Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»विसर्जन घाटांवर महापालिकेकडून स्वच्छतेची तत्पर यंत्रणा
पिंपरी चिंचवड

विसर्जन घाटांवर महापालिकेकडून स्वच्छतेची तत्पर यंत्रणा

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 28, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

चार दिवसांत ६५०० मेट्रिक टन कचरा संकलित; २९४ मेट्रिक टन निर्माल्याचे स्वतंत्र संकलन

पिंपरी, दि. २७ सप्टेंबर २०२६ : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील विसर्जन घाट तसेच मिरवणूक मार्गांवर स्वच्छता, कचरा संकलन आणि निर्माल्य विलगीकरणाची विशेष यंत्रणा राबविण्यात आली. २२ ते २५ सप्टेंबर या चार दिवसांत तब्बल ६५०० मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला. यासाठी सुमारे तीन हजारांहून अधिक सफाई सेवक प्रत्यक्ष मैदानात कार्यरत होते.

विसर्जन घाट आणि मिरवणूक मार्गांवर निर्माण होणारा कचरा तातडीने हटविण्यासाठी आरोग्य विभागाच्या स्वच्छता पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. विसर्जनाच्या दिवशी मोठी गर्दी असतानाही स्वच्छता पथकांनी सातत्याने काम करून घाट परिसर आणि मिरवणूक मार्ग स्वच्छ ठेवले.

दरम्यान, गणेशमूर्तींना वाहण्यात आलेली फुले, हार तसेच पूजासाहित्यापासून निर्माण झालेले २९४.६५५ मेट्रिक टन निर्माल्य स्वतंत्रपणे संकलित करण्यात आले. निर्माल्य कचऱ्यात मिसळू नये, यासाठी विसर्जन घाटांवर स्वतंत्र निर्माल्य संकलन आणि विलगीकरणाची व्यवस्था आरोग्य विभागाकडून करण्यात आली होती.

विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही स्वच्छता सेवकांनी तत्परतेने काम सुरू ठेवत घाट परिसर तसेच मिरवणूक मार्गांची स्वच्छता केली. त्यामुळे विसर्जनानंतरची स्वच्छता व्यवस्था सुरळीत आणि प्रभावीपणे राबविण्यात आली.

 “गणेशोत्सव आणि विसर्जन काळात शहरातील स्वच्छता व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आरोग्य विभागाची पथके सातत्याने कार्यरत होती. घाट परिसरात नागरिकांना स्वच्छतेच्या सुविधा तत्परतेने मिळाव्यात, यासाठी स्वच्छता पथके प्रत्यक्ष ठिकाणी कार्यरत राहिली. यापुढे ही नागरिकांनीही आपला कचरा रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी न टाकता त्याचे योग्य विलगीकरण करून महापालिकेच्या संकलन व्यवस्थेकडे द्यावा. शहराची स्वच्छता राखणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे”
….उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल.

गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांनी महापालिकेच्या स्वच्छता यंत्रणेला दिलेल्या सहकार्यामुळे विसर्जनानंतरची स्वच्छता व्यवस्था सुरळीतपणे राबविण्यास मदत झाली. शहराची स्वच्छता कायम राखण्यासाठी यापुढेही नागरिकांनी महापालिकेच्या स्वच्छता यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

“गणेश विसर्जनाच्या कालावधीत नागरिकांनी स्वच्छता राखण्यासाठी महापालिकेच्या यंत्रणेला दिलेले सहकार्य अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले. अनेक नागरिकांनी निर्माल्य स्वतंत्रपणे जमा करून कचरा योग्य ठिकाणी देण्यास प्राधान्य दिल्यामुळे घाट परिसर आणि मिरवणूक मार्गांवरील स्वच्छता व्यवस्था सुरळीत ठेवण्यास मदत झाली. स्वच्छतेबाबत नागरिकांनी दाखविलेली ही जागरूकता आणि सहकार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. त्याचबरोबर, मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेला कचरा तातडीने संकलित करून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सातत्याने कार्यरत राहिलेल्या सर्व सफाई सेवक व आरोग्य विभागाच्या पथकांचे काम कौतुकास पात्र असून, नागरिक आणि महापालिका यंत्रणेच्या समन्वयातून स्वच्छतेची ही व्यवस्था प्रभावीपणे राबविता आली”
-डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
Post Views: 10
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleविद्यार्थ्यांनी रेखाटला ‘स्वप्नातला भारत’!
Next Article महापालिका क्षेत्रात सुमारे १ लाख ४१ हजार २४६ गणेशमूर्तींचे संकलन; पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला नागरिकांचा प्रतिसाद
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?