Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»ईशान्य भारतातील नागरिकांसाठी सायबर क्राईम जनजागृती उपक्रम
पिंपरी चिंचवड

ईशान्य भारतातील नागरिकांसाठी सायबर क्राईम जनजागृती उपक्रम

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 5, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने ‘नॉर्थईस्ट कम्युनिटी ऑर्गनायझेशन’च्या विद्यार्थी व नागरिकांसाठी सायबर क्राईम जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शनिवारी (दि. ५ सप्टेंबर) पोलीस आयुक्तालयातील शिवनेरी हॉल येथे झालेल्या या उपक्रमाला ईशान्य भारतातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत व्यवसाय व शिक्षणानिमित्त वास्तव्यास असलेल्या ईशान्य भारतातील नागरिकांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले होते. ‘नॉर्थईस्ट कम्युनिटी ऑर्गनायझेशन’चे अध्यक्ष सिंगम होरम, माजी अध्यक्ष सोरिओ हिटलर यांच्यासह ईशान्य भारतातील २२ नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.

अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड तसेच अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) बसवराज तेली यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. त्यानंतर पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा धीरज पाटील, सहायक पोलीस आयुक्त, विशेष शाखा सुनिल पंधरकर, सहायक पोलीस आयुक्त, आर्थिक गुन्हे व सायबर रोहिणी बानकर, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

अधिकाऱ्यांनी बँकिंगमधील ऑनलाइन फसवणूक, सायबर गुन्ह्यांच्या विविध पद्धती, बनावट लिंक, ऑनलाइन व्यवहारांमध्ये घ्यावयाची खबरदारी याबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले. फसवणूक झाल्यास तातडीने कोणती पावले उचलावीत, याबाबतही माहिती देण्यात आली. नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

सायबर गुन्ह्यांबाबत तक्रार अथवा आर्थिक फसवणूक झाल्यास १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर तातडीने संपर्क साधावा, आपत्कालीन मदतीसाठी ११२ या क्रमांकावर संपर्क करावा, तसेच अंमली पदार्थांबाबतच्या तक्रारींसाठी ७७९८१००११२ या हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.

या उपक्रमामुळे ईशान्य भारतातील विद्यार्थी व नागरिकांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण होण्याबरोबरच पोलीस प्रशासनाबद्दलचा विश्वास, सुरक्षिततेची भावना आणि समाजातील आपलेपणा अधिक दृढ होण्यास मदत झाली.

Post Views: 9
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसिनियर जर्नालिस्ट असोसिएशनच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी उत्तम कुटे तर उत्तर पुणे जिल्हाध्यक्षपदी विजय सुराणा 
Next Article ‘एक दिवस शाळेसाठी’ उपक्रमातून १.१९ लाख विद्यार्थ्यांना वाहतूक सुरक्षेचे धडे
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

राजवाडेनगरातील ७४०० चौ. फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

September 7, 2026

थोर क्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन

September 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?