Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘पिंपरी-चिंचवड महोत्सव २०२६’चे भव्य आयोजन
पिंपरी चिंचवड

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘पिंपरी-चिंचवड महोत्सव २०२६’चे भव्य आयोजन

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 21, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

नाट्य, संगीत, साहित्य, लोककला, मर्दानी खेळांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी; शहरातील गुणवंतांचा ‘रत्न’ पुरस्कारांनी होणार गौरव

पिंपरी, दि. २१ ऑगस्ट २०२६ :- पिंपरी-चिंचवड शहरातील सांस्कृतिक चळवळीला अधिक व्यापक स्वरूप देणे, स्थानिक कलाकारांना दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच शहराच्या कला, साहित्य आणि सांस्कृतिक परंपरेचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘पिंपरी-चिंचवड महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दि. १८ ते २० सप्टेंबर २०२६ या कालावधीत तीन दिवसीय महोत्सव संपन्न होणार असल्याची माहिती महापौर रवि लांडगे यांनी दिली.

महोत्सवाच्या आयोजनाबाबत आयोजित पत्रकार परिषदेत महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी महोत्सवाच्या स्वरूपाची व नियोजित कार्यक्रमांची माहिती दिली.

पिंपरी-चिंचवड शहराने औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रासोबतच कला, साहित्य, नाट्य, संगीत, क्रीडा आणि लोकसंस्कृतीच्या क्षेत्रातही स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. शहरातील या सांस्कृतिक ऊर्जेला एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देणे, विविध पिढ्यांना सांस्कृतिक उपक्रमांशी जोडणे आणि गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा अधिक दृढ करणे हा महोत्सवाच्या आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे.

विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची तीन दिवस मेजवानी

तीन दिवसीय महोत्सवात सर्व वयोगटांतील नागरिकांचा सहभाग राहील, अशा पद्धतीने विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. नाट्यरसिकांसाठी दर्जेदार व लोकप्रिय व्यावसायिक मराठी नाटकांचे विशेष प्रयोग सादर करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील नामवंत गायक-कलाकारांच्या सहभागातून भावगीत, नाट्यगीत, भक्तिगीत तसेच लोकप्रिय मराठी-हिंदी गीतांचा समावेश असलेली संगीत मैफल आयोजित करण्यात येणार आहे.

महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला आणि लोकपरंपरेचे दर्शन घडविणाऱ्या पारंपरिक लावणीचे सादरीकरण, तरुणाईसाठी आधुनिक संगीत आणि फ्यूजनचा समावेश असलेला रॉक बँड परफॉर्मन्स तसेच विविध सामाजिक विषय, हास्य-विनोद आणि समकालीन आशय मांडणाऱ्या नामवंत कवींचे राज्यस्तरीय कवी संमेलन हे महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.

महिलांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी पाककला स्पर्धा आणि फॅशन शो आयोजित करण्यात येणार आहेत. महाराष्ट्राच्या शौर्यपरंपरेचे दर्शन घडविणाऱ्या लाठी-काठी, दांडपट्टा व अन्य मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके देखील सादर करण्यात येणार आहेत.

बालकलाकारांच्या अभिनय व सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी बालनाट्य व बाल एकांकिका स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच पारंपरिक वस्तू, हस्तकला, स्थानिक कलाकुसर आणि खाद्यसंस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘संस्कृती जत्रा’ व प्रदर्शनाचे आयोजनही महोत्सवाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे.

शहरातील गुणवंतांचा ‘रत्न’ पुरस्कारांनी गौरव

पिंपरी-चिंचवड शहराच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या तसेच आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य व कामगिरी करणाऱ्या गुणवंत व्यक्तींचा महोत्सवादरम्यान विशेष गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये ‘कलारत्न’, ‘साहित्यरत्न’, ‘क्रीडारत्न’, ‘नृत्यरत्न’ आणि ‘संगीतरत्न’ या पुरस्कारांचा समावेश आहे. या पुरस्कारांच्या माध्यमातून शहरातील गुणवंतांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या योगदानाला प्रोत्साहन देण्याचा महोत्सव समितीचा प्रयत्न आहे.

“उद्योगनगरीबरोबरच पिंपरी-चिंचवडची सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख अधिक दृढ व्हावी”

पिंपरी-चिंचवड शहर हे देशातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून ओळखले जाते. मात्र या शहराला कला, साहित्य, नाट्य, संगीत आणि लोकसंस्कृतीचीही समृद्ध परंपरा लाभली आहे. शहरातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देऊन ही सांस्कृतिक ओळख अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड महोत्सव महत्त्वपूर्ण ठरेल. हा महोत्सव केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता विविध पिढ्या, कलाकार आणि नागरिकांना एकत्र आणणारे सांस्कृतिक व्यासपीठ ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

गणेशोत्सवाच्या आनंदात भर घालणाऱ्या या तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवात शहरातील नागरिक, कलाप्रेमी, महिला, युवक-युवती तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने सहभागी होऊन विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

महोत्सवाचा तपशील…

💮कालावधी : दि. १८ ते २० सप्टेंबर २०२६

💮स्थळ : प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड

💮आयोजक : पिंपरी-चिंचवड महोत्सव समिती

स्पर्धा नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क :

🔴श्री. मनोज डाळीम्बकर — ८२३७३३२२११

🔴श्री. राजेंद्र बंग — ९८२२३१३०६६

— मा. महापौर कार्यालय,पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

Post Views: 7
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleइन्स्टाग्रामवरील चॅटिंगचे पुरावे असल्याचे सांगत १३ लाखांची खंडणी; आणखी पैशांसाठी जीवे मारण्याची धमकी
Next Article शेतीच्या उत्पादकता वाढीसाठी डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

राजवाडेनगरातील ७४०० चौ. फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

September 7, 2026

थोर क्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन

September 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?