Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»विद्यार्थ्यांना संस्कारक्षम आणि जबाबदार नागरिक घडविण्याचे काम शिक्षक करतात – आमदार शंकर जगताप
पिंपरी चिंचवड

विद्यार्थ्यांना संस्कारक्षम आणि जबाबदार नागरिक घडविण्याचे काम शिक्षक करतात – आमदार शंकर जगताप

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 15, 2026No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास घडवण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची – आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी

शिक्षक दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ३८ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गौरव

पिंपरी, दि. १५ सप्टेंबर २०२६: “शिक्षक हे केवळ विद्यार्थ्यांना शिक्षण देत नाहीत, तर त्यांना संस्कारक्षम आणि जबाबदार नागरिक घडविण्याचे काम करतात. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये राबवण्यात येणारे शैक्षणिक उपक्रम हे कोणत्याही खासगी शाळेतील उपक्रमांपेक्षा कमी नाहीत. आज महापालिका शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांच्या रांगा लागत आहेत. महापालिकेतील शिक्षकांनी देखील आपल्या कार्यातून महापालिका शाळांकडे पाहण्याचा सर्वांचाच दृष्टिकोन अधिक सकारात्मक करण्यासाठी प्रयत्न करावेत,” असे प्रतिपादन आमदार शंकर जगताप यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने नुकत्याच झालेल्या शिक्षक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात केले.

चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, शिक्षण समिती सभापती रविना आंगोळकर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती राणीमाई पठारे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उपायुक्त ममता शिंदे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांच्यासह शिक्षण समिती सदस्य व नगरसदस्य उपस्थित होते.

या कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी असे एकूण ३८ जणांचा आमदार शंकर जगताप आणि महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यावेळी म्हणाले, “प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. महापालिकेचा सर्वांत महत्त्वाचा विभाग म्हणजे शिक्षण विभाग आहे. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला सुजाण नागरिक घडविण्याचे काम प्रत्येक शिक्षक करतात. सुजाण नागरिक घडविताना विद्यार्थ्यांची भावनिक बुद्धिमत्ता वाढविणे, तसेच विद्यार्थ्यांमधील चांगले गुण ओळखून त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. शिक्षक हा केवळ विद्यार्थ्यांना विषयाचे ज्ञान देणारा घटक नसून त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात महत्त्वाची भूमिका बजावतो. विद्यार्थ्यांच्या भावनिक, सामाजिक आणि बौद्धिक विकासासाठी शिक्षकांनी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

शिक्षण समिती सभापती रविना आंगोळकर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त ममता शिंदे यांनी केले.

विविध विभागातील शिक्षक व कर्मचाऱ्यांचा गौरव

शिक्षक दिनानिमित्त आयोजित या पुरस्कार सोहळ्यात विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि प्रशासनातील कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. आदर्श बालवाडी शिक्षिका पुरस्काराने वंदना पराते, संगीता इंगळे आणि राजश्री वाळुंज यांचा सन्मान करण्यात आला. आदर्श शिक्षक – प्राथमिक विभाग या पुरस्काराने सुरेखा कुंजीर, वीणा दाभाडे, मनीषा पिंगळे, राजश्री रासकर, योगेश्वरी लोणकर, ज्योती गिरी, सविता कांबळे, सुनीता बामणे, सुनीता दहिफळे, वंदना जगनाडे, बाळासाहेब जाधव आणि प्रतिभा नेवकर यांचा गौरव करण्यात आला. विशेष पुरस्काराने पूजा कदम आणि सुनिला दिवाणे यांचा सन्मान करण्यात आला. आदर्श शिक्षक – माध्यमिक विभाग या पुरस्काराने कविता पाचरणे, नसिफा शेख, अपर्णा चिंचोलकर, रुपाली गाथा, दामहे नूतनलाल आणि विद्या मिसाळ यांचा गौरव करण्यात आला. खासगी विभागातील आदर्श शिक्षक पुरस्काराने मनीषा कलशेट्टी आणि विजयश्री काजळे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच मनपा व संस्था संचलित शाळांमधील आदर्श शिक्षक पुरस्काराने सुप्रिया पाटील आणि गोकुळ पवार यांचा गौरव करण्यात आला.

शैक्षणिक कामकाजासोबतच प्रशासन आणि शाळांच्या दैनंदिन व्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही यावेळी विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यामध्ये सहायक प्रशासन अधिकारी रजिया खान, पर्यवेक्षक जयमाला गावडे, सरस्वती भेगडे, प्रमिला जाधव, ज्योती तापकीर, सुजाता कर्जतकर, प्रमिला होले, श्रीकांत चौगुले, अंजली झगडे, खालेदा खान आणि सुनीता गिते यांना पुरस्कार देण्यात आला.

सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्याला रंगत 

पुरस्कार सोहळ्यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले. पिंपळे गुरव शाळेतील विद्यार्थ्यांनी मंगळागौर नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. रावेत शाळेतील शिक्षकांनी ‘बाई पण भारी देवा’ या गाण्यावर नृत्य सादर केले. या सादरीकरणातून दररोज कामावर जाणाऱ्या महिलांची व्यथा, त्यांचा संघर्ष आणि कुटुंबासाठी त्यांचे योगदान प्रभावीपणे मांडण्यात आले. तसेच थेरगाव शाळेतील शिक्षिका स्नेहल भोसले यांनी भरतनाट्यमच्या माध्यमातून गणेश वंदना सादर केली. विविध सांस्कृतिक सादरीकरणांमुळे पुरस्कार सोहळ्याला उत्साहपूर्ण वातावरण लाभले. तसेच कार्यक्रमात प्रसिद्ध व्याख्याते आणि करिअर समुपदेशक विवेक वेलणकर यांच्या व्याख्यानाचेही आयोजन करण्यात आले. त्यांनी बदलत्या शैक्षणिक वातावरणात विद्यार्थ्यांसमोरील करिअरच्या विविध संधी, योग्य करिअर निवड आणि भविष्यातील आव्हाने याबाबत मार्गदर्शन केले. शिक्षकांच्या कार्याचा गौरव, विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक सादरीकरण आणि मार्गदर्शनपर व्याख्यान यामुळे शिक्षक दिनानिमित्त आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

“शिक्षक हे समाजाच्या जडणघडणीतील अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्यामध्ये संस्कार, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम शिक्षक करतात. महापालिका शाळांमधील शिक्षकांनी आपल्या गुणवत्तापूर्ण कार्यातून विद्यार्थ्यांना घडविण्यासोबतच महापालिका शाळांची गुणवत्ता आणि विश्वासार्हता अधिक उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान हा इतर शिक्षकांसाठीही प्रेरणादायी ठरेल”

……रवि लांडगे महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

“महापालिका शाळांमध्ये विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक सातत्याने प्रयत्न करत आहेत. बदलत्या काळानुसार शिक्षणपद्धतीमध्येही बदल आवश्यक असून विद्यार्थ्यांच्या आवडी-निवडी, कौशल्ये आणि क्षमतांचा विचार करून त्यांना योग्य दिशा देणे गरजेचे आहे. आज सन्मानित करण्यात आलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कार्य निश्चितच प्रेरणादायी असून त्यांच्या योगदानामुळे महापालिका शिक्षण विभागाची गुणवत्ता अधिक सक्षम होत आहे”

…….डाॅ.विजय सुर्यवंशी,आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसंदीप वाघेरे यांच्या विसर्जन केंद्रावर दीड दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप
Next Article दापोडीतील शून्य कचरा प्रकल्पाला उपमहापौर शर्मिला बाबर यांची भेट
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?