Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय»सशक्त मीडिया हेच श्रेष्ठ विश्वनिर्मितीचे प्रभावी माध्यम : करुणा भाई
राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय

सशक्त मीडिया हेच श्रेष्ठ विश्वनिर्मितीचे प्रभावी माध्यम : करुणा भाई

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 11, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
filter: 0; jpegRotation: 0; fileterIntensity: 0.000000; filterMask: 0; module:1facing:0; hw-remosaic: 0; touch: (-1.0, -1.0); modeInfo: ; sceneMode: Night; cct_value: 0; AI_Scene: (-1, -1); aec_lux: 0.0; hist255: 0.0; hist252~255: 0.0; hist0~15: 0.0;
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

आबूरोड येथे राष्ट्रीय मीडिया सम्मेलन-२०२६चा दिमाखात शुभारंभ; सकारात्मक, मूल्यनिष्ठ आणि उत्तरदायी पत्रकारितेचा संकल्प

राजस्थान/आबूरोड, दि. १० सप्टेंबर : समाजात सकारात्मकता, शांतता, सद्भावना आणि मानवी मूल्यांची रुजवणूक करण्यासाठी माध्यमांनी अधिक सशक्त, उद्देशपूर्ण आणि उत्तरदायी भूमिका बजावण्याची गरज आहे. श्रेष्ठ विश्वाच्या निर्मितीत मीडिया हे प्रभावी माध्यम ठरू शकते, असे प्रतिपादन मीडिया विंगचे अध्यक्ष राजयोगी बी.के. करुणा भाई यांनी केले.

ब्रह्माकुमारी संस्थेच्या मीडिया व जनसंपर्क प्रभागातर्फे आयोजित राष्ट्रीय मीडिया सम्मेलन-२०२६चा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात झाला. ‘श्रेष्ठ विश्वाच्या निर्मितीसाठी सशक्त मीडिया’ या मुख्य विषयावर आयोजित या संमेलनासाठी देशभरातील पत्रकार, मीडिया प्रतिनिधी आणि तज्ज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन सत्रात उपस्थितांनी सकारात्मक, मूल्यनिष्ठ आणि जबाबदार पत्रकारितेचा सामूहिक संकल्प केला.

 “हे राष्ट्रीय संमेलन असले तरी येथे होणारे चिंतन संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी आहे. भारत विश्वगुरू होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असताना सकारात्मक परिवर्तनाच्या या प्रवासात माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. माध्यमांनी केवळ बातम्या देणारे माध्यम न राहता सकारात्मक परिवर्तनाची वाहक शक्ती बनले पाहिजे.”

……करुणा भाई.

पत्रकारांनी आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून राजयोगाचा अभ्यास करावा. स्वतः शांततेचा अनुभव घेतल्यास समाजातही शांतता आणि सकारात्मकतेचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचविता येईल, असेही त्यांनी सांगितले.

एका मिनिटाच्या मौनातून शांततेचा संदेश

मीडिया विंगच्या उपाध्यक्षा बी.के. सरला दीदी यांनी उपस्थित पत्रकारांना श्रेष्ठ विश्वनिर्मितीसाठी एक मिनिट मौन व मेडिटेशन करण्याचे आवाहन केले. या ध्यानसत्रामुळे संपूर्ण सभागृहात शांतता, सकारात्मकता आणि आत्मचिंतनाचे वातावरण निर्माण झाले.

मीडिया व जनसंपर्क प्रभागाचे राष्ट्रीय समन्वयक बी.के. निकुंज भाई यांनी संमेलनाचा उद्देश स्पष्ट केला. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे माध्यमांची ताकद अनेक पटींनी वाढली असली, तरी समाजात खऱ्या अर्थाने सुख-शांती निर्माण करण्यासाठी मनाचे सशक्तीकरण आवश्यक आहे. “मीडिया केवळ पॉवरफुल नव्हे, तर पर्पजफुल असावा,” असा संदेश त्यांनी दिला.

‘वसुधैव कुटुंबकम्’च्या भावनेतून श्रेष्ठ विश्वाची निर्मिती

मुख्य वक्ते प्रा. (डॉ.) मानसिंह परमार, माजी कुलगुरू, केटीयूजेएम, रायपूर यांनी युद्ध, शस्त्रास्त्रांची स्पर्धा आणि वाढती जागतिक अस्थिरता यांचा संदर्भ देत मानवतेला प्रेम, शांतता आणि सद्भावनेची गरज असल्याचे सांगितले.

एका मुलाला जगाचा नकाशा जोडण्याचे काम देण्यात आले. त्याने नकाशाच्या मागील बाजूस असलेल्या माणसाच्या चित्रापासून सुरुवात केली. माणसाचे चित्र पूर्ण करताच जगाचा नकाशाही योग्यरीत्या जुळला. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला अधिक चांगले घडविले, तर श्रेष्ठ विश्वाची निर्मिती आपोआप शक्य होईल, असे त्यांनी उदाहरणातून स्पष्ट केले.

भारतीय संस्कृतीतील ‘वसुधैव कुटुंबकम्’ आणि ‘सर्वे भवन्तु सुखिनः’ ही विश्वकल्याणाची शिकवण माध्यमांनी समाजापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले.

मीडिया लोकशाहीची ‘धडकन’ : डॉ. सरफराज सैफी

भारत न्यूज नेटवर्क, नवी दिल्लीचे सीईओ व एडिटर-इन-चीफ डॉ. सरफराज सैफी यांनी माध्यमांच्या वाढत्या जबाबदारीवर प्रकाश टाकला. “मीडिया हा केवळ लोकशाहीचा चौथा स्तंभ नसून लोकशाहीची धडकन आहे,” असे त्यांनी नमूद केले.

सोशल मीडियावर प्रसारित होणारी माहिती नागरिक अनेकदा सत्य मानतात. त्यामुळे कोणतीही माहिती प्रसारित करण्यापूर्वी तिची सत्यता आणि समाजावर होणारा परिणाम तपासणे अत्यावश्यक आहे. ब्रेकिंग न्यूजच्या स्पर्धेत चुकीच्या माहितीमुळे समाजात मानसिक ताण आणि गैरसमज निर्माण होऊ शकतात. त्यामुळे जबाबदार पत्रकारिता ही काळाची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

एआयच्या युगात पत्रकारितेची जबाबदारी अधिक वाढली

न्यूज इंडिया नेटवर्क, नवी दिल्लीचे सीईओ व एडिटर-इन-चीफ राणा यशवंत यांनी एआय, मशीन लर्निंग आणि सायबर वॉरच्या वाढत्या प्रभावावर भाष्य केले. तंत्रज्ञानाचा वापर मानवतेच्या हितासाठी कोणत्या दिशेने होत आहे, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाईल आणि अल्गोरिदम व्यक्तीला कोणती माहिती आणि कोणते विचार दिसतील, यावर प्रभाव टाकत आहेत. त्यामुळे माध्यमांनी केवळ माहिती देण्याऐवजी नागरिकांना शिक्षित, जागरूक आणि विवेकी बनविण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

राजयोगातून अनुभवली गहन शांतता

जयपूर सबझोनच्या प्रभारी राजयोगिनी बी.के. सुषमा दीदी यांनी उपस्थित पत्रकारांना राजयोग मेडिटेशनचा अनुभव दिला. ध्यानसत्रादरम्यान उपस्थितांनी गहन शांतता आणि सकारात्मक ऊर्जेचा अनुभव घेतला.

यावेळी कटक येथील ओडिसी डान्स अकादमीच्या कलाकारांनी मनमोहक नृत्य सादर केले. **

Post Views: 9
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपवना जलवाहिनी प्रकल्पाबाबत सर्व घटकांना विश्वासात घेऊन सकारात्मक तोडगा काढावा – महापौर रवि लांडगे
Next Article सशक्त माध्यमे हीच श्रेष्ठ विश्वनिर्मितीची आधारशिला : जयंती दीदी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महाराष्ट्र सदनातील पाककला स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

राष्ट्रीय प्रेस मीडिया संमेलनात पिंपरी चिंचवडच्या पत्रकारांना मिळाला बहुमान

September 13, 2026

सशक्त माध्यमे हीच श्रेष्ठ विश्वनिर्मितीची आधारशिला : जयंती दीदी

September 11, 2026

महाराष्ट्र ३३,८७२ स्टार्टअप्ससह देशात अव्वल, मुंबई जागतिक भांडवलाचे केंद्र म्हणून उदयास -केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह

September 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?