Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»बेकायदा बाईक टॅक्सी बंद करा, अन्यथा बेमुदत धरणे!
पिंपरी चिंचवड

बेकायदा बाईक टॅक्सी बंद करा, अन्यथा बेमुदत धरणे!

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 29, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

आम आदमी पार्टी रिक्षा संघटनेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा; कंपन्यांवर गुन्हे दाखल करून अ‍ॅप्स बंद करण्याची मागणी

पिंपरी-चिंचवड,  : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना सुरू असलेल्या रॅपिडो, उबेर आणि ओला या कंपन्यांच्या बाईक टॅक्सी सेवा तातडीने बंद कराव्यात. संबंधित कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांची वाहने जप्त करावीत आणि बाईक टॅक्सी अ‍ॅप्स बंद करण्यासाठी कठोर कारवाई करावी, अशी मागणी आम आदमी पार्टी रिक्षा संघटनेच्या वतीने पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे (आरटीओ) यांनी २६ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्तनिवेदनात रॅपिडो कंपनीकडे वैध बाईक टॅक्सी अ‍ॅग्रीगेटर परवाना नसल्याचे स्पष्ट केल्याचा दावा संघटनेने केला आहे. असे असतानाही पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये बाईक टॅक्सी सेवा सुरू असल्याने कायद्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

रिक्षा चालकांच्या रोजगारावर गदा

विनापरवाना बाईक टॅक्सी सेवांमुळे नियमानुसार परवाने घेऊन व्यवसाय करणाऱ्या रिक्षा व टॅक्सी चालकांच्या उपजीविकेवर परिणाम होत आहे. तसेच आवश्यक परवाने आणि व्यावसायिक विमा नसलेल्या वाहनांमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, असे संघटनेने निवेदनात म्हटले आहे.

यावेळी आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवड रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अंगद मुगळे यांनी बेकायदा बाईक टॅक्सी सेवा चालवणाऱ्या कंपन्यांविरोधात सायबर गुन्हे विभाग आणि पोलिसांमार्फत कठोर कारवाई करण्याची मागणी केली. केवळ औपचारिक कारवाई न करता संबंधित कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, वाहने जप्त करावीत आणि त्यांच्या अ‍ॅप्सवर बंदी आणण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी भूमिका त्यांनी मांडली.

आठ दिवसांत कारवाई करा, अन्यथा आंदोलन

पुढील आठ दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास पुणे व पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालय तसेच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आम आदमी पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट यांनी दिला आहे.

“या मागणीला आम आदमी पार्टी रिक्षा संघटनेने पूर्ण पाठिंबा दर्शविला असून, बेकायदा बाईक टॅक्सी सेवांवर तातडीने कारवाई करून रिक्षा व टॅक्सी चालकांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे”

— अंगद रमेश मुगळे,अध्यक्ष, आम आदमी पार्टी रिक्षा संघटना, पिंपरी-चिंचवड

Post Views: 14
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआम आदमी पार्टीच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदी कविता कोंडे देशमुख
Next Article शेतकऱ्यांना वाढीव मदत करा : प्रा. ज्ञानेश्र्वर बनसोडे
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या शुभहस्ते पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

November 5, 2026

पिंपरी-चिंचवडच्या आशा स्वयंसेविकांसाठी आनंदाची बातमी; दिवाळीनिमित्त मिळणार ७ ते १५ हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहन भत्ता

November 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?