Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पाणीपुरवठ्यापासून दिव्यांग भवनापर्यंत विकासकामांना मंजुरी!
पिंपरी चिंचवड

पाणीपुरवठ्यापासून दिव्यांग भवनापर्यंत विकासकामांना मंजुरी!

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 16, 2026No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

स्थायी समितीच्या बैठकीत नागरिकांच्या सुविधांना प्राधान्य; बस डेपो, महिला वसतिगृह, स्वच्छता, रस्ते, शाळा व पशुवैद्यकीय सेवांबाबत महत्त्वाचे निर्णय

पिंपरी, दि. १६ सप्टेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या दैनंदिन गरजा आणि नागरी सुविधांना प्राधान्य देत महापालिकेच्या स्थायी समितीच्या साप्ताहिक बैठकीत विविध महत्त्वपूर्ण विकासकामांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. पाणीपुरवठा, जलनिःसारण, दिव्यांग कल्याण, सार्वजनिक वाहतूक, महिला सुविधा, स्वच्छता, रस्ते, शिक्षण, आरोग्य आणि पशुवैद्यकीय सेवांशी संबंधित प्रस्तावांवर बैठकीत निर्णय घेण्यात आले.

स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जंगम, विक्रांत बगाडे, तृप्ती सांडभोर यांच्यासह समिती सदस्य तसेच महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नवी सांगवीतील पाणीपुरवठ्याला मंजुरी

पाणीपुरवठा विभागांतर्गत नवी सांगवी परिसरातील नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या कामास मंजुरी देण्यात आली. जलनिःसारण विभागांतर्गत जलनिःसारण नलिकांची आधुनिक पद्धतीने देखभाल व दुरुस्ती करण्याच्या कामालाही मान्यता देण्यात आली.

दिव्यांग भवनात आधुनिक सुविधांचा विस्तार

मोरवाडी येथील सुमारे २४ हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या दिव्यांग भवनात दिव्यांग नागरिकांसाठी विविध अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यामध्ये थेरपी, समुपदेशन, फिजिओथेरपी, हायड्रोथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, कौशल्य व व्यावसायिक मार्गदर्शन केंद्र, ऑडिटोरियम आणि लायब्ररी यांचा समावेश आहे.दिव्यांग भवनाचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक संचालक मंडळाच्या रचनेबाबतच्या प्रस्तावासही मंजुरी देण्यात आली.

वाकडमध्ये बस डेपो आणि चार्जिंग स्टेशन

मौजे वाकड येथील पीएमपीएमएल बस डेपो व कार्यालयाची इमारत विकसित करण्याबरोबरच बसेससाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या कामासाठी आवश्यक उच्चदाब भूमिगत विद्युत वाहिनी आणि वीजपुरवठ्याशी संबंधित कामांना मान्यता देण्यात आली.

महिला वसतिगृहासाठी निधी लेखाशीर्षात सुधारणा

प्रभाग क्र. २५, वाकड येथे कार्यरत महिलांसाठी बांधण्यात येणाऱ्या वसतिगृहाच्या कामासाठी चालू आर्थिक वर्षातील जमा-खर्च लेखाशीर्षात आवश्यक सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली.

‘झिरो वेस्ट’ प्रकल्पाला मुदतवाढ

स्वच्छ महाराष्ट्र भारत अभियानांतर्गत ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत महिला बचत गटाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या शून्य कचरा (Zero Waste) प्रकल्पाला मुदतवाढ व मंजुरी देण्यात आली.

याशिवाय प्रभाग क्र. ११ मधील विविध मनपा कार्यक्रमांसाठी मंडप व्यवस्था करणे तसेच प्रभाग क्र. २२, काळेवाडी आणि प्रभाग क्र. १८, चिंचवड येथील रस्ते दुरुस्तीच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून पुढील करारांना मंजुरी देण्यात आली.

शाळांतील सीसीटीव्हीची वार्षिक देखभाल

महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेची वार्षिक तत्त्वावर देखभाल व दुरुस्ती करण्याच्या कामास मान्यता देण्यात आली.

महापालिका हद्दीतील दिव्यांग व्यक्तींना मोफत बस पास देणे तसेच ६० वर्षांवरील अंध व्यक्तींच्या सोबतीदारांना बस प्रवासाचा पास देण्याच्या योजनेअंतर्गत झालेल्या प्रत्यक्ष खर्चासही मंजुरी देण्यात आली.

चऱ्होलीतील नवीन रस्त्यांवर स्ट्रीट लाईट

प्रभाग क्र. ०३, चऱ्होली येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांवर स्ट्रीट लाईट सुरू करण्यासाठी नवीन वीजमीटर घेण्यास आणि वीजपुरवठा कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली.

पशुवैद्यकीय सेवांसाठी मनुष्यबळ उपलब्ध होणार

महापालिकेच्या विविध पशुवैद्यकीय रुग्णालये, ॲम्ब्युलन्स, डॉग व्हॅन, डॉग पार्क आदी ठिकाणी आवश्यक मनुष्यबळ पुरविण्यासाठी एजन्सीची निवड करून कामाचे आदेश देण्यास मंजुरी देण्यात आली.

निवडणूक कामकाजासाठी झेरॉक्स सेवेचा दरकरार

महापालिकेच्या विविध विभागांचे दैनंदिन कामकाज तसेच आगामी सार्वत्रिक निवडणूक कामकाजासाठी मतदार याद्या व इतर आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती काढण्याच्या कामासाठी दरकरार निश्चित करण्यास मान्यता देण्यात आली.

सेवानिवृत्त व मयत कर्मचाऱ्यांची वेतन पडताळणी आणि पेन्शनविषयक प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी अनुभवी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची मानधनावर पुनर्नियुक्ती करण्यासही मंजुरी देण्यात आली.

शाळा, रुग्णालयांसाठी भांडवली कामांना चालना

बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानांतर्गत प्राप्त अनुदानातून शाळांमध्ये प्रयोगशाळा व वाचनालय विकसित करणे, जिम उपकरणे बसविणे तसेच रुग्णालयांसाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे खरेदी करणे यांसारख्या भांडवली कामांचा समावेश करण्यास मंजुरी देण्यात आली.

स्वच्छ सर्वेक्षण २०२५ मोहिमेचा भाग म्हणून शहरातील विविध प्रभागांमध्ये नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी संदेश, घोषवाक्ये आणि बोलकी चित्रे रंगविण्याच्या कामांनाही मान्यता देण्यात आली.

“नागरिकांना वेळेत दर्जेदार सुविधा मिळणे ही महापालिकेची जबाबदारी”

“पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना अधिक सक्षम, दर्जेदार आणि वेळेत नागरी सुविधा उपलब्ध करून देणे ही महापालिकेची प्रमुख जबाबदारी आहे. आजच्या स्थायी समितीच्या बैठकीत पाणीपुरवठा, जलनिःसारण, दिव्यांग कल्याण, सार्वजनिक वाहतूक, महिला सुविधा, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे.या निर्णयांची प्रभावी आणि वेळेत अंमलबजावणी होऊन त्याचा थेट लाभ नागरिकांना मिळावा, यासाठी प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करावी. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन अशाच प्रकारे सकारात्मक आणि लोकाभिमुख निर्णय घेण्यास स्थायी समिती कटिबद्ध आहे.”

— अभिषेक बारणे, सभापती, स्थायी समिती, पिंपरी-चिंचवड महापालिका

Post Views: 7
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleदापोडीतील शून्य कचरा प्रकल्पाला उपमहापौर शर्मिला बाबर यांची भेट
Next Article पिंपरी-चिंचवड महोत्सव २०२६ शहराच्या सांस्कृतिक वैभवाचा भव्य उत्सव ठरणार
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?