन दरानुसार मानधन अदा करण्यात येणार आहे.

हे स्वयंसेवक आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या समन्वयाने विविध आपत्कालीन घटनांमध्ये तातडीने प्रतिसाद देणे, बचावकार्यामध्ये मदत करणे, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविणे, पूरपरिस्थितीमध्ये सहाय्य करणे, आपत्कालीन यंत्रणांना सहकार्य करणे आदी जबाबदाऱ्या पार पाडणार आहेत. त्यामुळे महानगरपालिकेच्या आपत्ती प्रतिसाद क्षमतेत मोठी वाढ होणार आहे.

Post Views: 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleबचत गटातील महिलांकडून घरोघरी ५ लाखांहून अधिक मालमत्ता कर बिलांचे वितरण
Next Article स्वर्गीय प्रमोदजी महाजन स्वच्छ व हरित पिंपरी चिंचवड शहर योजना सुरू करणार – महापौर रवि लांडगे यांची घोषणा
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?