Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»गणेश आरतीसोबत डेंग्यू-चिकनगुनियाविरोधात जनजागृती!
पिंपरी चिंचवड

गणेश आरतीसोबत डेंग्यू-चिकनगुनियाविरोधात जनजागृती!

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 17, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

नवी सांगवी-पिंपळे गुरव परिसरात मानवी हक्क संरक्षण आणि जागृती व मनपा आरोग्य विभागाचा संयुक्त उपक्रम

पिंपरी, दि. १७ सप्टेंबर २०२६ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत नवी सांगवी व पिंपळे गुरव परिसरात डेंग्यू आणि चिकनगुनिया आजाराबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. मानवी हक्क संरक्षण आणि जागृती व महापालिका आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने दररोज सायंकाळी ७ ते ९ या वेळेत गणेश मंडळांमध्ये स्पीकरद्वारे माहिती देण्याबरोबरच माहितीपत्रकांचे वाटप करण्यात येत आहे.

दररोज पाच गणेश मंडळांमध्ये ही जनजागृती केली जात असून, डेंग्यू होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी, डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना तसेच आजाराची लक्षणे आढळल्यास घ्यावयाची खबरदारी याबाबत गणेशभक्तांना माहिती देण्यात येत आहे. मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड हे स्वतः स्पीकरद्वारे गणेशभक्तांना मार्गदर्शन करत आहेत. ही जनजागृती मोहीम अनंत चतुर्दशीपर्यंत सुरू राहणार असल्याचे जोगदंड यांनी सांगितले.

आरोग्य निरीक्षक स्नेहल सोनवणे यांनी डेंग्यूबाबत नागरिकांना सतर्क करताना, “डंक छोटा, धोका मोठा” असे सांगितले. ताप, डोकेदुखी, अंगावर लालसर पुरळ येणे, तीव्र पाठदुखी, अंगावर पुरळ उठणे आदी लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी आण्णा जोगदंड यांनी गणेशभक्तांना प्लास्टिकचा वापर टाळण्याची तसेच पर्यावरण संवर्धनाची शपथ दिली.

पाच गणेश मंडळांमध्ये जनजागृती

या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र मित्र मंडळ, समतानगर मित्र मंडळ, सत्ता प्रतिष्ठान, शिव प्रतिष्ठान आणि शिवराया मित्र मंडळ येथे जनजागृती करण्यात आली.

या वेळी शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, आरोग्य निरीक्षक स्नेहल सोनवणे, नगरसेविका दीप्ती कांबळे, बेसिक टीमचे पवन रंधे, महाराष्ट्र मित्र मंडळाचे अध्यक्ष मनीष भापकर, मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड, कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी, समतानगर मित्र मंडळ उत्सव समितीचे धीरज बारणे, उपाध्यक्ष अनिरुद्ध बारणे, सचिव अक्षय कुंभार, केदार घोरपडे, मनोज मदने, तेजस पाटील, अखिल देसाई, सत्ता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रतीक जाधव, संस्थापक सौरभ शिंदे, शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत माटुर, उपाध्यक्ष अविनाश इंदलकर, कार्याध्यक्ष विशाल नाथबोने, सचिव निलेश गाडेकर, प्रसाद पवार, शिवराया मित्र मंडळाचे अध्यक्ष रोहित भिसे, रोहित राऊत, सा.का. शिवानंद तालीकोटी, वसंत मांडे, ह.भ.प. अशोक ढोरे, सा.का. दीपक गायकवाड, महाराष्ट्र मित्र मंडळाचे उपाध्यक्ष दीपक गायकवाड, खजिनदार राजेश साळुंखे तसेच विजय इंगळे, मेल्विन मेंड्रोस, मनोज जगताप, संदीप बर्गे, निखिल जगताप, कुलदीप गुजर, सचिन बर्गे, ध्रुविल भिलारे आदींसह विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post Views: 10
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleशालेय जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धांचे उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांच्या हस्ते उद्घाटन
Next Article पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा ४४ वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा होणार
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?