Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»मोशीतील १४०० कोटींचा वादग्रस्त बायो-सीएनजी प्रकल्प तात्काळ रद्द करा; रमेश वाघेरे यांची मागणी
पिंपरी चिंचवड

मोशीतील १४०० कोटींचा वादग्रस्त बायो-सीएनजी प्रकल्प तात्काळ रद्द करा; रमेश वाघेरे यांची मागणी

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 19, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी प्रतिनिधी: मोशी कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील अनधिकृत प्रशासकीय इमारत कोसळून महिनाभरापूर्वी झालेल्या भीषण दुर्घटनेत नऊ निष्पाप कर्मचाऱ्यांचा बळी गेला असतानाच, आता त्याच ठिकाणी ३७५ टन क्षमतेचा तब्बल १४०० कोटी रुपयांचा नवा बायो-सीएनजी प्रकल्प लादण्याचा घाट प्रशासनाकडून घातला जात आहे. या संतापजनक प्रकाराविरोधात पिंपरी-चिंचवडचे रमेश नानासाहेब वाघेरे यांनी थेट महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना पत्र लिहून या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविला आहे. प्रशासनाने ही मनमानी आणि अपारदर्शक टेंडर प्रक्रिया तात्काळ थांबवावी, अन्यथा न्यायालयात दाद मागण्याचा इशारा वाघेरे यांनी दिला आहे.

महिनाभरापूर्वी झालेल्या दुर्घटनेतील नऊ बळींचा शोक अजूनही शमला नसताना, त्याच कचरा डेपोच्या परिसरात प्रशासनाकडून पुन्हा एकदा इतका मोठा प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न सुरू असल्याने प्रशासकीय संवेदनांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. रमेश वाघेरे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, या संपूर्ण प्रकल्पाच्या प्रक्रियेमध्ये आणि आर्थिक व्यवहारांमध्ये प्रचंड अनियमितता आहे. या प्रकल्पाची संकल्पना सल्लागार टंडन यांच्या माध्यमातून तयार करण्यात आली असून, दुर्घटनेतील दोषी तत्कालीन मुख्य अभियंता यांनीच हा प्रकल्प प्रशासनासमोर आणला आहे. ‘एसएमसी इन्फ्रा. प्रा. लि.’ या ठेकेदाराला १६ वर्षे ९ महिन्यांसाठी काम देणे आणि त्यातही हॉटेल वेस्टपासून सीएनजी निर्मितीचा प्रकल्प सुरू असतानाच पुन्हा हा मोठा ठेका देणे, यात मोठे हितसंबंध गुंतल्याचा गंभीर संशय वाघेरे यांनी व्यक्त केला आहे.

या प्रकल्पांतर्गत आर्थिक बोजा महापालिकेच्या आणि जनतेच्या दृष्टीने घातक ठरणार आहे. विद्यमान प्रकल्पातील ८०० रुपये प्रतिटन असणारे टिपिंग चार्जेस थेट ३ हजार ६६१ रुपये प्रतिटन करण्यात आले आहेत. या दरवाढीमुळे दर दिवशी ठेकेदाराला १३ लाख ७२ हजार ८७५ रुपये द्यावे लागणार आहेत. या हिशोबाने १६ वर्षे ९ महिन्यांत ठेकेदाराला सुमारे १४०० कोटी रुपयांचा अवाढव्य निधी अदा करावा लागणार आहे. याउलट, प्रकल्पातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ठेकेदार ३४४ कोटी रुपये स्वतः कमावणार आहे. महापालिकेला आर्थिक मोबदला मिळण्याऐवजी, उलट जनतेच्या करातील करोडो रुपये ठेकेदाराला फुकट वाटल्यासारखे द्यावे लागणार आहेत, असा आरोप वाघेरे यांनी केला आहे.

सर्वात गंभीर बाब म्हणजे, हा खर्चीक विषय स्थायी समितीच्या नियमित विषयपत्रिकेवर रितसर आणणे टाळण्यात आले आहे. हा विषय ‘टेबल विषय’ म्हणून परस्पर सभेसमोर आणून घाईघाईने मंजुरी मिळवण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत. मोशीतील नागरिक आणि स्थानिक जनप्रतिनिधींचा या प्रकल्पाला तीव्र विरोध असतानाही हा प्रकल्प रेटला जात आहे.

प्रशासनाने कितीही दबाव तंत्र वापरले तरी मोशी कचरा डेपो येथे हा बायो-सीएनजी प्रकल्प होऊ दिला जाणार नाही, असे रमेश वाघेरे यांनी स्पष्ट केले आहे. या मनमानी आणि अपारदर्शक टेंडर प्रक्रियेला तात्काळ स्थगिती न दिल्यास, याविरुद्ध कायदेशीर लढा देण्याकरिता न्यायालयात धाव घेण्यात येईल, याची गांभीर्याने नोंद घ्यावी, अशा शब्दांत वाघेरे यांनी आयुक्तांना इशारा दिला आहे. मोशीकरांच्या भावनांचा विचार करून हा १४०० कोटींचा प्रकल्प तात्काळ रद्द करावा, ही मागणी त्यांनी लावून धरली आहे.

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपर्यावरण विभागातील सह शहर अभियंता व कार्यकारी अभियंता पदांचा अतिरिक्त पदभार सोपविला
Next Article शिरूरमध्ये २२ लाखांचा एम.डी. जप्त; दोघांना अटक
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

राजवाडेनगरातील ७४०० चौ. फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

September 7, 2026

थोर क्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन

September 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?