Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»थेरगाव हॉस्पिटलमध्ये इस्कॉनतर्फे सात्विक भोजन उपक्रम सुरू
पिंपरी चिंचवड

थेरगाव हॉस्पिटलमध्ये इस्कॉनतर्फे सात्विक भोजन उपक्रम सुरू

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 15, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या हस्ते शुभारंभ

पिंपरी-चिंचवड :– थेरगाव येथील रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी इस्कॉन संस्थेमार्फत सुरू करण्यात आलेल्या सात्विक भोजनाच्या (प्रसाद) उपक्रमाचा शुभारंभ पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. आजारपण आणि संकटाच्या काळात रुग्णाला वैद्यकीय उपचारांसोबतच वेळेवर मिळणाऱ्या पौष्टिक आणि सात्विक आहाराची अत्यंत आवश्यकता असते, असे प्रतिपादन अभिषेक बारणे यांनी यावेळी केले.

हा उपक्रम अधिक प्रभावीपणे आणि सातत्याने राबवण्यासाठी ‘सीएसआर’ फंडाचा उत्तम वापर करण्यात आला असून, या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत शहरातील आरोग्यसेवेला मोठा हातभार लागणार आहे. या निधीच्या योग्य नियोजनामुळे रुग्णालयातील रुग्णांच्या प्रकृतीची विशेष काळजी घेऊन, पूर्णपणे स्वच्छता व नियमांचे पालन करत हलका, ताजा आणि घरगुती पद्धतीचा सात्विक आहार उपलब्ध होणार आहे. तसेच, दूरवरून उपचारासाठी आलेल्या आणि आर्थिक अडचणीत असलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना बाहेर जेवणासाठी वणवण फिरावे लागू नये, यासाठी हा उपक्रम अतिशय मोलाचा आधार ठरणार आहे. भगवंताचा हा पवित्र प्रसाद रुग्णांना मानसिक स्थैर्य आणि लवकर बरे होण्यासाठी आवश्यक असलेली सकारात्मक ऊर्जा प्रदान करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

शहराच्या सर्वांगीण विकासासोबतच नागरिकांचे आरोग्य आणि सामाजिक स्वास्थ्य जपण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहेच, परंतु जेव्हा सीएसआर फंडाच्या माध्यमातून अशा लोककल्याणकारी उपक्रमांमध्ये धार्मिक व सामाजिक संस्था पुढे येतात, तेव्हा समाजसेवेचे काम अधिक व्यापक होते, असे सांगत स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी इस्कॉन संस्था, सीएसआर अंतर्गत सहकार्य करणाऱ्यांचे आणि निस्स्वार्थ भावनेने सेवा देणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.

“थेरगाव हॉस्पिटलमधील रुग्णांसाठी आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या नातेवाईकांसाठी इस्कॉन संस्थेने सीएसआर फंडाच्या माध्यमातून सुरू केलेल्या सात्विक भोजनाच्या (प्रसाद) उपक्रमाचा शुभारंभ करताना मला आनंद आहे. आजारपणाच्या कठीण काळात जेव्हा रुग्णाला घरगुती आणि पौष्टिक आहाराची गरज असते, तेव्हा हा उपक्रम त्यांना मोठा मानसिक आणि शारीरिक आधार देणारा आहे. ‘सेवा हीच ईश्वर सेवा’ या भावनेतून चालविल्या जाणाऱ्या आणि सीएसआरच्या माध्यमातून बळकट होणाऱ्या अशा लोककल्याणकारी उपक्रमांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आणि माझ्या वैयक्तिक पातळीवरून नेहमीच संपूर्ण सहकार्य व पाठबळ आहे.”

                – अभिषेक बारणे, सभापती- स्थायी समिती, पिंपरी चिंचवड महापालिका.

Post Views: 13
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleतणावात न जगता तज्ञाचा सल्ला घ्यावा – सचिन इटकर 
Next Article ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक शिवाजीराव शिर्के यांचे निधन
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?