Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»२,२४७ पैकी १,७३३ खड्डे बुजविले; उर्वरित खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू
पिंपरी चिंचवड

२,२४७ पैकी १,७३३ खड्डे बुजविले; उर्वरित खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 17, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी, दि. १७ ऑगस्ट २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाच्या अहवालानुसार, शहरातील एकूण २,२४७ खड्ड्यांपैकी १,७३३ खड्डे बुजविण्यात आले असून ५१४ खड्डे बुजविणे बाकी आहे. आतापर्यंत एकूण ७७.१३ टक्के खड्डे बुजविण्यात आले असून उर्वरित खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

प्रभागनिहाय पाहता, अ प्रभागातील १४० पैकी १२१, ब प्रभागातील १०९ पैकी ८०, क प्रभागातील १४१ पैकी १२४, ड प्रभागातील २३४ पैकी २१५, इ प्रभागातील ४५९ पैकी ३३०, फ प्रभागातील १५१ पैकी १०९, ग प्रभागातील २५९ पैकी १७०, ह प्रभागातील ११८ पैकी ८७, ज प्रभागातील ५६ पैकी ५१ आणि त प्रभागातील ३३२ पैकी ३०५ खड्डे बुजविण्यात आले आहेत.

तसेच शहरी दळणवळण विभागातील २४० पैकी १३३, तर स्थापत्य प्रकल्प विभागातील ९ पैकी ८ खड्डे बुजविण्यात आले आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उर्वरित खड्ड्यांवरही प्राधान्याने कार्यवाही करण्यात येत आहे.

स्मार्ट सारथी पीसीएमसी ॲपवर खड्ड्यांची तक्रार नोंदवा

शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची माहिती महापालिकेपर्यंत तातडीने पोहोचविण्यासाठी स्मार्ट सारथी पीसीएमसी ॲपमध्ये ‘खड्डे नोंदवा’ ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नागरिकांनी रस्त्यावर खड्डा आढळल्यास स्मार्ट सारथी पीसीएमसी ॲपवरून त्याची तक्रार नोंदवावी. तक्रार नोंदविताना नागरिकांना खड्ड्याचा फोटो, जीपीएसद्वारे अचूक ठिकाण, पत्ता तसेच खड्ड्याचा अंदाजे आकार नोंदविता येतो. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित विभागाकडून प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक कार्यवाही करण्यात येते.

तक्रारदाराला तक्रार क्रमांक उपलब्ध होत असून, त्याद्वारे तक्रारीची सद्यस्थिती ऑनलाइन पाहता येते. खड्डा दुरुस्त झाल्यानंतर तक्रार बंद करून त्याबाबतची माहिती संबंधित नागरिकाला उपलब्ध करून देण्यात येते.

नागरिकांनी गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरवरून स्मार्ट सारथी पीसीएमसी ॲप डाउनलोड करून, पीसीएमसी सेवा → खड्डे नोंदवा हा पर्याय निवडून खड्ड्यांची माहिती महापालिकेपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

“खड्डा दिसला तर फोटो काढा, ठिकाण नोंदवा आणि स्मार्ट सारथी पीसीएमसी ॲपवर तक्रार करा; सुरक्षित रस्त्यांसाठी महापालिकेच्या प्रयत्नांना सहकार्य करा,” 

…..आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी

Post Views: 7
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहापालिका मुख्यालयात डेंग्यू-मलेरिया प्रतिबंधासाठी तपासणी मोहीम
Next Article ‘खासदार सेवा आपल्या दारी’ उपक्रमात लोहगावकरांच्या समस्या ऐकून घेण्यात आल्या
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

राजवाडेनगरातील ७४०० चौ. फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

September 7, 2026

थोर क्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन

September 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?