Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पिंपरी-चिंचवड महोत्सव २०२६ शहराच्या सांस्कृतिक वैभवाचा भव्य उत्सव ठरणार
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड महोत्सव २०२६ शहराच्या सांस्कृतिक वैभवाचा भव्य उत्सव ठरणार

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 16, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

कला, साहित्य, संगीत आणि संस्कृतीचा त्रिदिवसीय सोहळा; १८ ते २० सप्टेंबरदरम्यान विविध कार्यक्रमांची मेजवानी

पिंपरी, दि. १६ सप्टेंबर २०२६ : कला, साहित्य, संगीत, संस्कृती आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या समृद्ध परंपरेचा उत्सव साजरा करणाऱ्या ‘पिंपरी-चिंचवड महोत्सव २०२६’ संदर्भात आज महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधून महोत्सवाची रूपरेषा, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, कलाकारांचा सहभाग तसेच पुरस्कार सोहळ्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

शहरातील कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, साहित्यिक व सांस्कृतिक चळवळीला नवी ऊर्जा मिळावी तसेच कला, साहित्य, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक यांसह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गुणवंतांचा गौरव व्हावा, हा या महोत्सवाच्या आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे.

दि. १८ ते २० सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजित या त्रिदिवसीय सांस्कृतिक पर्वात विविध कलाविष्कार, नामवंत कलाकारांचे कार्यक्रम, साहित्यिक उपक्रम, संगीत, लोककला तसेच विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा सन्मान अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी नागरिकांना अनुभवता येणार आहे. पिंपरी-चिंचवड शहराची सांस्कृतिक अस्मिता, कलावैभव आणि सर्जनशीलता अधोरेखित करणारा हा महोत्सव ठरणार आहे.

शहरातील कलाकार, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्ते आणि गुणवंतांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच नागरिकांना दर्जेदार कलाविष्कारांचा अनुभव घेता यावा, या दृष्टीने महोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील नागरिकांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने सहभागी होऊन या सांस्कृतिक पर्वाचा आनंद घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

पत्रकार परिषदेस आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, कला, क्रीडा, सांस्कृतिक व पर्यटन समितीचे सभापती कैलास कुटे आणि नगरसदस्य राहुल कलाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

“शहराच्या सांस्कृतिक ओळखीला नवी उंची मिळेल” – स्वागताध्यक्ष तथा महापौर रवि लांडगे

“पिंपरी-चिंचवड शहर हे केवळ औद्योगिक नगरी म्हणून नव्हे, तर कला, साहित्य, संगीत आणि संस्कृतीची समृद्ध परंपरा जपणारे शहर म्हणूनही आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत आहे. स्थानिक कलाकार, साहित्यिक आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे आणि नागरिकांना दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचा अनुभव घेता यावा, या उद्देशाने ‘पिंपरी-चिंचवड महोत्सव २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागातून हा महोत्सव शहराच्या सांस्कृतिक वाटचालीतील संस्मरणीय पर्व ठरेल,”

….स्वागताध्यक्ष तथा महापौर रवि लांडगे, पिंपरी चिंचवड 

“स्थानिक प्रतिभेला व्यापक व्यासपीठ देणारा महोत्सव” – मुख्य संयोजक तथा आमदार अमित गोरखे

“पिंपरी-चिंचवडमध्ये कला, साहित्य, संगीत, नाट्य आणि लोककलेच्या क्षेत्रात मोठी प्रतिभा आहे. या प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी अशा महोत्सवांची आवश्यकता आहे. ‘पिंपरी-चिंचवड महोत्सव २०२६’च्या माध्यमातून स्थानिक कलाकारांसोबत विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा गौरव होणार असून शहराच्या सांस्कृतिक चळवळीला अधिक बळ मिळेल,” 

……मुख्य संयोजक तथा आमदार अमित गोरखे.

“सर्वांच्या सहभागातून शहराचा सांस्कृतिक उत्सव साकारतोय” – मुख्य संयोजक तथा विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर

“कला आणि संस्कृती ही शहराच्या सामाजिक जीवनाला समृद्ध करणारी महत्त्वाची शक्ती आहे. पिंपरी-चिंचवडमधील विविध सांस्कृतिक प्रवाह, परंपरा आणि कलागुणांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न या महोत्सवातून होत आहे. सर्व घटकांच्या सहभागातून साकारत असलेला हा महोत्सव शहरातील सांस्कृतिक वातावरण अधिक समृद्ध करेल. नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभागी होऊन या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा,” 

…….. भाऊसाहेब भोईर, मुख्य संयोजक तथा विरोधी पक्षनेते पिंपरी चिंचवड 

Post Views: 7
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपाणीपुरवठ्यापासून दिव्यांग भवनापर्यंत विकासकामांना मंजुरी!
Next Article ‘माझे घर, माझी स्वच्छता; माझा सहभाग, माझी जबाबदारी’
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?