Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»चिंचवड ‘झिरो गार्बेज झोन’ करण्याचा निर्धार
पिंपरी चिंचवड

चिंचवड ‘झिरो गार्बेज झोन’ करण्याचा निर्धार

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 8, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

कचरा, अतिक्रमण, अनधिकृत फलक, हॉकर्स व आठवडे बाजारांवर कायमस्वरूपी उपाय; आमदार शंकर जगताप यांचे प्रशासनाला निर्देश

पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी : चिंचवड मतदारसंघातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासोबतच कचरा, अतिक्रमणे, अनधिकृत फलक, हॉकर्स आणि आठवडे बाजारांच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार शंकर जगताप यांनी महापालिका प्रशासनाला कृती आराखडा निश्चित करून दिला. चिंचवड मतदारसंघ ‘झिरो गार्बेज झोन’ करण्याचा निर्धार करत, वारंवार कचरा साचणारे ‘क्रॉनिक स्पॉट’ शोधून ते कायमस्वरूपी कचरामुक्त करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले.

आमदार जगताप यांच्या संपर्क कार्यालयात गुरुवारी (दि. ८) चिंचवड मतदारसंघातील विविध नागरी प्रश्नांबाबत क्षेत्रीय अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी स्वच्छता, अतिक्रमण, हॉकर्स झोन आणि आठवडे बाजारांच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

या बैठकीला ड व ज क्षेत्रीय कार्यालयाच्या अश्विनी गायकवाड, ह क्षेत्रीय कार्यालयाचे संतोष कोराड, ग क्षेत्रीय कार्यालयाचे मुकेश कोळप आणि ब क्षेत्रीय कार्यालयाचे गोरखनाथ निम्हण उपस्थित होते.

मतदारसंघातील ज्या ठिकाणी वारंवार कचरा साचतो, अशा ‘क्रॉनिक स्पॉट’ची क्षेत्रनिहाय यादी तयार करावी. या ठिकाणी केवळ कचरा उचलण्यापुरती कारवाई न करता पुन्हा कचरा साचणार नाही, यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जगताप यांनी दिले. सार्वजनिक ठिकाणे, स्मशानभूमी परिसर आणि सार्वजनिक शौचालयांची नियमित स्वच्छता राखण्याबरोबरच स्वच्छतेसाठी नियुक्त कंत्राटी कर्मचाऱ्यांची उपस्थिती आणि प्रत्यक्ष कामाची तपासणी करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

उड्डाणपूल, भिंती आणि सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे स्टिकर्स चिकटविणाऱ्यांवर तसेच बेकायदेशीर होर्डिंग लावणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, असे जगताप यांनी स्पष्ट केले. नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत राहण्यासाठी पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यावरही त्यांनी भर दिला.

हॉकर्स झोन निश्चित करताना केवळ जागा उपलब्ध आहे म्हणून निर्णय न घेता तांत्रिक बाबी, वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांची सुरक्षितता यांचा विचार करावा, अशी सूचना जगताप यांनी केली. दिव्यांग, महिला, विधवा आणि परितक्ता यांना विशेष प्राधान्य व आरक्षणाचा विचार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

पदपथ किंवा मोकळ्या शासकीय जागांवर आठवडे बाजार भरू नयेत, याची दक्षता घेण्याचे निर्देश देतानाच खासगी जागेत बाजार भरविणाऱ्या आयोजकांनी पुरेशी पार्किंग व्यवस्था करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सणासुदीच्या काळात वाढणारी नागरिकांची वर्दळ लक्षात घेऊन कचरा, वाहतूक कोंडी आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आगाऊ नियोजन करावे, असेही जगताप यांनी सांगितले.

चिंचवडची स्वच्छता, वाहतूक आणि नागरी व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी प्रशासनाने केवळ तात्पुरत्या उपाययोजना न करता परिणामकारक आणि सातत्यपूर्ण कारवाई करावी, अशी स्पष्ट भूमिका आमदार शंकर जगताप यांनी बैठकीत मांडली.

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article‘खड्ड्यांत शहर, मग सायकल स्पर्धेसाठी कोट्यवधींची उधळपट्टी कशासाठी?’
Next Article ‘ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा; एसआयआर प्रक्रिया रद्द करा’
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या शुभहस्ते पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

November 5, 2026

पिंपरी-चिंचवडच्या आशा स्वयंसेविकांसाठी आनंदाची बातमी; दिवाळीनिमित्त मिळणार ७ ते १५ हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहन भत्ता

November 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?