Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांवरील कारवाईला गती देण्याचे अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांचे निर्देश
पिंपरी चिंचवड

अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांवरील कारवाईला गती देण्याचे अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांचे निर्देश

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 25, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

अतिक्रमण निष्कासन कारवाईमध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर होणार नियमानुसार कारवाई

पिंपरी,प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे तसेच अनधिकृत टपऱ्यांवर प्रभावीपणे कारवाई करण्यासाठी क्षेत्रनिहाय सर्वेक्षण करून निष्कासनाची मोहीम जलद गतीने राबविण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी दिले. तसेच कारवाईमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या अध्यक्षतेखाली आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भावनातील मधुकर पवळे सभागृह येथे शहरातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांवरील कारवाईचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस बांधकाम परवानगी विभागाचे सह शहर अभियंता सुनील बागवानी यांच्यासह कार्यकारी अभियंता, उपअभियंता, सर्व क्षेत्रीय अधिकारी तसेच बीट निरीक्षक उपस्थित होते.

बैठकीमध्ये सर्व क्षेत्रीय कार्यालयांअंतर्गत बीट निरीक्षकांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रत्येक बीट निरीक्षकाने त्यांना नेमून दिलेल्या क्षेत्राची नियमित पाहणी करून नव्याने सुरू झालेली तसेच सद्यस्थितीत सुरू असलेली अनधिकृत बांधकामे ओळखून त्यांचे सर्वेक्षण करावे. सर्वेक्षणादरम्यान आढळून आलेल्या अनधिकृत बांधकामांवर नियमानुसार तातडीने निष्कासनाची कारवाई करण्याचे नियोजन करावे, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी दिल्या.

महानगरपालिकेच्या मालकीच्या भूखंडांवर झालेली अतिक्रमणे तसेच अनधिकृत व विनापरवाना टपऱ्यांवर प्राधान्याने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. यासोबतच सार्वजनिक पदपथांवर झालेली अतिक्रमणे निष्कासित करून नागरिकांसाठी पदपथ मोकळे व वापरायोग्य ठेवण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांच्या प्रकरणांमध्ये केवळ तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कारवाई करण्याऐवजी संबंधित क्षेत्रातील परिस्थितीची नियमित पाहणी करून स्वतःहून अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे शोधून त्यावर तातडीने कारवाई करावी. याशिवाय, शहरातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात नियमित गस्त व पाहणी करावी. कारवाईसाठी आवश्यक असलेले नियोजन, मनुष्यबळ व यंत्रसामग्री यांचा योग्य समन्वय साधून निष्कासनाची कार्यवाही प्रभावीपणे राबवावी.

अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांविरोधातील कारवाईमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई किंवा हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी स्पष्ट केले.

“पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांवर सातत्याने आणि प्रभावीपणे कारवाई करणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. बीट निरीक्षकांना त्यांच्या कार्यक्षेत्राची नियमित पाहणी करून नव्याने होणारी अनधिकृत बांधकामे तातडीने निदर्शनास आणून त्यावर नियमानुसार निष्कासनाची कारवाई करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. महानगरपालिकेच्या मालकीच्या भूखंडांवरील अतिक्रमणे, अनधिकृत टपऱ्या तसेच पदपथांवरील अतिक्रमणे प्राधान्याने हटविण्यात येत आहेत. अनधिकृत बांधकामे किंवा अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरही भर देण्यात येत आहे. या कामात कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडून हलगर्जीपणा झाल्यास त्यांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे”

– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Post Views: 4
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपीएमपीएमएलमध्ये ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत
Next Article ६९ वर्षीय राम यादव अडसुळ यांनी रचला इतिहास; शीर्षासन करून वर्ल्ड रेकॉर्डची नोंद
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

राजवाडेनगरातील ७४०० चौ. फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

September 7, 2026

थोर क्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन

September 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?