Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

माणुसकी जिंकली! बालिकेला सुरक्षित पोलिसांच्या स्वाधीन करणाऱ्या दोघांचा सन्मान!

November 25, 2026

वाद विकोपाला गेला अन् तरुणीचा जीव गेला; प्रियकरावर खुनाचा गुन्हा

November 25, 2026

वाहनांच्या बॉडी निर्मिती क्षेत्रातील अजिल फायबरटेच्या लिगसी स्लीपर कोचला एआरएआयचे प्रमाणपत्र 

November 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»तणावात न जगता तज्ञाचा सल्ला घ्यावा – सचिन इटकर 
पिंपरी चिंचवड

तणावात न जगता तज्ञाचा सल्ला घ्यावा – सचिन इटकर 

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 15, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

“विलर्न इंडियाच्या शैक्षणिक परिषदेला मोठा प्रतिसाद 

पिंपरी (प्रतिनिधी)- ‘ विलर्न इंडिया आणि ‘रिमेम्बरिंग मी फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या नॅशनल एज्यूकेशनल लीडरशिप परिषदेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी शिक्षण क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या शहरातील महिला शिक्षकांना वुमन एज्युकेशनल लीडर्स पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी ताण-तणाव व्यवस्थापनावर समुपदेशन करणाऱ्या “विलर्न इंडिया” ऍप आणि करियर कौन्सीलिंग, सोशल इमोशनल लर्निंग पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र इकोनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलचे उपाध्यक्ष सचिन इटकर, पिं-चिं एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई,मानसोपाचार तज्ञ डॉ. किशोर गुजर, पिं -चिं सायन्स पार्कचे संचालक प्रवीण तुपे, यारी ग्रुपचे अध्यक्ष ज्ञानेश्वर काळभोर, विलर्न इंडियाच्या संस्थापक / संचालिका रंजना पवार, संचालक सुधीर पाटील, संचालक भास्कर मर्गज , संचालक उमेश ढोणे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी श्री.इटकर म्हणाले कि,विलर्न’ हे व्यासपीठ शिक्षकांना समुपदेशक बनण्याची एक उत्तम करिअरची संधी उपलब्ध आहे. दर सातपैकी एका किशोरवयीन मुलाला मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो; नैराश्य, चिंता, मानसिक अस्वस्थता आणि मनस्थितीत होणारे बदल यांसारख्या समस्या या सामान्य आहेत. केवळ २% मुले आपल्या समस्यांबाबत शिक्षकांशी संवाद साधतात, तर जवळपास ७०% विद्यार्थी समुपदेशकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. विलर्न इंडिया ‘ व्यासपीठाद्वारे प्रत्येक शिक्षकाने प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. जर विद्यार्थ्यांना योग्य वयात समुपदेशन मिळाले, तर त्याचा देशाला समाजाला नक्कीच फायदा होईल.आज तरुणाई ताण तणावातून जात आहे.ही चिंताजनक बाब आहे.अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी विलर्न हा ऍप नक्कीच उपयुक्त ठरेल असा विश्वास आहे.

प्रा.देसाई म्हणाले कि,एआयच्या जगात अध्यापन पद्धतीत अमूलाग्र बदल घडून येत आहे. हे शिक्षण क्षेत्रासमोर मोठे आव्हान असणार आहे. शिक्षणाचे भविष्य घडवणाऱ्या आणि विद्यार्थ्यांच्या पिढ्यांना प्रेरणा देणाऱ्या महिला शिक्षणतज्ज्ञांची दूरदृष्टी, त्यांच्यातील समर्पण वृत्ती आणि अग्रगण्य कार्याला वाहून घेणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करणे ही कौतुकास्पद बाब आहे.अशा शब्दांत विलर्न इंडियाचे कौतुक केले.

डॉ.गुजर यांनी मुलांचे आणि प्रौढाचे मानसिक आरोग्याच्या समस्यांचे प्रतिबंध या विषयांवर मार्गदर्शन केले.पुरस्कारार्थीमध्ये एसएनबीपी आंतरराष्ट्रीय शाळेच्या देवयानी भोसले,एएसएम इन्स्टिट्यूट ग्रुपच्या संचालिका डॉ.मणिमाला पुरी,

अवसरा अकॅडमीच्या संचालक डॉ लक्ष्मी कुमार,

पुणे केंब्रिजच्या विश्वस्त प्रीतम कुंजीर,ऑर्केड शाळेच्या डॉ.नम्रता माझाईल,सायन्स पार्कच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रद्धा खाम्पारिया,मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या विद्या घाडगे यांचा समावेश आहे.

नॅशनल एज्युकेशन लीडरशिप समिट

 “जनरेशन अल्फा आणि जनरेशन झेडसाठी मानसिक आरोग्य आणि नवीन युगातील करिअर – आव्हाने आणि संधी” या विषयावर आयोजित चर्चासत्रात देसाई फौंडेशनचे सीईओ प्रा.अश्विनीकुमार भारद्वाज, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सायकोलॉजी विभागप्रमुख प्रा. राजेंद्र म्हस्के,डॉ. व्यास मौर्य,मुक्तांगण व्यसनमुक्तीच्या सोनाली काळे हे सहभागी झाले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युगांतर बल्लाळ तर आभार भास्कर मर्गज यांनी मानले.यावेळी सल्लागार सदस्य डॉ. स्वाती देशमुख, डॉ. सुभम जानकर, डॉ. खुशली ओझा, डॉ. रेखा कुमार, डॉ.माजू पुनिया, डॉ. शीतल सोलंकी यांचा सत्कार करण्यात आला.

Post Views: 43
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआंबेडकरी सांस्कृतिक चळवळीच्या शिलेदार मंचावरून हजारो कलाकारांनी दाखवला आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध
Next Article थेरगाव हॉस्पिटलमध्ये इस्कॉनतर्फे सात्विक भोजन उपक्रम सुरू
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

मोबदला घेतला, तरी रस्ते अडवले! रहाटणी-काळेवाडीचा विकास आरक्षणांमध्ये अडकला

November 24, 2026

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या संशोधक विद्यार्थ्यांकडून पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा अभ्यास; महापौर रवि लांडगे यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर संवाद

November 23, 2026

‘श्री रामराज्य’ नृत्यनाटिकेच्या कलाकारांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते सन्मान

November 23, 2026

भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची पक्ष नेतृत्वाकडे कैफियत; सचिन काळभोरांचा सवाल – माझा गुन्हा काय?

November 23, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

माणुसकी जिंकली! बालिकेला सुरक्षित पोलिसांच्या स्वाधीन करणाऱ्या दोघांचा सन्मान!

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 25, 20260

अनिल काची आणि अजय कांबळे यांच्या सतर्कतेमुळे बालिका सुरक्षितपणे पोलिसांच्या ताब्यात; पोलीस उपआयुक्त संदीप आटोळे…

वाद विकोपाला गेला अन् तरुणीचा जीव गेला; प्रियकरावर खुनाचा गुन्हा

November 25, 2026

वाहनांच्या बॉडी निर्मिती क्षेत्रातील अजिल फायबरटेच्या लिगसी स्लीपर कोचला एआरएआयचे प्रमाणपत्र 

November 24, 2026

मोबदला घेतला, तरी रस्ते अडवले! रहाटणी-काळेवाडीचा विकास आरक्षणांमध्ये अडकला

November 24, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?