Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

महाकर्जमुक्तीच्या पलीकडचा विचार

June 29, 2026

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाकडून १०० कोटींचा निधी

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»बचत गटातील महिलांकडून घरोघरी ५ लाखांहून अधिक मालमत्ता कर बिलांचे वितरण
पिंपरी चिंचवड

बचत गटातील महिलांकडून घरोघरी ५ लाखांहून अधिक मालमत्ता कर बिलांचे वितरण

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comMay 14, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

लवकरात लवकर कर भरून सवलतींचा लाभ घ्या, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आवाहन

पिंपरी, दि. १४ मे २०२६ :पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी मालमत्ता कर संकलन मोहीम सुरू असून, शहरातील मालमत्ताधारकांना महिला बचत गटांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन मालमत्ता कर बिलांचे वितरण करण्यात येत आहे.

निवासी, बिगर निवासी, औद्योगिक तसेच इतर मालमत्ताधारकांना प्रत्यक्ष भेट देत बचत गटातील महिलांकडून आतापर्यंत ५ लाख ९ हजार ७४७ इतक्या मालमत्ता कर बिलांचे वितरण करण्यात आले आहे.

महापालिकेच्या वतीने नागरिकांना वेळेत मालमत्ता कर भरून विविध सवलतींचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विशेषतः ऑनलाइन पद्धतीने मालमत्ता कर भरल्यास १० टक्क्यांपर्यंत सवलत मिळत असल्याने नागरिकांनी या सुविधेचा त्वरित लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

१ एप्रिल २०२६ ते १२ मे २०२६ या कालावधीत महिला बचत गटांकडून एकूण ५ लाख ९ हजार ७४७ मालमत्ता कर बिलांचे वितरण करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड शहरात सध्या ७ लाख ६६ हजार ३८५ मालमत्तांची नोंद असून, त्यापैकी आतापर्यंत १ लाख ५३ हजार ९०२ मालमत्ताधारकांनी कर भरला आहे. यामधून महापालिकेला १४८ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला असून, ऑनलाइन कर भरण्यास नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मालमत्ता कराची बिले ऑनलाइन भरा

सध्या उन्हाळ्याचे तीव्र तापमान व उष्माघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेता घराबाहेर पडण्याचा त्रास टाळण्यासाठी नागरिकांनी मालमत्ता कर भरण्यासाठी ऑनलाइन पद्धतीचा अवलंब करावा. ऑनलाइन कर भरणे सुरक्षित, जलद व सुलभ असून घरबसल्या काही मिनिटांत कर भरता येतो. यामुळे रांगेत उभे राहण्याचा त्रास टाळता येतो तसेच वेळेची बचत होते. विशेष म्हणजे ऑनलाइन पद्धतीने कर भरल्यास सवलतींचाही लाभ मिळतो. त्यामुळे नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त वापर करून वेळेत मालमत्ता कर भरावा. तसेच, ज्या मालमत्ताधारकांना अद्याप ऑनलाइन अथवा घरपोच स्वरूपात बिल प्राप्त झाले नसेल, त्यांनी संबंधित कर संकलन विभाग कार्यालयाशी संपर्क साधून बिल प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन उपायुक्त सचिन पवार यांनी केले आहे.

थकबाकीदारांना बिलासोबत जप्तीपूर्व नोटीस

मालमत्ता कर थकबाकीदारांना वितरित करण्यात येणाऱ्या प्रत्येक बिलासोबत जप्तीपूर्व नोटीसही देण्यात येत आहे. आतापर्यंत २४ हजार ६२६ थकबाकीदार मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात आली असून, संबंधितांनी तात्काळ थकबाकीसह चालू आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर भरावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे

“पिंपरी चिंचवड शहराच्या विकासासाठी मालमत्ता कर हा महत्त्वाचा महसुलाचा स्रोत आहे. नागरिकांनी वेळेत मालमत्ता कर भरून महापालिकेला सहकार्य करावे. महिला बचत गटांच्या माध्यमातून घरोघरी बिल वाटप केल्यामुळे नागरिकांना मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. ऑनलाइन कर भरणाऱ्यांना दिली जाणारी सवलत नागरिकांसाठी लाभदायी असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा”

— रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

“महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून शहरातील सर्व मालमत्ताधारकांपर्यंत महिला बचत गटांच्या माध्यमातून मालमत्ता कर बिल पोहोचविण्याचे काम सुरू आहे. ज्या नागरिकांना अद्याप बिल प्राप्त झाले नाही, त्यांनी विभागीय कार्यालयाशी त्वरित संपर्क साधावा. थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटीस देण्याची प्रक्रिया सुरू असून नागरिकांनी दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी तात्काळ थकबाकीसह चालू आर्थिक वर्षाचा कर भरावा”

— सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Post Views: 13
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleवायसीएम’मधील आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावणार
Next Article विधी समिती सभेत पावसाळा कालावधीत आपदा मित्र स्वयंसेवकांची प्रायोगिक तत्वावर नेमणूक करण्यास मंजुरी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यापूर्वी निगडी येथील वारकरी संप्रदायाच्या तैलचित्रांची तातडीने दुरुस्ती व सुशोभीकरण करावे – सचिन काळभोर यांची मागणी

June 29, 2026

आरक्षण उपवर्गीकरणाला परिषदेचा विरोध; समाजात फूट पडू देणार नाही – ॲड. जयदेव गायकवाड

June 29, 2026

सरकार सेतू पुलावरील २२ कोटींच्या कामाची चौकशी करण्याची भोईर यांची मागणी

June 29, 2026

‘संघर्ष’ हाच भाजपचा डीएनए; आमदार श्रीकांत भारतीय यांनी उलगडला आणीबाणीचा इतिहास

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

महाकर्जमुक्तीच्या पलीकडचा विचार

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

कर्जमुक्ती विशेष लेख – दिं.२९ जून २०२६              वृ. क्रं.…

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाकडून १०० कोटींचा निधी

June 29, 2026

जायकवाडी प्रकल्पासह सिंचनविषयक विविध प्रस्तावांचा जलसंपदा मंत्र्यांकडून आढावा

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?