Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा ४४ वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा होणार
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा ४४ वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा होणार

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 17, 2026No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

विकासप्रवासाचा आढावा,अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव; सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांचे आयोजन

पिंपरी, दि. १७ सप्टेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा ४४ वा वर्धापन दिन विविध सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा तसेच अधिकारी-कर्मचारी केंद्रित उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या विकासात्मक वाटचालीचा आढावा घेणे, शहराच्या विकासात योगदान देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करणे तसेच नागरिकाभिमुख प्रशासन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. महापौर रवि लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धापन दिनाच्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे.

महानगरपालिकेचा वर्धापन दिन दरवर्षी ११ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो. यंदा ११ ऑक्टोबर रोजी रविवार व साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे मुख्य वर्धापन दिन कार्यक्रम सोमवार, दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे. महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारत, पिंपरी तसेच प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन प्रस्तावित आहे.

वर्धापन दिनाच्या पूर्वतयारी व नियोजनासंदर्भात महापौर रवि लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली. बैठकीस सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, कला, क्रीडा, सांस्कृतिक व पर्यटन समितीचे सभापती कैलास कुटे, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, प्रभाग अध्यक्ष निखील बो-हाडे, नगरसदस्य राजू मिसाळ, विकास साने, निलेश तरस, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उपायुक्त पंकज पाटील, विशेष अधिकारी किरण गायकवाड, उपायुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच शशिकांत झिंजुर्डे, उमेश बांदल, मंगेश कलापुरे, चंद्रशेखर गावडे, नितीन समगीर, लाला गाडे, विश्वनाथ लांडगे, राजाराम लांडे, मदन चिंचवडे, किशोर आठवाल, अनिल लखन आणि राकेश चव्हाण आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहराच्या गेल्या ४४ वर्षांच्या विकासामध्ये महानगरपालिकेची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराचा आधुनिक व विकसित शहराच्या दिशेने झालेला प्रवास हा नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सामूहिक सहभागातून साध्य झाला आहे. या विकासप्रवासाचा आढावा घेण्यासोबतच आगामी काळातील शहराच्या गरजा लक्षात घेऊन नागरिककेंद्रित, पारदर्शक, गतिमान आणि गुणवत्तापूर्ण प्रशासन अधिक सक्षम करण्याचा संकल्प वर्धापन दिनाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे.

 “पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा ४४ वा वर्धापन दिन हा शहराच्या विकासात्मक वाटचालीचा आढावा घेण्याबरोबरच या प्रवासात योगदान देणाऱ्या प्रत्येक घटकाच्या कार्याची दखल घेण्याचा महत्त्वपूर्ण प्रसंग आहे. नागरिकांचा सहभाग, लोकप्रतिनिधींचे सहकार्य आणि महानगरपालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नातून शहराच्या विकासाला सातत्याने गती मिळाली आहे. आगामी काळात शहराच्या वाढत्या गरजा आणि नागरिकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन अधिक सक्षम, गतिमान, पारदर्शक व नागरिकाभिमुख प्रशासन देण्यास प्राधान्य राहील. वर्धापन दिनाच्या निमित्ताने अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासोबतच विविध सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांमधून त्यांचा सहभाग वाढविण्यात येणार आहे.”

…..महापौर रवि लांडगे. पिंपरी चिंचवड 

वर्धापन दिनानिमित्त नगरीचे शिल्पकार अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. यासोबत रक्तदान शिबिर, महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी विशेष उपक्रम, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी चहापान व अल्पोपहार, कर्मचारी ऑर्केस्ट्रा, गुणवंत अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार तसेच विविध स्पर्धांतील विजेत्यांचा गौरव आदी कार्यक्रमांचे आयोजन प्रस्तावित आहे.

महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पाककला व रांगोळी स्पर्धांसह विविध सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच संगीत खुर्ची, रस्सीखेच व अन्य क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. फॅन्सी ड्रेस, पाककला, रांगोळी तसेच अन्य स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात येणार असून अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सहभागातून सादर करण्यात येणारा सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्याचे नियोजन आहे.

महानगरपालिकेच्या विविध कार्यालये व विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवड करून त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्मानित करण्याचे प्रस्तावित आहे. महानगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजात प्रभावी योगदान देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या कार्यक्षमतेस प्रोत्साहन देण्याचा यामागील उद्देश आहे.

वर्धापन दिनाच्या कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधित विभागांना विभागनिहाय जबाबदाऱ्या सोपविण्यात येणार आहेत. माहिती व जनसंपर्क विभागामार्फत निमंत्रण पत्रिका, प्रसिद्धी, छायाचित्रण, व्हिडिओ चित्रीकरण, एलईडी स्क्रीन तसेच आवश्यक समन्वयाची कार्यवाही करण्यात येणार आहे. उद्यान विभागामार्फत पुष्पसजावट, स्थापत्य विभागामार्फत स्वागत कमान, मंडप, मंच, टेबल व खुर्च्यांची व्यवस्था, तर विद्युत विभागामार्फत ध्वनिक्षेपण व्यवस्था, कॉर्डलेस माईक व आवश्यक विद्युत रोषणाईची व्यवस्था करण्यात येणार आहे.

आरोग्य विभागामार्फत कार्यक्रमस्थळाची स्वच्छता व साफसफाई, सुरक्षा विभागामार्फत आवश्यक सुरक्षा व्यवस्था, तर आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन विभागामार्फत आपत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने आवश्यक पूर्वतयारी करण्यात येणार आहे. वैद्यकीय विभागामार्फत रक्तदान शिबिरासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा व समन्वय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

महानगरपालिकेने वर्षभरात राबविलेली विविध विकासकामे, प्रकल्प, योजना आणि नागरिकाभिमुख उपक्रमांची माहिती वर्धापन दिनाच्या निमित्ताने नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. सोशल मीडिया तसेच शहरातील व्हीएमडीच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या विकासकामांची माहिती आणि वर्धापन दिनानिमित्त संदेश प्रसारित करण्यात येणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे पुस्तकांच्या प्रती देऊन स्वागत करण्याचेही प्रस्तावित आहे.

वर्धापन दिनाच्या सर्व कार्यक्रमांचे नियोजनबद्ध व समन्वयपूर्वक आयोजन करण्यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक पूर्वतयारी वेळेत पूर्ण करावी, तसेच कार्यक्रमांमध्ये अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांचा व्यापक सहभाग सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ४४ वर्षांच्या विकासात्मक वाटचालीचा आढावा, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव आणि भविष्यातील शहर विकासाच्या दृष्टीने नागरिकाभिमुख प्रशासनाचा संकल्प या त्रिसूत्रीवर यंदाच्या वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे.

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleगणेश आरतीसोबत डेंग्यू-चिकनगुनियाविरोधात जनजागृती!
Next Article विद्यार्थ्यांच्या प्रश्नांनी महसूल मंत्र्यांना घेरले; बावनकुळेंनी दिली दिलखुलास उत्तरे!
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?