Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पिंपरी-चिंचवडच्या कलागुणांना मिळणार हक्काचे ‘महोत्सवा’चे व्यासपीठ – महापौर रवि लांडगे
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडच्या कलागुणांना मिळणार हक्काचे ‘महोत्सवा’चे व्यासपीठ – महापौर रवि लांडगे

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 4, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा होणार भव्य ‘पिंपरी-चिंचवड महोत्सव २०२६’ ; स्थानिक कलाकार, बालकलाकार, खेळाडू आणि गुणवंतांच्या सहभागावर विशेष भर; शहराच्या सांस्कृतिक चळवळीला मिळणार नवी दिशा

पिंपरी, …. औद्योगिक आणि आधुनिक शहर म्हणून वेगाने विकसित होत असलेल्या पिंपरी-चिंचवडची सांस्कृतिक ओळख अधिक समृद्ध करण्यासाठी ‘पिंपरी-चिंचवड महोत्सव २०२६’ आयोजित करण्यात येत आहे. शहराच्या कानाकोपऱ्यात दडलेल्या कलागुणांना शोधून त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे, स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देणे आणि नागरिकांना विविध कलाविष्कारांचा आनंद देणे, हा या महोत्सवाचा प्रमुख उद्देश असल्याचे महापौर तथा महोत्सवाचे स्वागताध्यक्ष रवि लांडगे यांनी सांगितले.

 

यावेळी महोत्सवाचे मुख्य संयोजक तथा आमदार अमित गोरखे, मुख्य संयोजक तथा विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्यासह विविध क्षेत्रांतील कलाकार, सांस्कृतिक संस्थांचे प्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते.

 

पिंपरी-चिंचवडमध्ये संगीत, नाट्य, नृत्य, लोककला, साहित्य, क्रीडा यांसह विविध क्षेत्रांत मोठी प्रतिभा आहे. अनेक कलाकारांकडे गुणवत्ता असूनही त्यांना आपली कला मोठ्या व्यासपीठावर सादर करण्याची अपेक्षित संधी मिळत नाही. ही उणीव भरून काढण्यासाठी महोत्सवात नामवंत कलाकारांसोबतच स्थानिक व नवोदित कलाकारांना संधी उपलब्ध करून देण्यावर भर राहणार आहे तसेच बालकलाकार आणि विद्यार्थ्यांच्या सहभागालाही महोत्सवात विशेष महत्त्व दिले जाणार आहे. नाट्य परिषदेच्या माध्यमातून बालनाट्य, बालकलाकारांसाठी विविध उपक्रम तसेच मुलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धांचे नियोजन करण्याचा मानस आहे. योग्य वयात मुलांच्या प्रतिभेला प्रोत्साहन आणि व्यासपीठ मिळाल्यास भविष्यात शहराचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करणारे कलाकार घडू शकतात, या भूमिकेतून या उपक्रमांची आखणी केली जाणार आहे. यासोबतच शहरातील गुणवंत खेळाडू आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींनाही महोत्सवाशी जोडण्याचा प्रयत्न राहणार आहे.

महापौर रवि लांडगे म्हणाले, “पिंपरी-चिंचवडमध्ये प्रतिभेची कमतरता नाही; गरज आहे ती या प्रतिभेला संधी आणि हक्काचे व्यासपीठ देण्याची. शहरातील कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी दुसऱ्या शहरांकडे पाहावे लागू नये, अशी सांस्कृतिक व्यवस्था आपल्याला आपल्या शहरात निर्माण करायची आहे. हा महोत्सव केवळ काही कार्यक्रमांपुरता मर्यादित न राहता कलाकार, बालकलाकार, खेळाडू, विद्यार्थी आणि प्रत्येक कलाप्रेमी पिंपरी-चिंचवडकराचा उत्सव व्हावा, ही आमची भूमिका आहे.”

गणेशोत्सवाच्या काळात शहरातील स्थानिक कलाकारांना विविध कार्यक्रमांमध्ये सादरीकरणाची संधी देण्यात आली होती. त्याला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर आता या संकल्पनेला अधिक व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न ‘पिंपरी-चिंचवड गणेश महोत्सव २०२६’च्या माध्यमातून करण्यात येणार आहे. शहरातील सांस्कृतिक चळवळीला सातत्य मिळावे, नवोदित कलाकारांना प्रोत्साहन मिळावे आणि शहराची स्वतंत्र सांस्कृतिक ओळख अधिक दृढ व्हावी, हा त्यामागील उद्देश आहे.

“शहराचा विकास केवळ रस्ते, इमारती आणि पायाभूत सुविधांमधून होत नाही. शहराची खरी ओळख तेथील कला, संस्कृती, परंपरा आणि कलाकारांमधून घडत असते. पिंपरी-चिंचवडच्या या सांस्कृतिक वैभवाला राज्य आणि देशपातळीवर स्वतंत्र ओळख मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असेही महापौर लांडगे यांनी नमूद केले.

महोत्सवाचे मुख्य संयोजक तथा आमदार अमित गोरखे म्हणाले, “पिंपरी-चिंचवड हे विविध संस्कृती आणि परंपरांचा सुंदर संगम असलेले शहर आहे. या शहरातील कला, परंपरा आणि नव्या पिढीतील प्रतिभेचे प्रतिबिंब या महोत्सवात दिसले पाहिजे. विशेषतः बालकलाकार, विद्यार्थी आणि नवोदित कलाकारांना मोठ्या व्यासपीठावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळावी, यावर आमचा भर राहणार आहे. ‘पिंपरी-चिंचवड महोत्सव’ शहराच्या सांस्कृतिक ओळखीला नवी उंची देणारा ठरेल.”

महोत्सवाचे मुख्य संयोजक तथा विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर म्हणाले, “कला आणि संस्कृती ही समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र आणणारी शक्ती आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये असंख्य गुणी कलाकार आहेत; मात्र प्रत्येक कलाकाराला आपल्या कलेसाठी मोठे व्यासपीठ मिळतेच असे नाही. या महोत्सवाच्या माध्यमातून अशा कलाकारांना संधी देऊन त्यांच्या कलेचा सन्मान करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हा महोत्सव कोणत्याही एका व्यक्ती किंवा संस्थेचा न राहता संपूर्ण पिंपरी-चिंचवडकरांचा सांस्कृतिक उत्सव व्हावा, हीच आमची अपेक्षा आहे.”

महोत्सव अधिक लोकाभिमुख, सर्वसमावेशक आणि शहराच्या सांस्कृतिक वैविध्याचे प्रतिनिधित्व करणारा व्हावा, यासाठी कलाकार, सांस्कृतिक संस्था, नाट्य संस्था, पालक, नागरिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आपल्या सूचना व संकल्पना मांडाव्यात तसेच या सांस्कृतिक पर्वात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले.

Post Views: 9
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleविद्युत डीपी चोरट्यांना बेड्या; १६.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त
Next Article महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पवना धरणावर जलपूजन
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

राजवाडेनगरातील ७४०० चौ. फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

September 7, 2026

थोर क्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन

September 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?