Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

आरक्षण उपवर्गीकरणाला परिषदेचा विरोध; समाजात फूट पडू देणार नाही – ॲड. जयदेव गायकवाड

June 29, 2026

राज्यातील बेकायदेशीर वृक्षतोडीचा मुद्दा विधान परिषदेत; आमदार अमित गोरखे यांच्या तारांकित प्रश्नावर वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

June 29, 2026

सरकार सेतू पुलावरील २२ कोटींच्या कामाची चौकशी करण्याची भोईर यांची मागणी

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»वायसीएम’मधील आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावणार
पिंपरी चिंचवड

वायसीएम’मधील आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावणार

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comMay 14, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

*स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्याकडून रुग्णालयाची पाहणी*

पिंपरी : यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील रुग्णसेवेचा दर्जा उंचावण्यासाठी आणि रुग्णांना भेडसावणाऱ्या समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी आज रुग्णालयाचा सविस्तर पाहणी दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी रुग्णालयातील विविध विभागांची प्रत्यक्ष पाहणी करत त्रुटी दूर करून अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले.

अभिषेक बारणे यांनी रुग्णालयातील सर्व संबंधित विभाग प्रमुख आणि अधिकाऱ्यांच्या समवेत ४ थ्या मजल्यावरील वॉर्डची सविस्तर पाहणी केली. यावेळी रुग्णांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधांचा आढावा घेताना त्यांनी वॉर्डातील अत्यावश्यक सोयी, वैद्यकीय उपकरणांची स्थिती आणि लिफ्टच्या वारंवार उद्भवणाऱ्या समस्यांची दखल घेतली. लिफ्ट दुरुस्तीबाबत नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी लक्षात घेता, याबाबत तातडीने कार्यवाही करून रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय टाळण्याचे आदेश त्यांनी दिले.

रुग्णालयावर वाढणारा रुग्णांचा भार विचारात घेता, परिसरातील मोकळ्या जागेचा प्रभावी वापर करण्याबाबतही यावेळी चर्चा झाली. या जागेत इमारतींचा विस्तार करून नवीन आरोग्य सेवा सुरू करण्याच्या शक्यता त्यांनी पडताळून पाहिल्या. रुग्णालयातील स्वच्छतेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी टॉयलेट स्वच्छता, बेडची व्यवस्था आणि सुरळीत पाणीपुरवठा यांवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच विद्युत विभाग आणि अग्निशमन यंत्रणेची सुरक्षाविषयक मानके तपासून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

रुग्णालयातील औषध साठा आणि वैद्यकीय उपकरणांच्या साठवणूक (स्टोरेज) विभागाची पाहणी करताना बारणे यांनी औषधांच्या उपलब्धतेचा आढावा घेतला. सामान्य रुग्णांना वेळेवर औषधे मिळतील आणि कोणत्याही उपकरणाच्या अभावी उपचार थांबणार नाहीत, यासाठी योग्य नियोजन व व्यवस्थापन करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

“सामान्य नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हीच आमची प्राथमिक जबाबदारी आहे. वायसीएम हे शहरातील महत्त्वाचे रुग्णालय असून येथील सेवा दर्जेदार राखण्यासाठी प्रशासन कटीबद्ध आहे. या पाहणी दौऱ्यामुळे रुग्णालयातील अनेक प्रलंबित विकासकामांना गती मिळण्याची चिन्हे आहेत”– अभिषेक बारणे, स्थायी समिती सभापती, पिंपरी चिंचवड महापालिका.

Post Views: 10
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी चिंचवड मध्ये १६ मे पासून घरयादी व घरगणनेला प्रारंभ
Next Article बचत गटातील महिलांकडून घरोघरी ५ लाखांहून अधिक मालमत्ता कर बिलांचे वितरण
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

आरक्षण उपवर्गीकरणाला परिषदेचा विरोध; समाजात फूट पडू देणार नाही – ॲड. जयदेव गायकवाड

June 29, 2026

सरकार सेतू पुलावरील २२ कोटींच्या कामाची चौकशी करण्याची भोईर यांची मागणी

June 29, 2026

‘संघर्ष’ हाच भाजपचा डीएनए; आमदार श्रीकांत भारतीय यांनी उलगडला आणीबाणीचा इतिहास

June 29, 2026

गुणवंत विद्यार्थ्यांचा ज्येष्ठ नागरिक संघाकडून गौरव; विकासनगर-किवळे येथे सत्कार सोहळा उत्साहात

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

आरक्षण उपवर्गीकरणाला परिषदेचा विरोध; समाजात फूट पडू देणार नाही – ॲड. जयदेव गायकवाड

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

पिंपरी, दि. २९ जून २०२६ : मागासवर्गीय आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या नावाखाली समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न…

राज्यातील बेकायदेशीर वृक्षतोडीचा मुद्दा विधान परिषदेत; आमदार अमित गोरखे यांच्या तारांकित प्रश्नावर वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

June 29, 2026

सरकार सेतू पुलावरील २२ कोटींच्या कामाची चौकशी करण्याची भोईर यांची मागणी

June 29, 2026

३० जूनपर्यंत एचएसआरपी नंबर प्लेट बसवा; १ जुलैपासून नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?