ह्यूमन राइट्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची अचानक भेट; स्वच्छता व स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेबाबत अधिकाऱ्यांना जाब
ईश्वरपूर प्रतिनिधी : ईश्वरपूर येथील एसटी बसस्थानकातील अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याची समस्या तसेच स्वच्छतागृह आणि स्नानगृहांची दुर्दशा याबाबत ह्यूमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी अचानक भेट देऊन पाहणी केली. या पाहणीदरम्यान बसस्थानक परिसरातील अस्वच्छता आणि स्वच्छतागृहांमधील दुर्गंधीची गंभीर परिस्थिती निदर्शनास आली.
ह्यूमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. डी. चौधरी, सांगली जिल्हाध्यक्ष मोहन पाटील (नाना), जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पाटील आणि अजित हवलदार यांनी बसस्थानकाला भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित एसटी डेपो व्यवस्थापक आणि वाहतूक नियंत्रक यांना बोलावून स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेबाबत लक्ष वेधले.

ईश्वरपूर बसस्थानकातून दररोज शेकडो प्रवासी एसटीने प्रवास करतात. यामध्ये लहान मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी, महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. मात्र, बसस्थानकातील अस्वच्छता आणि स्वच्छतागृहांमधील दुर्गंधीमुळे प्रवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रवाशांना स्वच्छ आणि सुरक्षित सुविधा मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क असून, सध्याची परिस्थिती मानवी हक्कांच्या दृष्टीनेही चिंताजनक असल्याचे पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.
यावेळी बसस्थानकातील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि स्वच्छतागृहांची दुरुस्ती यासंबंधीची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी बसस्थानकातील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि स्वच्छतागृहांची दुरुस्ती यासंबंधीची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावर उत्तर देताना डेपो व्यवस्थापकांनी स्वच्छतागृहांच्या दुरुस्ती व सुधारणेसाठी नुकतेच टेंडर मंजूर झाल्याचे सांगितले. तसेच संबंधित काम लवकरात लवकर सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
आता प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होते आणि ईश्वरपूर बसस्थानकातील प्रवाशांना स्वच्छ व आरोग्यदायी सुविधा कधी मिळतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.