पिंपरी : चिखली जलशुद्धीकरण केंद्र येथे २०० दशलक्ष लिटर प्रतिदिन (द.ल.ली.) क्षमतेचा नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी उच्चदाब वीजपुरवठा करण्याकरिता गुरुवार, दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी उच्चदाब केबल वीजप्रणालीत जोडण्याचे काम करण्यात येणार आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव या कामाच्या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत उच्चदाब वीजपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे चिखली जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे.
याचा परिणाम बोऱ्हाडेवाडी, इंद्रायणीनगर, सेक्टर ४, ६, ९, ११ व १२, शीवरस्ता, चक्रपाणी वसाहत, धावडेवस्ती, मोशी, चऱ्होली, डुडुळगाव, चोवीसावाडी तसेच इतर परिसरातील पाणीपुरवठ्यावर होणार आहे.
तसेच शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर रोजी सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होण्याची शक्यता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केली आहे.
त्यामुळे संबंधित परिसरातील नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा तसेच पाण्याचा काटकसरीने वापर करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
