Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»राजमाता जिजाऊ उद्यानातील ओपन जिम सहा महिन्यांपासून नादुरुस्त; भटक्या कुत्र्यांचाही वावर!
पिंपरी चिंचवड

राजमाता जिजाऊ उद्यानातील ओपन जिम सहा महिन्यांपासून नादुरुस्त; भटक्या कुत्र्यांचाही वावर!

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 14, 2026Updated:October 14, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

उद्यान विभागाचे दुर्लक्ष; जबाबदारी निश्चित कोण करणार? अण्णा जोगदंड यांचा संतप्त सवाल

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) : पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानातील ओपन जिमचे साहित्य गेल्या सहा महिन्यांपासून नादुरुस्त असून, उद्यानात भटक्या कुत्र्यांचाही मुक्त वावर असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही दुरुस्ती होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित अधिकारी एकमेकांकडे जबाबदारी ढकलत असल्याचा आरोप मानवी हक्क संरक्षण जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी केला आहे.

जोगदंड म्हणाले की, मी स्वतः दररोज पहाटे या उद्यानात जातो. त्यामुळे उद्यानातील समस्यांची मला प्रत्यक्ष माहिती आहे. ओपन जिममधील साहित्य गेल्या सहा महिन्यांपासून नादुरुस्त आहे. नागरिकांनी अनेकदा कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली; मात्र अद्याप दुरुस्ती करण्यात आलेली नाही. यावरून उद्यान विभागाचे या समस्येकडे किती अक्षम्य दुर्लक्ष होत आहे, हे स्पष्ट होते.

अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवतात; नागरिकांनी दाद कोणाकडे मागायची?

ओपन जिमच्या नादुरुस्त साहित्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, प्रत्येकाकडून वेगवेगळी उत्तरे मिळाल्याचे जोगदंड यांनी सांगितले. उद्यान सहाय्यक अधीक्षक राजेश वसावे यांनी संबंधित कर्मचाऱ्यांशी बोलून काम करून घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर उद्यान विभागाचे सुपरवायझर अजय जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, ओपन जिमचे काम ड प्रभागाच्या क्रीडा विभागाकडे असल्याचे सांगून त्यांनी दुसऱ्या विभागाशी संपर्क साधण्यास सांगितले.

त्यानंतर ड प्रभागाचे उद्यान पर्यवेक्षक अशोक शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनीही काम करून देण्याचे आश्वासन दिले. मात्र, प्रत्यक्षात दुरुस्ती कधी होणार, याबाबत स्पष्टता नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

“प्रत्येक अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत आहे; मग या कामाची खरी जबाबदारी कोणाची? सर्वसामान्य नागरिकांनी तक्रार नेमकी कोणाकडे करायची? प्रशासनाने नागरिकांना अशा प्रकारे हेलपाटे मारायला लावणे योग्य आहे का?” असा संतप्त सवाल अण्णा जोगदंड यांनी उपस्थित केला.

उद्यानात भटक्या कुत्र्यांचा वावर; नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न

यावेळी पंडित वनस्कर यांनीही उद्यानातील समस्यांकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, मीदेखील दररोज सकाळी उद्यानात जातो. उद्यानात भटकी कुत्री फिरताना दिसतात. काही वेळा ही कुत्री नागरिकांच्या अंगावर धावून जात असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

उद्यानाभोवती संरक्षक उंच भिंत असतानाही मुख्य प्रवेशद्वारातून भटकी कुत्री आत प्रवेश करतातच कशी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. उद्यान विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून ओपन जिमच्या साहित्याची तातडीने दुरुस्ती करावी, तसेच भटक्या कुत्र्यांचा प्रवेश रोखण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालण्याची मागणी

राजमाता जिजाऊ उद्यान हे परिसरातील नागरिकांसाठी व्यायाम आणि विरंगुळ्याचे महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे उद्यानातील व्यायामाचे साहित्य सुस्थितीत ठेवणे, स्वच्छता राखणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे ही संबंधित प्रशासनाची जबाबदारी आहे. सहा महिन्यांपासून ओपन जिमची दुरुस्ती रखडणे आणि भटक्या कुत्र्यांचा वावर सुरू राहणे, या बाबींकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी मानवी हक्क संरक्षण जागृतीच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

यावेळी शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी, सचिव गजानन धाराशिवकर, महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड, शहराध्यक्षा संजना करंजावणे, काळुराम लांडगे, पंडित वनस्कर आणि आदेश जोमवाळे उपस्थित होते.

 

Post Views: 10
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article२.७७ कोटींच्या रेडिओग्राफी मशीनच्या किमतीवर प्रश्नचिन्ह!
Next Article कुदळे फाउंडेशनतर्फे तुळजाई फाउंडेशनला ई-स्कूटर भेट
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या शुभहस्ते पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

November 5, 2026

पिंपरी-चिंचवडच्या आशा स्वयंसेविकांसाठी आनंदाची बातमी; दिवाळीनिमित्त मिळणार ७ ते १५ हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहन भत्ता

November 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?