Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

निकृष्ट औषध पुरवठा करणाऱ्या कंपनीला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाका; ठेकेदाराचे बिल रोखावे

November 25, 2026

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांचे बळकटीकरण करावे; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे महापौर रवि लांडगे यांचे प्रशासनाला निर्देश

November 25, 2026

न्यायालय परिसरही असुरक्षित? सात जणांच्या हल्ल्याने पुण्यात खळबळ!

November 25, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»निकृष्ट औषध पुरवठा करणाऱ्या कंपनीला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाका; ठेकेदाराचे बिल रोखावे
पिंपरी चिंचवड

निकृष्ट औषध पुरवठा करणाऱ्या कंपनीला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाका; ठेकेदाराचे बिल रोखावे

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 25, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

नगरसेवक संदीप वाघेरे यांची स्थायी समितीच्या बैठकीत मागणी

पिंपरी प्रतिनिधी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात जेजुरी एमआयडीसी येथील ‘इंडुकेअर फार्मास्युटिकल्स अँड रिसर्च फाउंडेशन’ या कंपनीकडून दर करारांतर्गत (रेट कॉन्ट्रॅक्ट) पुरवठा झालेली १८ पैकी तब्बल १७ औषधे निकृष्ट व निष्प्रभ आढळली आहेत. रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या कंपनीला केवळ तीन वर्षांसाठी नव्हे, तर कायमस्वरूपी काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकावे आणि कोणाच्याही दबावाखाली येऊन संबंधित ठेकेदाराला निकृष्ट औषधांचे बिल अदा करू नये, अशी आक्रमक मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली आहे. या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

संबंधित कंपनीकडून दर करारांतर्गत नेमकी किती औषधे खरेदी करण्यात आली, याचे एकूण बिल किती कोटी रुपयांचे झाले आहे, कंपनीला आत्तापर्यंत किती रक्कम अदा केली आणि किती देणे बाकी आहे, याची माहिती प्रशासनाने जाहीर करावी. तसेच, या कंपनीकडून २३९ प्रकारची औषधे कधीपासून घेतली जात होती आणि यापूर्वी पुरवठा झालेल्या इतर औषधांच्या दर्जाची चौकशी झाली आहे का, असा सवालही वाघेरे यांनी उपस्थित केला आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) कारवाईत या कंपनीकडे काही औषधांच्या उत्पादनासाठी वैध परवानगी नसल्याचे समोर आले आहे. असे असताना महापालिकेने कागदपत्रांची पडताळणी न करता उत्पादन परवानगी नसलेली औषधे खरेदी केली होती का, याचा खुलासा प्रशासनाने करावा. कोट्यवधी रुपयांची औषधे खरेदी करताना अधिकाऱ्यांकडून इतका मोठा हलगर्जीपणा कसा झाला, याची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी वाघरे यांनी केली आहे. गरिब आणि सर्वसामान्य रुग्ण उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात येतात. त्यांना जीवनदान देण्याऐवजी निष्प्रभ औषधे देऊन त्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. निकृष्ट औषधांचे पैसे ठेकेदाराला देण्याच्या हालचाली सुरू असतील, तर त्या तात्काळ थांबवाव्यात. प्रशासनाने या ठेकेदाराला पैसे दिल्यास आम्ही कायदेशीर मार्गाने दाद मागू, असा इशारा वाघेरे यांनी दिला आहे.

Post Views: 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleयशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांचे बळकटीकरण करावे; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे महापौर रवि लांडगे यांचे प्रशासनाला निर्देश
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांचे बळकटीकरण करावे; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे महापौर रवि लांडगे यांचे प्रशासनाला निर्देश

November 25, 2026

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे राजकीय क्षेत्रातील अष्टपैलु व्यक्तिमत्त्व लाभलेले थोर मुत्सद्दी नेते- महापौर रवि लांडगे

November 25, 2026

मोबदला घेतला, तरी रस्ते अडवले! रहाटणी-काळेवाडीचा विकास आरक्षणांमध्ये अडकला

November 24, 2026

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या संशोधक विद्यार्थ्यांकडून पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा अभ्यास; महापौर रवि लांडगे यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर संवाद

November 23, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

निकृष्ट औषध पुरवठा करणाऱ्या कंपनीला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाका; ठेकेदाराचे बिल रोखावे

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 25, 20260

नगरसेवक संदीप वाघेरे यांची स्थायी समितीच्या बैठकीत मागणी पिंपरी प्रतिनिधी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती…

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांचे बळकटीकरण करावे; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे महापौर रवि लांडगे यांचे प्रशासनाला निर्देश

November 25, 2026

न्यायालय परिसरही असुरक्षित? सात जणांच्या हल्ल्याने पुण्यात खळबळ!

November 25, 2026

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे राजकीय क्षेत्रातील अष्टपैलु व्यक्तिमत्त्व लाभलेले थोर मुत्सद्दी नेते- महापौर रवि लांडगे

November 25, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?