Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»संदीप वाघेरे यांच्या विसर्जन केंद्रावर दीड दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप
पिंपरी चिंचवड

संदीप वाघेरे यांच्या विसर्जन केंद्रावर दीड दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 15, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

सहा वर्षांची सेवा अखंडित; दोन विसर्जन हौदांसह नागरिकांसाठी विविध सुविधांची व्यवस्था

पिंपरी प्रतिनिधी : गणेशोत्सवातील दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन पिंपरी येथे नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या गणेशमूर्ती विसर्जन व संकलन केंद्रावर भक्तीमय वातावरणात पार पडले. नागरिकांनी मोठ्या संख्येने या केंद्राचा वापर करून आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.

गेल्या सहा वर्षांपासून संदीप वाघेरे यांच्या वतीने गणेशमूर्ती विसर्जन व संकलन केंद्राचा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. यंदाही नागरिकांना सुरक्षित, सुलभ आणि पर्यावरणपूरक विसर्जनाची सुविधा मिळावी, यासाठी केंद्रावर दोन स्वतंत्र विसर्जन हौद उभारण्यात आले आहेत. तसेच गणेशमूर्ती संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी आरतीची विशेष व्यवस्था, साउंड सिस्टीम, पिण्याचे स्वच्छ पाणी, पुरेशी प्रकाश व्यवस्था, स्वच्छता, निर्माल्य संकलन, कचरा संकलन तसेच दिशादर्शक फलकांची व्यवस्था करण्यात आली होती. गर्दीचे नियोजन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्वयंसेवकांचीही नियुक्ती करण्यात आली होती.

दीड दिवसांच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनावेळी नागरिकांनी पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जनाला प्राधान्य दिले. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसह येणाऱ्या कुटुंबांना स्वयंसेवकांकडून आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे विसर्जन प्रक्रिया कोणतीही गैरसोय न होता शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली.

नागरिकांकडून संकलित करण्यात आलेल्या गणेशमूर्तींचे महापालिकेने निश्चित केलेल्या अधिकृत ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जन करण्यात येणार आहे. नदी, नाले किंवा अन्य जलस्रोतांमध्ये मूर्ती विसर्जित न करता संकलन केंद्राचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

“गणेश भक्तांच्या श्रद्धेचा सन्मान राखत सुरक्षित, सुलभ आणि पर्यावरणपूरक विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. गेल्या सहा वर्षांपासून हा उपक्रम अखंडितपणे सुरू असून, दीड दिवसांच्या गणरायाचे विसर्जन भक्तीमय वातावरणात पार पडले. आगामी विसर्जनाच्या दिवसांतही नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा,” 

….नगरसेवक संदीप वाघेरे, पिंपरी चिंचवड.

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक शिवाजीराव शिर्के यांचे निधन
Next Article विद्यार्थ्यांना संस्कारक्षम आणि जबाबदार नागरिक घडविण्याचे काम शिक्षक करतात – आमदार शंकर जगताप
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?