Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

November 22, 2026

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»जनता शिक्षण संस्थेत नेमके चाललेय तरी काय? एक कोटींच्या अतिरिक्त खर्चासह अनेक अनियमिततांचे आरोप!
पिंपरी चिंचवड

जनता शिक्षण संस्थेत नेमके चाललेय तरी काय? एक कोटींच्या अतिरिक्त खर्चासह अनेक अनियमिततांचे आरोप!

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 15, 2026No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

एक कोटींच्या अतिरिक्त बांधकाम खर्चाचा ठपका; पाच शाळांचा २.७५ कोटींचा निधी संस्थेच्या खात्यात! शिक्षकांची मुस्कटदाबी, वर्षभरात तीन बदल्या अन् मारहाणीच्या तक्रारींनी खळबळ

पुणे : प्रतिनिधी....दापोडी येथील जनता शिक्षण संस्थेच्या कारभाराचा वाद आता चव्हाट्यावर आला आहे. संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश जगताप आणि सचिव सुभाष जावळे यांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदारांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले असून, धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या निरीक्षक चौकशी अहवालातील आर्थिक अनियमिततांच्या निरीक्षणांमुळे संस्थेच्या कारभाराभोवती संशयाचे सावट निर्माण झाले आहे. बांधकाम खर्चातील तब्बल एक कोटी दोन लाखांची तफावत, निविदा प्रक्रियेतील कथित गैरप्रकार, पाच शाळांचा २ कोटी ७५ लाखांचा निधी संस्थेच्या खात्यात वर्ग करणे, शिक्षकांची मुस्कटदाबी, मनमानी बदल्यांचे आरोप आणि मारहाणीची पोलीस तक्रार अशा गंभीर मुद्द्यांनी शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

संस्थेच्या कारभाराबाबत दाखल तक्रारींच्या अनुषंगाने धर्मादाय आयुक्त कार्यालय, पुणे विभागामार्फत निरीक्षक चौकशी क्रमांक १५२/२०२५ अंतर्गत चौकशी करण्यात आली. या चौकशी अहवालात संस्थेच्या आर्थिक व्यवहारांपासून बांधकामांच्या निविदा प्रक्रियेपर्यंत अनेक आक्षेपार्ह बाबी निदर्शनास आणण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० मधील कलम ३९ अन्वये अहवाल सादर करण्यासह कलम ८३ अन्वये अभियोजन अथवा खटला दाखल करण्यासाठी पूर्वमंजुरी देण्याची विनंती करण्यात आली आहे.

एक कोटी दोन लाखांचा अतिरिक्त खर्च; पैशांचा हिशेब कोण देणार?

संस्थेच्या बांधकाम खर्चाबाबत अहवालात नोंदविण्यात आलेली आकडेवारी धक्कादायक आहे. संबंधित बांधकामांसाठी १ कोटी ३७ लाख ३९ हजार ९७७ रुपये खर्च अपेक्षित असताना प्रत्यक्षात २ कोटी ३९ लाख ९५ हजार ५०६ रुपये खर्च झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. म्हणजेच तब्बल १ कोटी २ लाख ५५ हजार ५२९ रुपयांचा अतिरिक्त खर्च झाल्याचे निरीक्षक अहवालात म्हटले आहे. हा अतिरिक्त खर्च नेमका कशासाठी झाला? खर्चाला मंजुरी कोणी दिली? आर्थिक जबाबदारी कोणाची? या प्रश्नांची उत्तरे आता संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार आहेत.

निविदा निघण्याआधीच कंत्राटदारांकडून प्रस्ताव; प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न!

काही बांधकामांच्या निविदा प्रक्रियेत गंभीर त्रुटी असल्याचे निरीक्षकांनी नोंदविले आहे. निविदा प्रसिद्ध होण्यापूर्वीच कंत्राटदारांकडून निविदा प्राप्त झाल्याचे, तसेच मंजूर निविदेपेक्षा अधिक रक्कम अदा करण्यात आल्याचे अहवालात नमूद आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया केवळ औपचारिकता होती का, असा सवाल उपस्थित होत आहे. या संपूर्ण व्यवहाराची स्वतंत्र चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होत आहे.

पाच शाळांचा २ कोटी ७५ लाखांचा निधी संस्थेच्या खात्यात; ठराव कुठे?

शाळांच्या निधीच्या विनियोगाबाबतही गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. आवश्यक ठराव न करता पाच शाळांकडील एकूण २ कोटी ७५ लाख ४२ हजार ५४५ रुपये संस्थेच्या खात्यात वर्ग करण्यात आल्याचे निरीक्षक अहवालात नमूद आहे. याशिवाय आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये आयकर टीडीएस कपात न करणे आणि काही कंत्राटदारांकडून जीएसटी जमा न झाल्यामुळे शासनाच्या महसुलाचे नुकसान झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. शाळांच्या पैशांचा वापर नेमका कसा झाला, याचा संपूर्ण हिशेब सार्वजनिक करण्याची मागणी होत आहे.

परवानग्यांचा पत्ता नाही; बांधकामे मात्र उभी!

शाळांमध्ये वर्गखोल्या, स्वच्छतागृहे आणि अन्य बांधकामे करताना संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सक्षम प्राधिकरणाच्या आवश्यक परवानग्या उपलब्ध नसल्याचे अहवालात नमूद आहे. नियम आणि परवानग्यांचे पालन न करता बांधकामे करण्यात आली असल्यास त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

अध्यक्ष-सचिवांच्या विरोधात आवाज उठवला की मुस्कटदाबी?

संस्थेतील आर्थिक आणि प्रशासकीय अनियमिततांबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचा गंभीर आरोप तक्रारदारांनी केला आहे. विरोधी भूमिका घेणाऱ्यांना त्रास देणे, त्यांची मुस्कटदाबी करणे आणि मनमानी प्रशासकीय निर्णयांद्वारे दबाव निर्माण करणे, असे प्रकार होत असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. शिक्षण संस्थेत शिक्षकांना निर्भयपणे आपले मत मांडण्याचा अधिकारही सुरक्षित नसेल, तर संस्थेच्या शैक्षणिक वातावरणाचे काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शंभर टक्के निकाल देणाऱ्या शिक्षिकेची वर्षभरात तीन वेळा बदली!

ज्येष्ठ इंग्रजी विषय शिक्षिका कांचन घुले यांच्या वारंवार बदल्यांचा प्रकारही चर्चेत आला आहे. संबंधित शिक्षिकेने शंभर टक्के निकाल दिलेला असतानाही वर्षभरात तब्बल तीन वेळा त्यांची बदली करण्यात आल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. विद्यार्थ्यांचा निकाल शंभर टक्के देणाऱ्या शिक्षिकेला वारंवार बदलीच्या निर्णयांना सामोरे का जावे लागले? या बदल्यांमागे प्रशासकीय कारणे होती की अन्य काही हेतू? याची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.

प्रदीप कुमार नागवडे यांना मारहाण केल्याचा आरोप; पोलीस तक्रारीने प्रकरण गंभीर

संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव यांच्याकडून प्रदीप कुमार नागवडे यांना मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप तक्रारदारांनी केला आहे. या कथित घटनेप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. संस्थेतील कारभाराबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी मारहाणीचा प्रकार घडल्याचा आरोपही करण्यात येत आहे. या प्रकरणाची पोलीस यंत्रणेमार्फत निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणण्याची मागणी होत आहे.

धर्मादाय आयुक्तांकडून पुढील कारवाईकडे लक्ष

निरीक्षक चौकशी अहवालातील निष्कर्ष, आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे, पदाधिकाऱ्यांचे खुलासे आणि इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी तक्रारदारांनी केली आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमातील कलम ३९ आणि ८३ अन्वये आवश्यक कार्यवाहीसाठी पूर्वमंजुरी देण्याची विनंती करण्यात आली आहे.

संस्थेचा कारभार पारदर्शक आहे की आर्थिक आणि प्रशासकीय अनियमिततांच्या आरोपांमागे आणखी काही दडले आहे? शाळांचा निधी, बांधकामांचा खर्च, निविदा प्रक्रिया आणि शिक्षकांवरील कथित अन्याय या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणे गरजेचे आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.

 

 

Post Views: 9
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती उत्साहात साजरी!
Next Article लोकनेत्याच्या वाढदिनी लोकसेवेचा यज्ञ!
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

रुपये १,२४६ कोटींचे कर्ज कशासाठी? मनसेचा महापालिका प्रशासनाला सवाल!

November 21, 2026

जगाला शांतता आणि विवेकाची नितांत गरज! – डाॅ. श्रीपाल सबनीस

November 21, 2026

आशियाई स्तरावर महोत्सव व्हावा – रंगानुभूति महोत्सव ही शहराची ओळख व्हावी – डॉ. विजय सूर्यवंशी

November 21, 2026

वाय.सी.एम. औषध प्रकरणात महापालिकेची बाजू; १.७२ कोटींच्या जप्तीचे वृत्त फेटाळले

November 20, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 22, 20260

पत्र्याच्या शेडमध्ये प्रवेश करून स्टेनलेस स्टील, तांबे, पितळ, अॅल्युमिनियमसह सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरट्यांनी पळविला भोसरी प्रतिनिधी:…

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026

नेरलेतील दोन तरुणांना मारहाण प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाची गंभीर दखल

November 22, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?