Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते रिक्षा फिडर सेवेचा शुभारंभ; मेट्रो प्रवाशांचा पुढील प्रवास होणार सुलभ
पिंपरी चिंचवड

महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते रिक्षा फिडर सेवेचा शुभारंभ; मेट्रो प्रवाशांचा पुढील प्रवास होणार सुलभ

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 17, 2026No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

विविध भागातील नागरिकांना मिळणार “घरापासून मेट्रोपर्यत “आणि “मेट्रोपासून घरापर्यंत” सुलभ,नियमीत व किफायतशीर रिक्शा सेवा

पिंपरी, दि. १७ ऑगस्ट २०२६ :- पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम,किफायतशीर आणि नागरिकांसाठी सोयीची करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा उपक्रम आहे. मेट्रो आणि रिक्षा सेवा एकमेकांना जोडल्यामुळे नागरिकांचा वेळ वाचणार तर आहेच याशिवाय पार्कीगची समस्या देखील कमी होऊन मेट्रोचा वापर वाढणार आहे. प्रवाशांना सन्मानपूर्वक आणि विश्वासार्ह सेवा मिळणे हीच या उपक्रमाची खरी ओळख ठरणार असून,रिक्षा चालकांनी प्रवाशांचे भाडे नाकारू नये, मीटरप्रमाणे सेवा द्यावी आणि शेअरिंग पद्धतीचा स्वीकार करावा असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले.

पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे महामेट्रो आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने रिक्षा फिडर सेवेचा शुभारंभ महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार उमा खापरे, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे,सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे,महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रावण हर्डीकर, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, नगरसदस्य शतृघ्न काटे, तुषार हिंगे, शहर अभियंता मनोज सेठीया,महामेट्रोचे व्यवस्थापक कॅप्टन सनेर पाटील, महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह कार्यक्रमाचे संयोजक शुभम तांदळे, विजय ढगारे, विशाल ससाने, धनंजय कुदळे, दीपक ताटे, सुरज सोनवणे, दत्ता गिल्ले, भाऊसाहेब शेलार,रिक्षा चालक आणि विविध प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या रिक्षा फिडर सेवेमुळे मेट्रो स्थानकावरून शहरातील विविध भागांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना शेअरिंग पद्धतीने रिक्षा सेवा उपलब्ध होणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात विविध मार्गांवर सुमारे २० मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. या मार्गांची, रिक्षा थांब्यांची आणि भाड्याची माहिती देणारे दिशादर्शक फलक मेट्रो स्थानकांवर लावण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना कोणत्या गेटवरून कोणत्या भागासाठी रिक्षा उपलब्ध आहे, याची माहिती सहज मिळणार आहे.

सेवेचे स्वरूप व मार्ग (Routes):-

मेट्रो प्रवाशांच्या सोयीसाठी ही सेवा शेअरिंग आणि मीटर अशा दोन्ही स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

💮गेट क्र. १: घरकुल प्रकल्प, जाधववाडी, कुदळवाडी, चिखली गाव, अजमेरा कॉलनी, केएसबी चौक, मोरवाडी कोर्ट, शाहुनगर.*

💮गेट क्र. २: अंथिया सोसायटी, अजमेरा कॉलनी, मासुळकर कॉलनी, अंतरिक्ष कॉलनी, खराळवाडी, मोनिका अपार्टमेंट, डी. वाय. पाटील कॉलेज.*

💮गेट क्र. ३: पिंपरी गाव, चिंचवडगाव, तापकीर नगर, वाल्हेकर वाडी, निगडी, डीलक्स चौक, काळेवाडी ब्रिज, साई चौक, चाफेकर चौक.*

रिक्षा चालकांसाठी महत्त्वाची नियमावली प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी मेट्रो स्टेशनवर उपस्थित सर्व रिक्षा चालकांनी प्रवाशांना कोणतेही भाडे नाकारू नये (No Refusal Policy) अन्यथा नियमांचे उल्लंघन करून प्रवाशांना सेवा नाकारणाऱ्या चालकांवर कायदेशीर आणि रिक्शा संघटनेच्या वतीने कारवाई करण्यात येईल असे महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे संस्थापक, अध्यक्ष बाबा कांबळे यांनी नमूद केले, या उपक्रमाद्वारे प्रवाशांचा वेळ तर वाचणारच असून, रिक्षाचालकांना हक्काचा आणि सन्मानजनक रोजगार उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. स्मार्ट व नागरिककेंद्रित पिंपरी-चिंचवड घडविण्यासाठी या उपक्रमास महानगरपालिकेची पूर्ण साथ राहणार आहे.

या सेवेतील महत्त्वाचा निर्णय म्हणजे मेट्रो स्थानकावरून एखाद्या प्रवाशाने मीटरने जाण्याची मागणी केल्यास रिक्षा चालकाने मीटरप्रमाणे सेवा देणे आवश्यक आहे. तसेच प्रवाशाने इच्छित स्थळी जाण्याची मागणी केल्यास त्याचे भाडे नाकारू नये, अशा सूचना रिक्षा चालकांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मेट्रोमधून उतरलेल्या प्रवाशांना पुढील प्रवासासाठी रिक्षा सहज उपलब्ध होणार असून सार्वजनिक वाहतुकीवरील त्यांचा विश्वास वाढण्यास मदत होणार आहे.

रिक्षा चालक हा शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक आहे. मेट्रो स्थानकापासून नागरिकांना त्यांच्या घरापर्यंत किंवा इच्छित स्थळी पोहोचविण्यात रिक्षा चालकांची भूमिका महत्त्वाची आहे. प्रत्येक प्रवाशाला चांगली सेवा देऊन त्याच्या प्रवासाचा शेवटचा टप्पा सुलभ करण्याचे काम रिक्षा चालकांनी करावे. हा उपक्रम यशस्वी झाल्यास शहरातील इतर मेट्रो स्थानकांवरही अशा प्रकारची सेवा आणि रिक्षा थांबे सुरू करण्यासाठी महापालिका प्रयत्न करेल,तसेच रिक्शा स्थानकांवर ई चार्जीगची सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे असेमहापौर रवि लांडगे म्हणाले,

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी “मेट्रो सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी मेट्रो स्थानकापासून पुढील प्रवासाची सुविधा उपलब्ध असणे आवश्यक असून मेट्रोमधून उतरल्यानंतर प्रवाशाला सहज रिक्षा मिळाली आणि त्याला इच्छित स्थळी जाता आले, तर मेट्रो आणि रिक्षा या दोन्ही सेवांवरील नागरिकांचा विश्वास वाढेल. रिक्षा चालकांनी भाडे नाकारू नये, मीटरप्रमाणे किंवा निश्चित दराने सेवा द्यावी आणि शेअरिंग पद्धतीचा स्वीकार करावा. यामुळे प्रवासी आणि रिक्षा चालक दोघांनाही फायदा होईल असे सांगितले.

मेट्रो स्थानकापासून नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी चांगली आणि विश्वासार्ह वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक होते,त्यासाठी हा उपक्रम असून प्रवाशांना चांगली आणि समाधानकारक सेवा मिळणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. हा उपक्रम यशस्वी झाल्यास शहरातील इतर भागांमध्येही या सेवेचा आवश्यक्नुसार विस्तार करण्यात येईल असे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी रिक्शा चालकांना आवश्यक ती पार्कीगची सोय उपलब्ध करून दिल्याबद्दल महापालिकेचे आभार व्यक्त् केले, तसेच या उपक्रमातून पुरूष तसेच महिला रिक्षा चालकांना देखील कामाची संधी व रोजगार उपलब्ध होणार असल्याचे नमूद केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

एकूणच भविष्यात मेट्रो, महानगरपालिका आणि रिक्षा सेवा यांच्यातील समन्वयात वाढ होणार असून नागरिकांना “घरापासून मेट्रोपर्यत “आणि “मेट्रोपासून घरापर्यंत” अशा सुलभ, किफायतशीर आणि विश्वासार्ह प्रवासाची सुविधा देण्याच्या दिशेने रिक्षा फिडर सेवा महत्त्वाची ठरणार आहे.

Post Views: 7
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleचालक-वाहकाच्या प्रसंगावधानाने पीएमपीएमएल बस थेट रुग्णालयात; ५५ वर्षीय प्रवाशाला जीवदान
Next Article महापालिका मुख्यालयात डेंग्यू-मलेरिया प्रतिबंधासाठी तपासणी मोहीम
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

राजवाडेनगरातील ७४०० चौ. फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

September 7, 2026

थोर क्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन

September 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?