Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»श्रमिकांच्या कष्टाने कामगार नगरीचा विकास – महापौर रवी लांडगे
पिंपरी चिंचवड

श्रमिकांच्या कष्टाने कामगार नगरीचा विकास – महापौर रवी लांडगे

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 2, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

मीरा शिंदे यांना “हिंद रत्न कामगार पुरस्कार” प्रदान

पिंपरी, पुणे (दि. २ सप्टेंबर २०२६)… लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सांगितले आहे की, “पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कष्टकऱ्यांच्या, श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे.” या प्रमाणे श्रमिकांच्या कष्टाने पिंपरी चिंचवड या औद्योगिक, कामगार नगरीचा विकास झाला आहे. कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारे कामगार नेते इंटकचे प्रदेशाध्यक्ष डॉ. कैलास कदम आणि त्यांची हिंद कामगार संघटना देशभर कार्यरत आहे. या संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी एका कामगाराला ‘हिंद रत्न कामगार पुरस्कार’ देण्यात येतो. यावर्षीचा पुरस्कार प्रथमच एका परिचारिका महिलेला देण्यात येत आहे. हा पुरस्कार म्हणजे सर्व परिचारिकांचा सन्मान व इतरांना प्रेरणादायी आहे. यावर्षीच्या पुरस्कारार्थी नूतन भोसरी रुग्णालयातून स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या परिचारिका मीरा शिंदे यांचे मी अभिनंदन करतो. त्यांनी स्वाईन फ्लू आणि कोरोनाच्या काळात आपले कर्तव्य पार पाडले. त्यांची निवड सार्थ आहे असे पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांनी सांगितले.

हिंद कामगार संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त मीरा शिंदे यांना ‘हिंद रत्न कामगार पुरस्कार २०२६’ महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते पिंपरी येथे झालेल्या कार्यक्रमात देऊन गौरविण्यात आले. या पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ, रोख रक्कम होते. यावेळी इंटकचे प्रदेशाध्यक्ष व हिंद कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कैलास कदम, माजी नगरसेवक सद्गुरु कदम, भारती घाग, निवृत्त पोलीस अधिकारी रघुनाथ मोरे, हाफिज पठान, आनंदराव फडतरे, यशवंत सुपेकर, शांताराम कदम, सचिन कदम, उत्तम गायकवाड, सारिका भिंगे आणि कामगार बंधू, भगिनी उपस्थित होते.

डॉ. कैलास कदम यांनी स्वागत प्रास्ताविक करताना सांगितले की, राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) ही स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेली कामगार संघटना आहे. इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जी संजीवा रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली हिंद कामगार संघटना इंटक संलग्न आहे. महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, गुलझारी लाल नंदा, पंडित नेहरू, मौलाना आझाद यांनी इंटकचे नेतृत्व केले आहे. देशात बहुतांशी सरकारी आस्थापनांमध्ये आणि खाजगी कारखान्यांमध्ये कामगारांचे नेतृत्व ही संघटना करते. हिंद कामगार संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणारा पुरस्कार हा पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते देत आहोत ते देखील एका कामगार संघटनेचे नेते आहेत. त्यांच्या हस्ते पुरस्कार देताना आम्हाला अभिमान वाटत आहे. मीरा शिंदे यांनी आपली नोकरी व कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत एकूण ३१ वर्ष व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत २७ वर्ष रुग्णसेवा केली. त्यांचा गौरव करताना आम्हाला अभिमान वाटत आहे असेही डॉ. कैलास कदम यांनी सांगितले.सूत्र संचालन प्रा. गणेश गोरिले आणि आभार यशवंत सुपेकर यांनी मानले.

Post Views: 10
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleबहुआयामी कर्तृत्वाचा गौरव; कल्पना क्षीरसागर यांचा महापालिकेत सन्मान
Next Article विशेष सभा बेकायदेशीर असल्याचा आरोप; राष्ट्रवादीचा सभात्याग
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या शुभहस्ते पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

November 5, 2026

पिंपरी-चिंचवडच्या आशा स्वयंसेविकांसाठी आनंदाची बातमी; दिवाळीनिमित्त मिळणार ७ ते १५ हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहन भत्ता

November 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?