Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»मुंबई»मराठी जेन झी साठी विशेष चित्रपट निर्मितीत राज्य सरकार सहभागी होणार — सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार
मुंबई

मराठी जेन झी साठी विशेष चित्रपट निर्मितीत राज्य सरकार सहभागी होणार — सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 18, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

तंत्रज्ञान, व्हिज्युअल इफेक्ट्सच्या माध्यमातून नव्या प्रेक्षकवर्गाला जोडण्याचा प्रयत्न

मुंबई, दि. १८ ऑगस्ट: मराठी चित्रपटसृष्टीतील नव्या पिढीचा, विशेषतः जेन झी प्रेक्षकांचा वेध घेणारा तसेच आधुनिक तंत्रज्ञान, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि अन्य तांत्रिक माध्यमांचा प्रभावी वापर करणाऱ्या विशेष चित्रपटाच्या निर्मितीत महाराष्ट्र शासन सहभाग घेणार, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली.

पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परिसंवादात ते बोलत होते. मराठी चित्रपटांचा दर्जा, गुणवत्ता, नावीन्य आणि अभिनय याबाबत कोणतीही कमतरता नसून व्यावसायिक यशासाठी आवश्यक असलेल्या ‘कनेक्टिंग लिंक’वर काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठी चित्रपटसृष्टीने दर्जेदार आशय आणि नाविन्यपूर्ण मांडणीची परंपरा कायम ठेवली आहे. मात्र निर्मितीइतकाच स्क्रीन, वितरण आणि प्रेक्षकवर्ग यांचाही अभ्यास करणे आवश्यक आहे. यासाठी व्यवहार्य मॉडेल तयार झाल्यास महाराष्ट्र शासन त्यात गुंतवणूकदार म्हणून भूमिका घेईल, असे ॲड. शेलार यांनी सांगितले.

मराठी चित्रपटांसाठी उपलब्ध स्क्रीनची संख्या, वितरण व्यवस्था आणि नव्या प्रेक्षकवर्गाची निर्मिती या मुद्द्यांवर व्यापक विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. दक्षिण भारतीय चित्रपटांना मिळणाऱ्या भावनिक प्रेक्षक प्रतिसादाचा दाखला देत मराठी चित्रपटांसाठीही नव्या पिढीशी भावनिक नाते निर्माण करणारा प्रेक्षकवर्ग विकसित करण्याची आवश्यकता आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म आणि आधुनिक तंत्रज्ञान हे चित्रपटसृष्टीसमोर आव्हान असले तरी त्याचे संधीत रूपांतर करणे आवश्यक आहे. यासाठी तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, त्याची उपयुक्तता आणि आव्हाने यावर प्रात्यक्षिकांसह चर्चासत्र व कार्यशाळा आयोजित करावी, अशी सूचना मंत्री ॲड. शेलार यांनी केली.

मराठी जेन झी प्रेक्षक अन्य भाषिक मनोरंजनाकडे वळण्याऐवजी मराठी चित्रपटांकडे आकर्षित व्हावा, यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि प्रभावी निर्मितीमूल्यांचा वापर करणारा चित्रपट निर्माण करणे गरजेचे आहे. अशा चित्रपटाच्या निर्मितीचा आर्थिक भार केवळ निर्मात्यांवर पडू नये, यासाठी राज्य शासन त्यात भूमिका घेईल, असेही मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले.

चित्रपटसृष्टीची परिसंस्था बनविण्याचा प्रयत्न – स्वाती म्हसे पाटील

चित्रपट हा केवळ कला किंवा व्यवसाय नसून कला, तंत्रज्ञान, अर्थकारण, निर्मिती आणि संस्कृती यांचा सुरेख संगम आहे. बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात चित्रनगरीची भूमिका केवळ चित्रीकरणासाठी जागा उपलब्ध करून देण्यापुरती मर्यादित न राहता चित्रपटसृष्टीसाठी संपूर्ण परिसंस्था निर्माण करण्याची आहे, असे मत फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी व्यक्त केले.

स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही आणि ओटीटीच्या वाढत्या प्रभावामुळे चित्रपट निर्मिती, संकलन आणि आस्वादनाचे आयाम बदलले आहेत. या बदलांमुळे नवीन आव्हाने निर्माण झाली असली तरी त्यातून संधीही उपलब्ध होत आहेत, असे त्यांनी सांगितले.

चित्रनगरीकडून पायाभूत सुविधा, कौशल्य विकास, तंत्रज्ञान आणि ‘ईझ ऑफ डुईंग बिझनेस’ यावर काम केले जात असून, त्यासाठी पाच आधारस्तंभ निश्चित करण्यात आले आहेत. महामंडळ ५०व्या वर्षात पदार्पण करत असल्याचा अभिमान व्यक्त करताना, या परिसंवादातून चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी उपयुक्त विचारमंथन घडेल आणि मराठी चित्रपटसृष्टीला निश्चितपणे सुवर्णकाळ येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला फिल्मसिटीचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजनीकर, महेश मांजरेकर, अशोक राणे, मेघराज राजेभोसले, राजेश मापुस्कर, सुशांत शेलार तसेच चित्रकर्मी उपस्थित होते.

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleशहराच्या सांस्कृतिक वैभवाला जपण्यासाठी उप महापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार
Next Article बदलत्या विचारांचा आणि स्त्रीशक्तीचा वेध घेणारा ‘लग्न आणि बरंच काही’ चित्रपट – मंत्री आदिती तटकरे
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महिला व बालकांचे हक्क व कल्याण समितीकडून मुंबईतील वसतिगृहे, अनाथालयाची पाहणी

September 2, 2026

शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शेतीचे मॅपिंग करून शेतीचा अद्ययावत डेटा तयार करण्यास प्राधान्य द्या – कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल

September 2, 2026

प्रधान सचिव विनीता वेद सिंगल यांची अपर मुख्य सचिवपदी पदोन्नती

September 2, 2026

सुट्या खाद्यतेल व्यावसायिकांना कायद्यानुरूप बदलांसाठी एक वर्षाची मुदत — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?