Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाच्या ४३० कोटींच्या निविदेवर प्रश्नचिन्ह
पिंपरी चिंचवड

इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाच्या ४३० कोटींच्या निविदेवर प्रश्नचिन्ह

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 28, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

जागा पूर्णपणे ताब्यात नसताना वर्क ऑर्डर देण्यास मारुती भापकर यांचा आक्षेप; निविदा रद्द करून चौकशीची मागणी

पिंपरी, दि. २८ सप्टेंबर २०२६ : केंद्र सरकारच्या ‘अमृत २.०’ अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या १८.५० किलोमीटर लांबीच्या इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आलेल्या सुमारे ४३० कोटी ७५ लाख रुपयांच्या निविदा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. प्रकल्पासाठी आवश्यक असलेली संपूर्ण जमीन अद्याप महापालिकेच्या ताब्यात आलेली नसताना निविदेला मंजुरी देऊन कंत्राटदाराला कामाचे आदेश देणे घाईगडबडीचे व संशयास्पद असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती साहेबराव भापकर यांनी केला आहे.

याबाबत भापकर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन देऊन सदर निविदा व वर्क ऑर्डर तातडीने रद्द करावी, तसेच संपूर्ण प्रक्रियेची उच्चस्तरीय निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

भापकर यांच्या निवेदनानुसार, प्रकल्पासाठी मौजे तळवडे, चिखली, बोऱ्हाडेवाडी, मोशी, डुडुळगाव व चऱ्होली बुद्रुक परिसरातील सुमारे ३६ लाख १७ हजार चौरस मीटर जमीन आवश्यक आहे. मात्र, या जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया अद्याप विविध प्रशासकीय स्तरांवर प्रलंबित असल्याचा दावा त्यांनी केला आहे. स्थायी समितीच्या दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजीच्या सभेतील विषय क्रमांक ६ कडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

दरम्यान, तत्कालीन महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी या प्रकल्पासाठी १०० टक्के जागा ताब्यात असल्याचे राज्य शासनाला लेखी कळविले असल्याचे भापकर यांनी निवेदनासोबत नमूद केले आहे. प्रत्यक्षात जमीन संपादनाची प्रक्रिया प्रलंबित असल्यास या दोन्ही बाबींमध्ये विसंगती असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अटींनुसार प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण करणे अपेक्षित असल्याचे सांगत भापकर यांनी प्रकल्प सुरू करण्यापूर्वी आवश्यक जमीन व वैधानिक परवानग्या उपलब्ध असणे गरजेचे असल्याचे नमूद केले आहे. जागेअभावी काम रखडल्यास प्रकल्पाच्या कालावधीवर परिणाम होण्याबरोबरच भविष्यात वाढीव खर्चाचा भार महापालिकेवर पडण्याची शक्यता असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.

‘पवना बंद जलवाहिनीप्रमाणे हा प्रकल्पही भविष्यात आर्थिकदृष्ट्या बोजा ठरू नये,’ अशी भूमिका घेत भापकर यांनी प्रशासनाने सर्व बाबींची पडताळणी करूनच पुढील कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.

भापकर यांच्या प्रमुख मागण्या…

१)प्रकल्पासाठी आवश्यक जमीन पूर्णपणे ताब्यात येईपर्यंत आणि सर्व वैधानिक परवानग्या प्राप्त होईपर्यंत ४३० कोटी ७५ लाख रुपयांची निविदा व देण्यात आलेली वर्क ऑर्डर रद्द करावी.

२)जमीन ताब्यात नसताना निविदा प्रक्रिया राबवून वर्क ऑर्डर देण्यामागील कारणांची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करावी.

३)प्रशासनाची दिशाभूल करणारे अहवाल अथवा कागदपत्रे सादर केल्याचे आढळल्यास संबंधित सल्लागार, कंत्राटदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी.

४)शासनाचा निधी आणि नागरिकांच्या करातून जमा होणाऱ्या निधीचा काटेकोर व पारदर्शक वापर सुनिश्चित करावा. 

या प्रकरणात महापालिका प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी भापकर यांनी केली आहे.

Post Views: 23
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleघरकुल लाभार्थ्यांची रोजगार हमीची अकुशल मजुरी रखडली
Next Article विस्डम इन मोशन फोरमच्या संकेत स्थळाचे सामाजिक न्याय मंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?