Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

November 22, 2026

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पुनर्वापरातून साधला सौंदर्याचा नवा आविष्कार
पिंपरी चिंचवड

पुनर्वापरातून साधला सौंदर्याचा नवा आविष्कार

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 17, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

फुलेनगरमध्ये कल्पकतेतून परिसराचे सुशोभीकरण

पिंपरी दि. १७ नोव्हेंबर २०२६: वारंवार कचरा साठणारी ठिकाणे (गार्बेज व्हल्नरेबल पॉइंट – GVP) स्वच्छ, सुंदर आणि आकर्षक बनविण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून महापौर रवि लांडगे, उप महापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहेत.

याच उपक्रमांतर्गत ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग क्रमांक २० मधील डी. वाय. पाटील लॉ कॉलेज, फुलेनगर येथील वारंवार कचरा साठणाऱ्या ठिकाणाचे टाकाऊ वस्तूंच्या कल्पक आणि कलात्मक पुनर्वापरातून आकर्षक स्थळात रूपांतर करण्यात आले आहे. कल्पकतेचा स्पर्श आणि सौंदर्यदृष्टीची जोड देत निरुपयोगी वस्तूंना नवे रूप बहाल करण्यात आले असून, कचऱ्याच्या जागी सौंदर्याची नवी निर्मिती साकारली आहे. या अभिनव उपक्रमातून परिसराचे रूपडे पालटण्यासोबतच पुनर्वापराचे महत्त्व आणि स्वच्छतेचा संदेशही त्यानिमित्ताने देण्यात येत आहे.

यापरिसरात यापूर्वी कचरा टाकला जात असलेल्या ठिकाणी विविध टाकाऊ वस्तूंचा सुबक आणि कलात्मक पद्धतीने वापर करण्यात आला. त्यामुळे केवळ परिसराचे सौंदर्यीकरण झाले नाही, तर कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, पुनर्वापर आणि सार्वजनिक स्वच्छतेविषयी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होण्यासही मदत होणार आहे. कचरा टाकण्याच्या ठिकाणाचे सुशोभीकरण करून त्याचे सकारात्मक आणि आकर्षक जागेत रूपांतर करण्याचा हा उपक्रम विशेष ठरत आहे.

“शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवणे ही केवळ महापालिकेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचेही कर्तव्य आहे. टाकाऊ वस्तूंचा कलात्मक पुनर्वापर करून वारंवार कचरा साठणाऱ्या ठिकाणांचे सुशोभीकरण करणे हा पर्यावरणपूरक आणि अभिनव उपक्रम आहे. अशा उपक्रमांमुळे स्वच्छतेसोबतच पुनर्वापराची संस्कृती विकसित होण्यास मदत होईल.”

……रवि लांडगे, महापौर,पिंपरी चिंचवड 

“वारंवार कचरा साठणाऱ्या ठिकाणांचे कायमस्वरूपी स्वरूपात रूपांतर करण्यासाठी केवळ स्वच्छता पुरेशी नाही, तर त्या ठिकाणांचा सकारात्मक वापर आणि सौंदर्यीकरणही महत्त्वाचे आहे. टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करून अशा जागांचे आकर्षक रूपांतर केल्यास नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जाणीव निर्माण होईल. शहरातील इतर वारंवार कचरा साठणाऱ्या ठिकाणी अशा नावीन्यपूर्ण संकल्पना राबविण्यावर भर देण्यात येत आहे”

……आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका 

 “वारंवार कचरा साठणाऱ्या ठिकाणांवर पुन्हा कचरा साचू नये, यासाठी परिसराचे सुशोभीकरण, नियमित स्वच्छता आणि नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. टाकाऊ वस्तूंच्या कलात्मक पुनर्वापरातून स्वच्छतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचविता येतो. नागरिकांनीही सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता स्वच्छता राखण्यासाठी महापालिकेला सहकार्य करावे.” 

…….डॉ. प्रदीप ठेंगल उप आयुक्त, पिंपरी चिंचवड 

यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका नगरसदस्या वर्षा जगताप, आरोग्य निरीक्षक लक्ष्मण साळवे तसेच महापालिकेचे अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. टाकाऊ वस्तूंमधून साकारलेले हे सौंदर्यपूर्ण परिवर्तन शहरातील स्वच्छता मोहिमेला नवी दिशा देणारे ठरत आहे.

Post Views: 12
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleशेतकरी जगला तरच देश जगेल! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्या!
Next Article न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू!
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

रुपये १,२४६ कोटींचे कर्ज कशासाठी? मनसेचा महापालिका प्रशासनाला सवाल!

November 21, 2026

जगाला शांतता आणि विवेकाची नितांत गरज! – डाॅ. श्रीपाल सबनीस

November 21, 2026

आशियाई स्तरावर महोत्सव व्हावा – रंगानुभूति महोत्सव ही शहराची ओळख व्हावी – डॉ. विजय सूर्यवंशी

November 21, 2026

वाय.सी.एम. औषध प्रकरणात महापालिकेची बाजू; १.७२ कोटींच्या जप्तीचे वृत्त फेटाळले

November 20, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 22, 20260

पत्र्याच्या शेडमध्ये प्रवेश करून स्टेनलेस स्टील, तांबे, पितळ, अॅल्युमिनियमसह सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरट्यांनी पळविला भोसरी प्रतिनिधी:…

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026

नेरलेतील दोन तरुणांना मारहाण प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाची गंभीर दखल

November 22, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?