Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»स्टार बाजारमधील महागड्या वस्तू चोरणाऱ्या टोळीला अटक
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

स्टार बाजारमधील महागड्या वस्तू चोरणाऱ्या टोळीला अटक

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 23, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

चार महिला, तीन पुरुष ताब्यात; इनोवा कारसह ७ लाख २१ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी : स्टार बाजारच्या विविध शाखांमध्ये महागड्या खाद्यपदार्थांची चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा वाकड पोलिसांनी छडा लावला आहे. या कारवाईत चार महिला व तीन पुरुषांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून इनोवा कारसह तूप, बदाम, काजू तसेच अन्य चोरीचा मुद्देमाल असा एकूण ७ लाख २१ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील दत्त मंदिर रोडवरील यशवंत बिल्डिंगमधील स्टार बाजार येथे २९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी चोरीची घटना घडली होती. तसेच कलाटे वस्ती येथील स्टार बाजारमध्येही यापूर्वी अशाच प्रकारे चोरी झाली होती. या घटनांमध्ये गोवर्धन घीचे पाऊच, बदाम, काजू तसेच अन्य खाद्यपदार्थ असा सुमारे ४२ हजार १०० रुपयांचा माल चोरीला गेला होता. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करताना तपास पथकाने घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित वाहनाचा माग काढण्यात आला. गुन्ह्यात वापरलेली इनोवा कार मुंबईच्या दिशेने गेल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर हे वाहन पुन्हा पिंपरी-चिंचवडच्या दिशेने आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेतला.

त्यानुसार ताथवडे-वाकड परिसरात इनोवा कार आढळून आली. त्यासोबत ऑटो रिक्षाही असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. वाहनांमधील व्यक्तींची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी रविकांत देवानंद जाकरे (वय ३२), ब्रिजेश सिताराम मदेशिया (वय २७), ब्रिजेश बालू यादव (वय ३४), सोनग बाबू शेख (वय ३४), रालमा शकिल शेख (वय ५१), सानिया वायुमिया शेख (वय २०) आणि रुमा ब्रिजेश मदेशिया (वय २७) यांना अटक केली. ही कारवाई ३१ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आली.

पोलिसांनी आरोपींची पोलीस कोठडी मिळवून पुढील तपास केला. तपासादरम्यान त्यांनी पिंपरी व चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्टार बाजारमध्येही अशाच प्रकारच्या चोऱ्या केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच काटे-पिंपळे येथील स्टार बाजार आणि केसनंद फाटा, वाघोली येथील स्टार बाजारमधूनही काजू, बदाम व तुपाच्या पाऊचची चोरी केल्याची माहिती तपासात समोर आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

आरोपींकडून वाकड, पिंपरी आणि चिखली पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील दाखल गुन्ह्यांशी संबंधित तूप, बदाम, काजू तसेच गुन्ह्यासाठी वापरलेली वाहने असा एकूण ७,२१,९६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

आरोपी हे यापूर्वी अशाच प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे पोलिसांनी सांगितले असून, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, मुंबई तसेच महाराष्ट्रातील अन्य भागांमध्येही त्यांनी अशाच प्रकारच्या चोऱ्या केल्या आहेत का, याबाबत पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड व बसवराज तेली, पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव आणि सहायक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकुल साळुंखे, सहायक पोलीस निरीक्षक श्रीनिवास दराडे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मारणे तसेच तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक श्रीनिवास दराडे करीत आहेत.

Post Views: 15
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमोठ्या थकबाकीदार मालमत्तांवर ३० सप्टेंबरनंतर जप्तीची कारवाई करा – आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी
Next Article महाराष्ट्र सदनातील पाककला स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी

September 24, 2026

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून गणेशोत्सव-२०२६ची यशस्वी सांगता

September 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?