Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»भोसरी परिसरात गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात
पिंपरी चिंचवड

भोसरी परिसरात गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 25, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

गणेशभक्तांच्या अलोट गर्दीत गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन; पारंपरिक वाद्यांसह विविध रथांनी वेधले लक्ष

पिंपरी, दि. २५ सप्टेंबर २०२६ : भोसरी परिसरातील गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींची विसर्जन मिरवणूक गुरुवार, दि. २४ सप्टेंबर रोजी उत्साहपूर्ण, भक्तिमय आणि शांततामय वातावरणात पार पडली. ढोल-ताशा, ढोल-लेझीम, पारंपरिक वाद्ये तसेच डीजेच्या गजरात गणरायाचा जयजयकार करत गणेशभक्त मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भोसरी येथील बापूजी बुवा चौकात गणेश विसर्जन मिरवणुकीतील मंडळांच्या स्वागतासाठी भव्य स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. या ठिकाणी गणेश मंडळांच्या अध्यक्षांचा सहाय्यक अतुल पाटील, विशेष अधिकारी किरण गायकवाड आणि कार्यकारी अभियंता किरण अंदुरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

भोसरी येथील स्वागत कक्षाच्या ठिकाणी पहिली गणेश विसर्जन मिरवणूक दुपारी दीड वाजेच्या सुमारास दाखल झाली. वीर हनुमान मित्र मंडळ, भोसरी गावठाण या मंडळाने विसर्जन मिरवणुकीला सुरुवात केली. त्यानंतर विविध गणेश मंडळांच्या मिरवणुका मार्गस्थ झाल्या. शेवटची गणेशमूर्ती विघ्नहर्ता मित्र मंडळ, विठ्ठल नगर, लांडेवाडीची गणेश विसर्जन मिरवणूक भोसरी येथील स्वागत कक्षाच्या ठिकाणाहून पुढे मार्गस्थ झाली.

या विसर्जन मिरवणुकीत वीर हनुमान मित्र मंडळ, लोंढे तालीम मित्र मंडळ, श्री कानिफनाथ मित्र मंडळ, नव महाराष्ट्र तरुण मंडळ, हिंदवी स्वराज्य तरुण मित्र मंडळ अँड ट्रस्ट, फुगे माने तालीम मंडळ, धर्मवीर संभाजी मित्र मंडळ, छत्रपती श्री शिवाजी तरुण मित्र मंडळ, कै. दामू शेठ गव्हाणे मित्र मंडळ, लांडगे लिंबाची तालीम मंडळ, नरवीर तानाजी मित्र मंडळ, पठारे लांडगे तालीम व्यायाम मंडळ, जय मल्हार मित्र मंडळ, खंडोबा मित्र मंडळ, मधले फुगे तालीम मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ, गव्हाणे तालीम मित्र मंडळ, भगवान गव्हाणे मित्र मंडळ, विनर्स मित्र मंडळ, नाथसाहेब प्रतिष्ठान, महात्मा फुले मित्र मंडळ, भोलेश्वर मित्र मंडळ, युवा सारथी मित्र मंडळ आणि विघ्नहर्ता मित्र मंडळ आदी गणेश मंडळांनी सहभाग घेतला.

मिरवणुकीदरम्यान विविध गणेश मंडळांनी सादर केलेले आकर्षक रथ, देखावे आणि पारंपरिक वाद्यवृंदांनी गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेतले. छत्रपती श्री शिवाजी तरुण मंडळाच्या राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या रथाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधले. पठारे लांडगे लिंबाची तालीम व्यायाम मंडळाचा विद्युत रोषणाईने सजवलेला रथही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. लांडेवाडी येथील नव महाराष्ट्र तरुण मंडळाने जगन्नाथ रथासह पारंपरिक केरळी कलाकारांच्या वाद्यवृंदासह काढलेल्या मिरवणुकीने उत्साहात भर घातली.

गणेश मंडळांचे स्वागत करण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता किरण अंदुरे यांच्यासह कार्यालयीन अधीक्षक शिवाजी खेडेकर, कार्यकारी अभियंता बाळू लांडे, उपअभियंता राजीव गाटुले, नीलेश केदार, कनिष्ठ अभियंता राधवेंद्र धर्मा कांबळे, मुख्य लिपिक धर्मा गंभीर, इस्माईल शेख, किशोर केदारी, प्रदीप गायकवाड, उमेश जगताप, जयश्री भागवत, राधिका पिंगळे, विद्या कवडे, भानुदास तापकीर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आवश्यक नागरी सुविधा, स्वच्छता, निर्माल्य संकलन तसेच नागरिकांच्या सोयीसाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती. भोसरी पोलीस, वाहतूक शाखा, सीआरपीएफचे जवान तसेच संबंधित क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मिरवणूक सुरळीत आणि शांततेत पार पडण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली. गणेश विसर्जन मिरवणुक स्वागत कक्षामध्ये सूत्रसंचालन किशोर केदारी यांनी केले.

Post Views: 10
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleअनंत चतुर्दशी रोजी होणा-या विसर्जन सोहळ्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका सज्ज
Next Article विद्यार्थ्यांनी रेखाटला ‘स्वप्नातला भारत’!
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?