Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या संशोधक विद्यार्थ्यांकडून पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा अभ्यास; महापौर रवि लांडगे यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर संवाद

November 23, 2026

‘श्री रामराज्य’ नृत्यनाटिकेच्या कलाकारांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते सन्मान

November 23, 2026

भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची पक्ष नेतृत्वाकडे कैफियत; सचिन काळभोरांचा सवाल – माझा गुन्हा काय?

November 23, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»पवना जलवाहिनी प्रकल्पाबाबत सर्व घटकांना विश्वासात घेऊन सकारात्मक तोडगा काढावा – महापौर रवि लांडगे
पुणे

पवना जलवाहिनी प्रकल्पाबाबत सर्व घटकांना विश्वासात घेऊन सकारात्मक तोडगा काढावा – महापौर रवि लांडगे

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 11, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

मावळमधील शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा; मुख्यमंत्री स्तरावरील पुढील बैठकीसाठी नियोजन करण्याची विनंती

पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड शहराच्या दीर्घकालीन पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या पवना जलवाहिनी प्रकल्पाबाबत मावळमधील शेतकरी तसेच संबंधित घटकांच्या अडचणी व भूमिका विचारात घेऊन समन्वयातून सकारात्मक आणि सर्वमान्य तोडगा काढावा. तसेच या विषयावरील पुढील कार्यवाहीसाठी मा. मुख्यमंत्री महोदयांची वेळ घेऊन बैठक आयोजित करण्याचे नियोजन करावे, अशी सूचना महापौर रवि लांडगे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना केली.

आज दिशा समितीच्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता महापौर रवि लांडगे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेतली. यावेळी पवना जलवाहिनी प्रकल्पासंदर्भात यापूर्वी झालेल्या बैठकीतील चर्चा, मावळ भागातील शेतकऱ्यांनी मांडलेल्या विविध अडचणी तसेच प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

पवना जलवाहिनी प्रकल्पाच्या अनुषंगाने मावळमधील शेतकरी व संबंधित घटकांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहणे आवश्यक आहे. यापूर्वी शेतकऱ्यांसमवेत झालेल्या चर्चेमध्ये त्यांच्या विविध अडचणी व अपेक्षा समोर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने संबंधित शेतकरी, स्थानिक नागरिक आणि सर्व संबंधित यंत्रणांशी आवश्यक समन्वय साधून त्यांच्या अडचणींचा योग्य विचार करावा आणि सकारात्मक तोडगा काढण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी सूचना महापौर लांडगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली.

पिंपरी-चिंचवड शहराचा झपाट्याने होणारा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता शहरासाठी दीर्घकालीन व शाश्वत पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे अत्यावश्यक आहे. त्या दृष्टीने पवना जलवाहिनी प्रकल्प महत्त्वाचा असून, प्रकल्प पुढे नेताना मावळमधील शेतकरी आणि स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांचाही योग्य विचार होणे आवश्यक आहे. शहराची पाण्याची गरज आणि स्थानिक शेतकऱ्यांचे हित या दोन्ही बाबींमध्ये समन्वय साधून सर्वमान्य मार्ग काढण्याची भूमिका असल्याचे महापौर लांडगे यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी झालेल्या बैठकीतील चर्चेच्या अनुषंगाने आता पुढील निर्णयप्रक्रियेला गती मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभाग, जिल्हा प्रशासन, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच अन्य संबंधित यंत्रणांची संयुक्त बैठक आयोजित झाल्यास प्रलंबित मुद्द्यांवर चर्चा करून पुढील कार्यवाहीची निश्चित दिशा ठरविता येईल. त्यानुसार मा. मुख्यमंत्री महोदयांची वेळ घेऊन पुढील बैठकीचे नियोजन करण्याची विनंती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना करण्यात आली.

शेतकऱ्यांचे हित आणि शहराची पाण्याची गरज यांचा समन्वय साधणे आवश्यक” – महापौर रवि लांडगे

 

“पवना जलवाहिनी प्रकल्प हा पिंपरी-चिंचवड शहराच्या भविष्यातील पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्याचवेळी मावळमधील शेतकऱ्यांनी मांडलेल्या अडचणी आणि त्यांच्या अपेक्षांचाही संवेदनशीलतेने विचार होणे आवश्यक आहे. कोणावरही अन्याय होणार नाही, अशा पद्धतीने सर्व संबंधित घटकांना विश्वासात घेऊन सकारात्मक आणि सर्वमान्य तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. यासाठी मा. मुख्यमंत्री महोदयांच्या स्तरावर पुढील बैठक आयोजित करून विषयाला गती देण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याशी चर्चा केली आहे. शहराची दीर्घकालीन पाण्याची गरज पूर्ण करण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण व्हावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल,” असे महापौर रवि लांडगे यांनी सांगितले.

Post Views: 15
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleविद्यार्थ्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा धडा
Next Article सशक्त मीडिया हेच श्रेष्ठ विश्वनिर्मितीचे प्रभावी माध्यम : करुणा भाई
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांची माणुसकी अन् कर्तव्यदक्षतेचे दर्शन! चक्कर आलेल्या महिला प्रवाशाला तातडीने रुग्णालयात दाखल

November 23, 2026

पुण्यात अतिक्रमणांवर महापालिकेचा आठ क्षेत्रीय कार्यालयांतून कारवाईचा बडगा!

November 22, 2026

४० सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपीचा माग काढला; १९ वर्षीय तरुण अटकेत

November 21, 2026

दहीहंडीतील गोळीबार भोवला! आकाश कंचिले टोळीवर मकोक्याचा बडगा

November 21, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या संशोधक विद्यार्थ्यांकडून पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा अभ्यास; महापौर रवि लांडगे यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर संवाद

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 23, 20260

पिंपरी, प्रतिनिधी  : पिंपरी-चिंचवड शहराची विकासात्मक वाटचाल, नागरी सुविधांचे नियोजन, बदलती लोकसंख्या आणि भविष्यातील शहरी…

‘श्री रामराज्य’ नृत्यनाटिकेच्या कलाकारांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते सन्मान

November 23, 2026

भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची पक्ष नेतृत्वाकडे कैफियत; सचिन काळभोरांचा सवाल – माझा गुन्हा काय?

November 23, 2026

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांची माणुसकी अन् कर्तव्यदक्षतेचे दर्शन! चक्कर आलेल्या महिला प्रवाशाला तातडीने रुग्णालयात दाखल

November 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?