Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»दापोडीतील शून्य कचरा प्रकल्पाला उपमहापौर शर्मिला बाबर यांची भेट
पिंपरी चिंचवड

दापोडीतील शून्य कचरा प्रकल्पाला उपमहापौर शर्मिला बाबर यांची भेट

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 16, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

महिला बचत गटाच्या माध्यमातून कचऱ्याचे व्यवस्थापन; महिलांना रोजगारासह परिसर स्वच्छतेला चालना

पिंपरी, दि. १६ सप्टेंबर २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि वैष्णवी महिला बचत गटाच्या माध्यमातून दापोडी येथे राबविण्यात येत असलेल्या शून्य कचरा प्रकल्पाला उपमहापौर शर्मिला बाबर यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पाची संपूर्ण कार्यपद्धती आणि कचरा व्यवस्थापनाची प्रक्रिया जाणून घेतली. तसेच प्रकल्पात कार्यरत महिलांशी संवाद साधून त्यांच्या कामकाजाची माहिती घेत त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या.

यावेळी सहाय्यक आरोग्य निरीक्षक राजेश भाट, अंकुश झिटे, मुख्य आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी, आरोग्य निरीक्षक ओंकार शिवरकर, प्रभारी आरोग्य निरीक्षक उमेश जाधव, समाज विकास विभागाच्या समूह संघटिका वैशाली लगडे, योजक संस्थेच्या सिनिअर मॅनेजर सेजल जोशी यांच्यासह प्रकल्पात कार्यरत महिला उपस्थित होत्या.

महानगरपालिकेच्या समाज विकास विभाग, आरोग्य विभाग आणि पर्यावरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. वैष्णवी महिला बचत गटातील सात महिला या प्रकल्पाचे कामकाज सांभाळत आहेत. या माध्यमातून कचऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करण्याबरोबरच महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.

या प्रकल्पामध्ये संकलित केलेल्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून सेंद्रिय खत तयार केले जाते. तसेच प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून बेंच, पेव्हिंग ब्लॉक यांसारख्या विविध उपयुक्त वस्तू तयार करण्यात येतात. त्यामुळे कचऱ्याचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मितीला चालना मिळत असून परिसरातील स्वच्छताही राखली जात आहे.

शून्य कचरा प्रकल्पामुळे परिसरातील कचऱ्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होत असून कचरा वाहतूक करून मोशी येथील कचरा डेपोवर टाकण्याचा भारही कमी होतो. स्थानिक पातळीवरच कचऱ्यावर प्रक्रिया होत असल्याने कचरा व्यवस्थापन अधिक परिणामकारक होण्यास मदत होत आहे. त्याचबरोबर या उपक्रमातून बचत गटातील महिलांना नियमित रोजगार व आर्थिक उत्पन्न मिळत असून त्यांच्या आर्थिक स्थितीतही सकारात्मक बदल होत आहे.

कचरा व्यवस्थापनासोबतच महिला सक्षमीकरणाचा प्रभावी नमुना म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे. कचऱ्यापासून उपयुक्त वस्तू तयार करून त्यातून उत्पन्न मिळविणाऱ्या या महिला परिसरातील इतर नागरिक आणि महिला बचत गटांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि महिला आर्थिक सक्षमीकरण या तिन्ही बाबींचा समन्वय या प्रकल्पातून साधला जात आहे.

“दापोडी येथे महिला बचत गटाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेला शून्य कचरा प्रकल्प हा स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि महिला सक्षमीकरणाचा सुंदर संगम आहे. कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करून त्यापासून खत तसेच विविध उपयुक्त वस्तू तयार केल्या जात आहेत. या उपक्रमामुळे परिसर स्वच्छ राहण्यास मदत होत असून महिलांना रोजगार आणि आर्थिक उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले आहे. आपल्या मेहनतीतून आणि कल्पकतेतून या महिला समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण करत आहेत. अशा उपक्रमांना प्रोत्साहन देऊन त्यांचा विस्तार करण्यासाठी महानगरपालिका स्तरावर आवश्यक सहकार्य करण्यात येईल”

– शर्मिला बाबर, उपमहापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Post Views: 7
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleविद्यार्थ्यांना संस्कारक्षम आणि जबाबदार नागरिक घडविण्याचे काम शिक्षक करतात – आमदार शंकर जगताप
Next Article पाणीपुरवठ्यापासून दिव्यांग भवनापर्यंत विकासकामांना मंजुरी!
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?