Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»मोठ्या थकबाकीदार मालमत्तांवर ३० सप्टेंबरनंतर जप्तीची कारवाई करा – आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी
पिंपरी चिंचवड

मोठ्या थकबाकीदार मालमत्तांवर ३० सप्टेंबरनंतर जप्तीची कारवाई करा – आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 23, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

मालमत्ता कर वसुलीबाबत झाली आढावा बैठक

पिंपरी, …... पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत समावेश असणाऱ्या ज्या मालमत्तांवर मोठ्या प्रमाणात मालमत्ता कराची थकबाकी आहे, अशा मालमत्तांवर ३० सप्टेंबर २०२६ नंतर जप्तीची कारवाई करण्यात यावी, असे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. अशी कारवाई प्राधान्याने औद्योगिक, बिगरनिवासी, मिश्र तसेच इतर मालमत्तांवर करण्यात यावी, असेदेखील ते म्हणाले.

महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या करवसुलीबाबतची आढावा बैठक आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त सचिन पवार यांच्यासह सर्व प्रशासन अधिकारी तसेच सहायक मंडलाधिकारी उपस्थित होते.

मालमत्ता कर वसुली, मालमत्ता हस्तांतरण, चालू वर्षातील नवीन मालमत्तांची कर आकारणी, थकबाकीदार मालमत्ताधारक तसेच फुगीर मागणी याबाबत विभागनिहाय माहिती बैठकीत घेण्यात आली. करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करून वसुलीची कार्यवाही अधिक गतिमान करण्याच्या सूचना आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी दिल्या.

३० सप्टेंबरनंतर थकबाकीदार मालमत्तांवर जप्तीची प्रक्रिया प्रभावीपणे राबवताना प्राधान्याने मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर थकीत असलेल्या औद्योगिक, बिगरनिवासी, मिश्र तसेच इतर मालमत्तांवर नियमानुसार जप्तीची कारवाई करावी. थकबाकीदार मालमत्ताधारकांकडून कर वसुलीसाठी आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही प्रभावीपणे राबवावी, तसेच विभागनिहाय नियोजन करून करवसुलीची कार्यवाही अधिक गतिमान करावी, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

दरम्यान, शहरातील अनधिकृत बांधकामांवर बारकाईने लक्ष ठेवून नियमानुसार आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. नवीन बांधकामांची माहिती संकलित करून पात्र मालमत्तांची कर आकारणी करण्याची कार्यवाही तातडीने करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता कराची वसुली वाढविण्यासाठी विभागनिहाय नियोजन, थकबाकीदारांचा सातत्याने पाठपुरावा आणि प्रभावी वसुली मोहीम राबविण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

मालमत्ता कराच्या ४ टक्के सवलतीसाठी शेवटचे ८ दिवस!

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मालमत्ता करावर ऑनलाइन कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांना सामान्य करात ४ टक्के सवलत जाहीर केली आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी आता शेवटचे ८ दिवस शिल्लक असून ३० सप्टेंबर २०२६ ही सवलत मिळण्याची अंतिम तारीख आहे. आतापर्यंत ५९२ कोटी ७४ लाख मालमत्ता कर संकलित करण्यात आला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मालमत्ताधारकांनी मुदत संपण्यापूर्वी आपला मालमत्ता कर ऑनलाइन भरून ४ टक्के सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post Views: 11
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleगणेशोत्सवानिमित्त राबविण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या जागतिक मोहिमेसाठी महापालिकेच्या वतीने प्रफुल्ल पुराणिक यांची नोडल अधिकाऱी पदी नियुक्ती
Next Article स्टार बाजारमधील महागड्या वस्तू चोरणाऱ्या टोळीला अटक
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?