काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीने वही, पेन व गोड पदार्थांचे वाटप
पिंपरी-चिंचवड : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीने रुपीनगर, निगडी परिसरातील मौलाना अब्दुल कलाम आझाद उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वही, पेन तसेच गोड पदार्थांचे वाटप करून वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.या वेळी अमरजीत सिंग पोतिवाल, फिरोज तांबोळी, रशीद अत्तार, संगम गंगापुरे, राजन नायर आणि वहाब शेख उपस्थित होते.
या उपक्रमासाठी ज्ञान प्रभात शाळेचे राहुल गवळी सर तसेच मौलाना अब्दुल कलाम आझाद उर्दू शाळेच्या इरफान शेख मॅडम यांचे सहकार्य लाभले.
सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला हातभार लावण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.