Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»स्वच्छ दिवाळी, हरित दिवाळी आपल्या वस्तू कचऱ्यात न टाकता आर.आर.आर. केंद्रात द्या
पिंपरी चिंचवड

स्वच्छ दिवाळी, हरित दिवाळी आपल्या वस्तू कचऱ्यात न टाकता आर.आर.आर. केंद्रात द्या

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 22, 2026No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पुनर्वापरातून गरजूंना द्या मदतीचा हात

पिंपरी २२ ऑक्टोबर २०२६ : घरातील वापरात नसलेल्या; मात्र सुस्थितीत असलेल्या वस्तूंचा पुनर्वापर व्हावा आणि त्या गरजूंपर्यंत पोहोचाव्यात, या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत ‘आर.आर.आर.’ (रिड्यूस, रियुज, रिसायकल) केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. नागरिकांनी घरातील अडगळ ठरलेल्या वस्तू टाकून न देता या केंद्रांमध्ये जमा कराव्यात, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

घराची साफसफाई करताना जुनी खेळणी, कपडे, पुस्तके, भांडी, फर्निचर तसेच विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांसारख्या वस्तू अनेकदा निरुपयोगी समजून फेकून दिल्या जातात. त्यामुळे कचऱ्याचे प्रमाण वाढण्याबरोबरच सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होतो. या वस्तू सुस्थितीत असल्यास त्यांचा पुनर्वापर करून त्या गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचविता येऊ शकतात. या विचारातून महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आर.आर.आर. केंद्रांचा उपक्रम राबविण्यात येत आहे.

उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल म्हणाले की, आर.आर.आर. केंद्रांचा उपक्रम हा स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी यांचा समन्वय साधणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. घरातील वापरात नसलेल्या; मात्र सुस्थितीत असलेल्या वस्तू कचऱ्यात न टाकता या केंद्रांमध्ये जमा केल्यास त्यांचा पुनर्वापर होऊन त्या गरजू व्यक्तींच्या उपयोगी येऊ शकतात. यामुळे कचऱ्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होण्याबरोबरच नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन आणि पुनर्वापराला प्रोत्साहन मिळेल. विशेषतः दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराची साफसफाई करताना अशा वस्तू फेकून न देता आर.आर.आर. केंद्रांमध्ये जमा कराव्यात. नागरिक आणि गृहसंकुलांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून महापालिकेला सहकार्य करावे. लोकसहभागातूनच स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक पिंपरी चिंचवड शहर घडविणे शक्य आहे.

पुनर्वापरातून स्वच्छतेला हातभार

आर.आर.आर. केंद्रांमध्ये जमा होणाऱ्या वस्तूंचे संकलन करून त्यांचा योग्य पद्धतीने पुनर्वापर केला जातो. त्यामुळे कचऱ्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. तसेच गरजू नागरिकांना उपयोगी वस्तू उपलब्ध होऊन सामाजिक बांधिलकीही जपली जाते. पर्यावरण संवर्धन, कचरा व्यवस्थापन आणि वस्तूंचा पुनर्वापर यांची सांगड घालणाऱ्या या उपक्रमात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे.

या वस्तू जमा करा….

आर.आर.आर. केंद्रांमध्ये पुस्तके, वह्या, शालेय साहित्य, सुस्थितीतील कपडे, चादरी, पडदे, खेळणी, शैक्षणिक साधने, घरगुती साहित्य, भांडी, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, चपला आणि पुनर्वापर करता येण्याजोग्या अन्य वस्तू जमा करता येतील.

शहरातील हद्दीत असणारी आर.आर.आर केंद्रे:

* कापसे उद्यान, मोरवाडी (प्रभाग १०); आकुर्डी भाजी मंडई (प्रभाग १४); संत तुकाराम महाराज उद्यान (प्रभाग १५); श्रीधरनगर उद्यान (प्रभाग १९).

* एसकेएफ कंपनीशेजारी, थेरगाव (प्रभाग १७); हेगडेवार पूल, दर्शननगरी (प्रभाग १८); धर्मराज चौक, रावेत (प्रभाग १६); ज्योतिबा उद्यान, काळेवाडी (प्रभाग २२).

* हेगडेवार क्रीडा संकुल, अजमेरा (प्रभाग ९); धावडे वस्ती, भोसरी (प्रभाग ६); संत सावता महाराज उद्यान, मोशी (प्रभाग २); संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, पिंपळे गुरव (प्रभाग ८).

* लिनियर उद्यान, कोकणे चौक (प्रभाग २८); ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्यान, पिंपळे निलख (प्रभाग २६); तानाजी कलाटे उद्यान, वाकड (प्रभाग २५); प्रभाग कार्यालय क्रमांक २९.

* मोशी चौक (प्रभाग ३); दिघी जकात नाका (प्रभाग ४); राजमाता जिजाऊ उड्डाणपूल, भोसरी (प्रभाग ५ व ७).

* वृंदावन, चिखली (प्रभाग १); भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यान (प्रभाग ११); रूपीनगर पोलीस चौकी (प्रभाग १२); शनि मंदिर, सेक्टर २१ (प्रभाग १३).

* थेरगाव रुग्णालयाशेजारी, जगताप नगर (प्रभाग २३); मोरू बारणे उद्यान, थेरगाव (प्रभाग २४); पिंपरी गाव बसथांबा (प्रभाग २१); आरोग्य कोठी, रहाटणी गावठाण (प्रभाग २७).

* छत्रपती शिवाजी महाराज गोल मंडई, संत तुकाराम नगर (प्रभाग २०); सितांगण उद्यान (प्रभाग ३०); कै. काळुराम जगताप तलाव (प्रभाग ३१); जुनी सांगवी भाजी मंडई (प्रभाग ३२).

आपल्या घरातील वस्तू जमा करण्यासाठी साधा संपर्क

नागरिकांनी तसेच गृह निर्माण संस्थांनी घरातील वापरात नसलेल्या, मात्र सुस्थितीत असलेल्या वस्तू कचऱ्यात न टाकता पुनर्वापरासाठी द्याव्यात. अशा वस्तू संकलित करण्यासाठी ७०३०९०१९९३ / ९१६८६८४६७० या क्रमांकावर संपर्क साधावा. घरातील सुस्थितीत असलेल्या वस्तू समाजातील गरजू व्यक्तींच्या उपयोगी आणून पुनर्वापराची साखळी अधिक मजबूत करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

“स्वच्छ, सुंदर आणि हरित शहर घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. घरातील वापरात नसलेल्या; मात्र सुस्थितीत असलेल्या वस्तू कचऱ्यात न टाकता आर.आर.आर. केंद्रात जमा केल्यास त्यांचा पुनर्वापर करून त्या गरजू व्यक्तींच्या उपयोगी आणता येतील. यामुळे कचऱ्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, पर्यावरणाचे संवर्धन होईल आणि गरजू बांधवांनाही आवश्यक वस्तू उपलब्ध होतील. विशेषतः दिवाळीच्या सणानिमित्त घराची साफसफाई करताना नागरिकांनी जुन्या कपड्यांपासून पुस्तके, खेळणी, भांडी, फर्निचर आणि इतर सुस्थितीतील वस्तू फेकून न देता त्या आर.आर.आर. केंद्रांमध्ये जमा कराव्यात. वस्तूंचा पुनर्वापर करणे ही केवळ स्वच्छतेची बाब नसून, पर्यावरणाप्रती असलेली जाणीव आणि सामाजिक जबाबदारी जपण्याची संधी आहे. नागरिकांनी तसेच गृहसंकुलांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून महापालिकेला सहकार्य करावे. लोकसहभागातून पुनर्वापराची साखळी अधिक मजबूत करून स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि शाश्वत पिंपरी चिंचवड शहर घडविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा”

—डॉ.विजय सूर्यवंशी,आयुक्त,पिंपरी चिंचवड महानगरपालिका 

“आर.आर.आर. केंद्रांच्या माध्यमातून जुन्या वस्तूंना नव्याने उपयोगात आणण्याची संधी उपलब्ध होत असून, हा उपक्रम पर्यावरण रक्षणासोबतच सामाजिक संवेदनशीलतेलाही चालना देणारा आहे. घरात वापरात नसलेल्या; परंतु चांगल्या स्थितीत असलेल्या वस्तू गरजूंपर्यंत पोहोचवून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करता येऊ शकतो. त्याचबरोबर अनावश्यक वस्तू कचऱ्यात जाण्याचे प्रमाण कमी होऊन पुनर्वापराची सवय रुजण्यास मदत होईल. दिवाळीनिमित्त घराची स्वच्छता करताना नागरिकांनी अशा वस्तू टाकून देण्याऐवजी आर.आर.आर. केंद्रांकडे जमा कराव्यात. गृहसंकुले आणि नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन वस्तूंचा सुयोग्य वापर आणि पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा. वस्तूंचा पुनर्वापर, पर्यावरणाचे संरक्षण आणि गरजूंना मदत या त्रिसूत्रीतून स्वच्छ, सुंदर व शाश्वत पिंपरी चिंचवड शहराच्या निर्मितीला हातभार लावूया”

—-कुलदीप जंगम.अतिरिक्त आयुक्त,पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Post Views: 12
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमुंबईकरांचा प्रवास होणार सुसाट! तीन पुलांचे लोकार्पण; ‘५९ मिनिटांत मुंबई’ संकल्पनेला गती
Next Article वाकडमधील मानकर चौक ते छत्रपती चौक मार्ग वाहतुकीसाठी बंद!
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या शुभहस्ते पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

November 5, 2026

पिंपरी-चिंचवडच्या आशा स्वयंसेविकांसाठी आनंदाची बातमी; दिवाळीनिमित्त मिळणार ७ ते १५ हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहन भत्ता

November 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?