Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»मुंबई»बदलत्या विचारांचा आणि स्त्रीशक्तीचा वेध घेणारा ‘लग्न आणि बरंच काही’ चित्रपट – मंत्री आदिती तटकरे
मुंबई

बदलत्या विचारांचा आणि स्त्रीशक्तीचा वेध घेणारा ‘लग्न आणि बरंच काही’ चित्रपट – मंत्री आदिती तटकरे

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 18, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

मुंबई, दि. १८ ऑगस्ट: बदलत्या काळानुसार मुलींचे शिक्षण, स्वावलंबन आणि विचारसरणी प्रगत होत आहे. पारंपरिक रूढी-परंपरा आणि आधुनिक विचार यांची सांगड घालत महिलांना स्वातंत्र्याने पुढे जाताना येणाऱ्या समस्यांचे चित्रण ‘लग्न आणि बरंच काही’ या मराठी चित्रपटातून करण्यात आले आहे. हा चित्रपट तीन पिढ्यांतील महिलांना निश्चितच आपलासा वाटेल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.

स्त्रियांनी स्त्रियांसाठी साकारलेला हा चित्रपट स्त्रीशक्तीचा उत्सव साजरा करणारा असून, बदलत्या सामाजिक परिस्थितीचे वास्तव मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. मुलींसोबतच मुलांनाही या चित्रपटातून प्रगत विचार, नातेसंबंध आणि बदलत्या सामाजिक मूल्यांविषयी शिकण्यासारखे ‘बरंच काही’ मिळणार आहे.

म्हाळसा एंटरटेंन्मेंट आणि अव्यान आर्टस् प्रस्तुत ‘लग्न आणि बरंच काही’ या चित्रपटाच्या कलाकारांनी मंत्री आदिती तटकरे यांची भेट घेतली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण केले.

यावेळी बाबासाहेब पाटील, चित्रपटाच्या निर्मात्या डॉ. संजना सुरेश पै आणि अंजली तुषार नान्नजकर, दिग्दर्शिका वेदांती दाणी यांच्यासह अनेक सहकारी व चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे सदस्य उपस्थित होते.

मंत्री तटकरे म्हणाल्या, मुलीच्या दृष्टिकोनातून तिच्या जन्मापासून बालपण, किशोरवय आणि वयात येईपर्यंतच्या आयुष्यात आलेले विविध अनुभव या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे आजीच्या पिढीपासून आईची पिढी, आजची पिढी तसेच पुढील पिढीतील महिलांनाही या चित्रपटातील कथानक आणि अनुभवांशी नाते जोडता येईल.

महिलेच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटना आणि टप्पे घडत असताना तिच्या स्वतःच्या आकांक्षा, अपेक्षा आणि दृष्टिकोनही असतात. या दोन्हींचा समतोल कसा साधता येईल, हा महत्त्वपूर्ण विषय चित्रपटातून हलक्या-फुलक्या आणि संवेदनशील पद्धतीने मांडण्यात आला आहे, असेही मंत्री तटकरे यांनी सांगितले.

‘लग्न आणि बरंच काही’ हा चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येक महिलेला तसेच विशेषतः पुरुषांनाही महिलांच्या अनुभवांकडे आणि त्यांच्या भावविश्वाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी मिळेल. चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देत, या चित्रपटातून प्रेक्षकांना निश्चितच काहीतरी नवीन शिकायला मिळेल, असा विश्वास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.

Post Views: 10
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमराठी जेन झी साठी विशेष चित्रपट निर्मितीत राज्य सरकार सहभागी होणार — सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार
Next Article अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये जनआक्रोश; हजारो समाजबांधवांचा महामोर्चा
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महिला व बालकांचे हक्क व कल्याण समितीकडून मुंबईतील वसतिगृहे, अनाथालयाची पाहणी

September 2, 2026

शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शेतीचे मॅपिंग करून शेतीचा अद्ययावत डेटा तयार करण्यास प्राधान्य द्या – कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल

September 2, 2026

प्रधान सचिव विनीता वेद सिंगल यांची अपर मुख्य सचिवपदी पदोन्नती

September 2, 2026

सुट्या खाद्यतेल व्यावसायिकांना कायद्यानुरूप बदलांसाठी एक वर्षाची मुदत — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?