Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना राज्य शासनाप्रमाणे पेन्शनचा मार्ग मोकळा
पिंपरी चिंचवड

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना राज्य शासनाप्रमाणे पेन्शनचा मार्ग मोकळा

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 27, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

२९ वर्षांच्या प्रदीर्घ कायदेशीर लढ्याला ऐतिहासिक यश; सहा महिन्यांत लाभ देण्याचे प्रशासनाला निर्देश

पिंपरी : प्रतिनिधी…पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) मधील हजारो कर्मचारी व निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य शासनाच्या नियमांप्रमाणे पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनाचे (पेन्शन) लाभ देण्याचा मार्ग मोकळा झाला असून, उच्च न्यायालयाच्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करून संबंधित कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांच्या कालावधीत पेन्शनचे सर्व लाभ अदा करावेत, असे निर्देश पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती तथा पीएमपीएमएलचे संचालक अभिषेक बारणे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

प्रशासनाला पत्राद्वारे कडक सूचना

उच्च न्यायालयाच्या याचिका क्रमांक ५६२७/२०१३ मधील निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी अभिषेक बारणे यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. त्यांनी पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) यांना पत्र पाठवून न्यायालयाच्या आदेशानुसार आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

न्यायालयाच्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांच्या विहित कालावधीत निवृत्ती वेतनाचे लाभ मिळणे आवश्यक असल्याने प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता नियमांनुसार कार्यवाही पूर्ण करावी, असे बारणे यांनी स्पष्ट केले आहे.

२९ वर्षांच्या संघर्षानंतर मिळाले यश

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळावा यासाठी तब्बल २९ वर्षांपासून संघर्ष सुरू होता. पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच शिक्षण मंडळातील कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनाचे लाभ मिळत असताना पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना मात्र या लाभापासून वंचित राहावे लागत होते.

या प्रकरणात २ मे २०१३ रोजी औद्योगिक न्यायालय, पुणे यांनी कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय देत पेन्शन देण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाविरोधात पीएमपीएमएल प्रशासनाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने प्रशासनाची याचिका फेटाळून कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला. तसेच सहा महिन्यांच्या आत निवृत्ती वेतनाचे लाभ देण्याचे निर्देश दिले.

निवृत्त कर्मचाऱ्यांकडून बारणे यांचा सत्कार

उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तसेच प्रशासनाकडे तातडीने कार्यवाहीसाठी पाठपुरावा सुरू केल्याबद्दल निवृत्त कर्मचाऱ्यांनी अभिषेक बारणे यांची भेट घेतली. यावेळी निवृत्त कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पुष्पगुच्छ देऊन बारणे यांचा सत्कार केला आणि त्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले.

दीर्घकाळ प्रलंबित असलेला पेन्शनचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाल्याने निवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

“पीएमपीएमएलचे कर्मचारी हे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या सार्वजनिक वाहतुकीचा मुख्य कणा आहेत. महापालिकेच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांनाही राज्य शासनाच्या नियमानुसार निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणे हा त्यांचा हक्क आहे. २९ वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर मिळालेला हा विजय ऐतिहासिक आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांच्या कालावधीत पेन्शनचे लाभ मिळाले पाहिजेत. यासाठी पीएमपीएमएल प्रशासनाला पत्राद्वारे स्पष्ट सूचना दिल्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येईल.”

— अभिषेक बारणे, सभापती, स्थायी समिती, पिंपरी-चिंचवड महापालिका

Post Views: 12
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleतडीपार आदेशाचा भंग करून कोयता बाळगणारा तरुण अटकेत
Next Article गणेश मंडळांनी प्रसादाची शुद्धता जपावी; अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

राजवाडेनगरातील ७४०० चौ. फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

September 7, 2026

थोर क्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन

September 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?