Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»सीसीटीव्हीने धागा दिला,गुप्त माहितीने आरोपी गाठला!
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

सीसीटीव्हीने धागा दिला,गुप्त माहितीने आरोपी गाठला!

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 16, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

मोहितेवाडीतील घरफोडीचा गुन्हे शाखा युनिट-३ने लावला छडा; आहिल्यानगरमधून आरोपी जेरबंद, दोन लाखांची रोकड जप्त

पिंपरी चिंचवड : चाकण परिसरातील मोहितेवाडी-शेलपिंपळगाव येथे भरदिवसा घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या चोरट्यांचा अखेर गुन्हे शाखा युनिट-३ने पर्दाफाश केला. सीसीटीव्ही फुटेजचा माग काढत पोलिसांनी गुप्त बातमीदाराच्या माहितीची सांगड घातली आणि थेट आहिल्यानगर गाठत एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांच्या चौकशीत त्याने साथीदारासह घरफोडी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दि. २४ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी २.३० या वेळेत ढासे वस्ती, मोहितेवाडी, शेलपिंपळगाव येथील अमोल एकनाथ पोतले यांच्या घराला चोरट्यांनी लक्ष्य केले. घराच्या मुख्य दरवाज्याचा कडी-कोयंडा व कुलूप हत्याराच्या सहाय्याने तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाटाचा लॉकर उघडून त्यातील सोन्याचे दागिने लंपास करून पोबारा केला.

या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६२२/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३), ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट-३ने समांतर तपास सुरू केला. पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांच्या हालचालींचा माग काढण्यास सुरुवात केली.

तपासाला वेग आला असतानाच पोलीस हवालदार क्रमांक ८९३ सोनवणे यांना गुप्त बातमीदारामार्फत या गुन्ह्यातील आरोपींबाबत महत्त्वाची माहिती मिळाली. फिलीप नादर चव्हाण (वय ३३, रा. चिचोंडी पाटील, ता. जि. आहिल्यानगर) आणि छगन चिंतामण काळे (रा. कडा, आष्टी, ता. जि. बीड) यांनी हा गुन्हा केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता कारवाईची तयारी केली.

मिळालेल्या माहितीची खातरजमा करून गुन्हे शाखेचे पथक तातडीने चिचोंडी पाटील, आहिल्यानगर येथे रवाना झाले. पोलिसांनी सापळा रचून फिलीप नादर चव्हाण याला शिताफीने ताब्यात घेतले.

त्याला विश्वासात घेऊन कौशल्यपूर्ण पद्धतीने सखोल चौकशी केली असता, त्याने साथीदार छगन काळे याच्यासोबत मोहितेवाडी येथे घरफोडी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

चोरी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांबाबत चौकशी केली असता, छगन काळे याने सोन्याच्या मोबदल्यात फिलीप चव्हाण याला २ लाख रुपये दिल्याचे तपासात समोर आले. त्याच्या वाट्याला आलेल्या रकमेतून २ लाख रुपयांची रोख रक्कम पोलिसांनी फिलीप चव्हाण याच्याकडून जप्त केली.

या कारवाईमुळे भरदिवसा झालेल्या घरफोडीचा महत्त्वाचा धागा पोलिसांच्या हाती लागला असून, साथीदार छगन काळे याचा शोध सुरू आहे. गुन्ह्याचा पुढील तपास चाकण दक्षिण पोलीस ठाणे करीत आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. सुदर्शन राठोड आणि सहायक पोलीस आयुक्त (प्रशासन) सचिन कदम यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

गुन्हे शाखा युनिट-३चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे, पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी, सुनील जावळे तसेच पोलीस अंमलदार सोनवणे, भोसुरे, इचके, साबळे, खेडकर, गुंजाळ, राळे, दांगट आणि थोरात यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली.

Post Views: 9
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसेंट्री चाळीतील SRA प्रकल्पाला तातडीने स्थगिती द्या!
Next Article फक्त २ हजारांसाठी खून! हात-पाय बांधून दगड बांधत मृतदेह तलावात फेकला
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी

September 24, 2026

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून गणेशोत्सव-२०२६ची यशस्वी सांगता

September 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?