Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

निकृष्ट औषध पुरवठा करणाऱ्या कंपनीला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाका; ठेकेदाराचे बिल रोखावे

November 25, 2026

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांचे बळकटीकरण करावे; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे महापौर रवि लांडगे यांचे प्रशासनाला निर्देश

November 25, 2026

न्यायालय परिसरही असुरक्षित? सात जणांच्या हल्ल्याने पुण्यात खळबळ!

November 25, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»न्यायालय परिसरही असुरक्षित? सात जणांच्या हल्ल्याने पुण्यात खळबळ!
पुणे

न्यायालय परिसरही असुरक्षित? सात जणांच्या हल्ल्याने पुण्यात खळबळ!

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 25, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पुणे प्रतिनिधी : पुण्यातील शिवाजीनगर न्यायालय परिसरात बुधवारी (२५ नोव्हेंबर) दुपारी गोळीबार आणि कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. न्यायालयाच्या गेट क्रमांक ४ जवळ सात जणांनी मंदार किवळे याच्यावर हल्ला केला. भरदिवसा न्यायालयाच्या आवाराजवळ घडलेल्या या घटनेमुळे वकील, पक्षकार आणि नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली.

मिळालेल्या माहितीनुसार, मंदार किवळे हा कात्रज परिसरातील रहिवासी असून, एका खटल्यातील साक्षीदार असल्याची प्राथमिक माहिती आहे. शुभम चव्हाण हत्या प्रकरणाशीही त्याचा संबंध असल्याचे सांगितले जात आहे. न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या तारखेसाठी तो आला असताना हल्लेखोरांनी त्याला लक्ष्य केले.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला हल्लेखोरांनी मंदार याच्यावर गोळीबार केला. जीव वाचवण्यासाठी त्याने पळण्याचा प्रयत्न केला असता हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग केला. त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. तो खाली बसल्यानंतरही हल्लेखोरांनी वार केल्याचे एका वकिलाने सांगितले. या हल्ल्यात मंदार गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हल्लेखोरांपैकी एकाकडे पिस्तूल, तर इतरांकडे कोयते असल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्यानंतर आरोपींनी दोन दुचाकींवरून घटनास्थळावरून पळ काढला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात वैयक्तिक वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा अंदाज आहे. घटनास्थळावर पिस्तूल आणि काडतुसांनी भरलेली मॅगझीन आढळून आली आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

शिवाजीनगर न्यायालय परिसरात दररोज मोठ्या संख्येने वकील, पक्षकार आणि नागरिकांची वर्दळ असते. अशा अतिसंवेदनशील आणि गजबजलेल्या ठिकाणी भरदिवसा पिस्तूल व कोयत्यांचा वापर करून हल्ला झाल्याने पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. न्याय मिळवण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त होत आहे. या हल्ल्यामागील नेमके कारण, कटात सहभागी असलेले आरोपी आणि त्यांच्या भूमिकेचा उलगडा पोलीस तपासातून होणार आहे.

 

 

Post Views: 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे राजकीय क्षेत्रातील अष्टपैलु व्यक्तिमत्त्व लाभलेले थोर मुत्सद्दी नेते- महापौर रवि लांडगे
Next Article यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांचे बळकटीकरण करावे; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे महापौर रवि लांडगे यांचे प्रशासनाला निर्देश
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

वाहनांच्या बॉडी निर्मिती क्षेत्रातील अजिल फायबरटेच्या लिगसी स्लीपर कोचला एआरएआयचे प्रमाणपत्र 

November 24, 2026

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांची माणुसकी अन् कर्तव्यदक्षतेचे दर्शन! चक्कर आलेल्या महिला प्रवाशाला तातडीने रुग्णालयात दाखल

November 23, 2026

पुण्यात अतिक्रमणांवर महापालिकेचा आठ क्षेत्रीय कार्यालयांतून कारवाईचा बडगा!

November 22, 2026

४० सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपीचा माग काढला; १९ वर्षीय तरुण अटकेत

November 21, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

निकृष्ट औषध पुरवठा करणाऱ्या कंपनीला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाका; ठेकेदाराचे बिल रोखावे

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 25, 20260

नगरसेवक संदीप वाघेरे यांची स्थायी समितीच्या बैठकीत मागणी पिंपरी प्रतिनिधी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती…

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांचे बळकटीकरण करावे; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे महापौर रवि लांडगे यांचे प्रशासनाला निर्देश

November 25, 2026

न्यायालय परिसरही असुरक्षित? सात जणांच्या हल्ल्याने पुण्यात खळबळ!

November 25, 2026

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे राजकीय क्षेत्रातील अष्टपैलु व्यक्तिमत्त्व लाभलेले थोर मुत्सद्दी नेते- महापौर रवि लांडगे

November 25, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?